Login

प्रेमाचा रंग भाग 6

Premacha Rang Bhag 6


प्रेमाचा रंग (भाग 6)


फेरी - राज्यस्तरीय करंडक कथामालिका
विषय - प्रेमकथा
जिल्हा - ईरा संभाजीनगर संघ



मल्हार आणि सनी दोघेजण विचार करत होते की मल्हारने जान्हवीला कसे प्रपोज करावे पण ते काही ठरत नव्हतं .


आज जान्हवीचा नोकरीवर रूजू होण्याचा पहिला दिवस होता .

आईने डबा भरून दिला, तिच्या आवडीची भाजी दिली.


(जान्हवी आजीच्या पाया पडली)
आजीने आशीर्वाद दिला - " यशस्वी भव. जानू. "


आजी मुलाला म्हणाली ! अरे दत्ता, तुझी लेक मोठी झाली. आता नोकरी लागली. बघ बरं भूरकून उडून जाईल चिमणी. लेक परक्याचे धन रे बाबा. "


जान्हवीचे बाबा - " जानू.. माझ्या काळजाचा तुकडा आहे. कुणाला देणं किती अवघड आहे."


जान्हवी - " मी बाबांची राजकुमारी आहे. माझ्या वडीलांनी माझे किती लाड केले.... किती फुलाप्रमाणे ठेवलय मला.... पण मी माझ्या बाबांना सोडून कुठेच जाणार नाही मूळी. "


जान्हवी बाबांच्या पाया पडली. त्यांनी मुलीला जवळ घेऊन डोक्यावर हात फिरवला. मुलीचे आणि वडीलांचे प्रेम पाहुन आजीचे डोळे पाणावले. जान्हवीच्या बाबांनी तिला एक छानसं पेन दिलं.


जान्हवी आईच्या पाया पडली. आई म्हणाली, "देवाला नमस्कार कर. "


जान्हवीने देवाला नमस्कार केला. आणि म्हणाली - "गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. "


जान्हवीला नोकरीच्या पहिल्या दिवशी भाऊ सोबत सोडवायला गेला.


"बघता बघता तोंडावर गणपती आले. दोन दिवसात"- जान्हवीचे बाबा आईला म्हणाले.


आजी म्हणाली " अरे दत्ता ऐक , आपकडे गणपती बसण्याच्या दिवशी त्या मल्हारला घरी बोलव जेवायला.. फोन कर. पण, ते राहूनच गेलं बघ."


जान्हवीचे बाबा - फोन लावतात. मल्हार नेमका अंघोळ करायला गेलेला होता.


सनी मोबाईल वाजला म्हणून बघतो आणि मल्हारला म्हणाला - "अरे जान्हवीच्या बाबांचा फोन आलाय."


मल्हार - "सनी तू घे बोल ना. काय म्हणतात बघ. "


सनी - "हॅलो.."


जान्हवीचे बाबा - " हा मल्हार यांचा फोन आहे का."


सनी - " हो मी मल्हारचा चुलत भाऊ सनी , बोला."


जान्हवीचे बाबा - " आमच्याकडे गणपती बाप्पा येणार त्या दिवशी मल्हार यांना जेवायला बोलवायचे आहे. तुम्हीपण या सोबतच . आमच्याकडे गणपती जोरदार असतात बरं."


सनी -" हो मी मल्हारला सांगतो."


जान्हवीचे बाबा -" हो सुट्टी असेल ना. मग सांगा मल्हारला आणि तुम्ही नक्की या मग."


सनी -" हो. धन्यवाद."


मल्हार अंघोळ करून बाहेर आला." काय म्हणाले जान्हवीचे बाबा ?"


सनी -" जान्हवीच्या बाबांनी आपल्या दोघांना गणेश चतुर्थी येणार त्या दिवशी जेवायला बोलावले आहे. "


मल्हार - " तू काय म्हणाला?"


सनी -" हो आम्ही येतो. "


मल्हार -" अरे पण आपल्या घरच्या गणपतीचे काय? "

सनी - " हो रे. मग. आता."

मल्हार - " टाईम सांगितला का त्यांनी?"


सनी - "नाही. "


मल्हार -" आपले घरचे सगळे आटपून संध्याकाळी जाऊ."


सनी -" आपले मोदक कोण जास्त खाणार? स्पर्धेत पोट भरलेले असेल ना. दरवर्षीप्रमाणे. "

मल्हार -" घरी एक, दोन खाऊ..मग स्पर्धेत हरू.. यावर्षी.. संध्याकाळी जाऊन येऊ."


सनी - " पण मल्हार इतक्या सगळ्या तिच्या घरातल्या समोर.. तू कसे तिला सांगणार?"


मल्हार -" हो रे.. पत्र लिहून देऊ का? "


सनी - " मी लिहितो.. तू सांग.. आणि तूच दे तिला पण नक्की.. मी घरातल्यांना बोलण्यात बिझी ठेवेल."


मल्हार आणि सनीने पत्र लिहिलं.

त्यांची कशी भेट झाली, कसे प्रेम झाले सगळे पत्रात लिहिलं आणि जान्हवी चं नाव वर लिहिलं तर पत्राच्या शेवटी मल्हार चं नाव टाकलं - तुझाच प्रेमवेडा मल्हार असं


गणेश चतुर्थी आली, गणपती बाप्पा आले. त्यादिवशी गडबडीत तिच्या घरी जाताना नेमकं पत्र मल्हार आपल्या बेडरूम मध्ये विसरला.


मल्हारला वाटलं पत्र सनी कडे आणि सनीला वाटते पत्र मल्हारकडे आहे.


दोघेही जान्हवीच्या घरी पोहचले .
संध्याकाळची वेळ जान्हवीच्या घरी आदरातिथ्य झालं.
" याबसा.. गणपती बाप्पा आलेले आहेत. दर्शन घ्या. "
मग आरती झाली व मल्हार आणि सनीला त्यांनी आग्रहाने जेवायला बसवलं.


जान्हवी वाढायला लागली, जान्हवीची आई वाढत होती. आग्रहाने जेवण पोटभर झालं व जेवणी आटपली . पोट भरलं पण मन भरलं नाही कारण मल्हारला जान्हवीशी बोलायलाच मिळालं नाही.


अचानक जान्हवी गॅलरीत आली.
मल्हारचे सगळे लक्ष जान्हवीकडे होतं , तो पटकन तिच्या मागे गेला.

त्याने तिला सगळे सांगितलं अन भेट झाल्यापासून आजपर्यंत च्या घटना आणि स्वतःचं प्रेम आहे हे कबूल केल. मल्हारला वाटलं कि त्याने तर काम केलं पण हिने काहिच रिस्पॉन्स का नाही दिला.
जान्हवीच्या कानात इयरफोन होते व ती मैत्रीणीला गणपती पाहण्यासाठी घरी येण्याचे आमंत्रण देत होती .
मल्हारला जेव्हा जान्हवीच्या सौंदर्य बटा हवेच्या झुळूकेने उडताना दिसतात तेव्हा कानातले इयरफोन दिसतात. तेव्हा मल्हारला कळले की जान्हवीने काहीच ऐकलेलं नाही.


जान्हवीला मल्हार शेजारी कधी आला हेही कळलं नव्हतं .. पण मल्हारचे बोलणे मागे जान्हवीच्या वडीलांनी ऐकलं होतं अगदी पूर्ण.


जान्हवीने आपले फोनवरचे मैत्रीणी सोबतचे बोलणे संपवले व सहजच घरात निघून आली.

त्याक्षणी बाबांना समजलं की जान्हवीने काहीच ऐकलेलं नाही.


मल्हार वळला आणि तिच्या बाबांना तिथे मागे उभे पाहून त्याला धक्का बसला.

मल्हारने उगाच सारवासारव केली व घरात निघून गेला.

जान्हवीचे बाबा विचार करत होते मल्हारच्या बोलण्याचा.


इकडे घरी मल्हारच्या बेडरूम मध्ये लाईट चालू होता म्हणून मल्हारचे बाबा मल्हारच्या बेडरूम मध्ये आले आणि नेमकं त्यांचा हाती मल्हारचे प्रेमपत्र लागले.

मल्हारचे बाबा प्रेम पत्र घेवून चष्मा तिकडे आहे म्हणून हॉल मध्ये घेऊन आले. नेमके हॉल मध्ये सगळेच बसलेले होते.

गणपती बसले. जेवणं झाली. एकत्र आनंदाने गप्पा टप्पा चालू होत्या . मल्हारची लहान बहिण मोबाईल वर गेम खेळत होती. हॉल मध्ये टिव्हीवर सिरीयल चालू होतं . मल्हारची आई, काकू आणि आजी गप्पा मारत बसलेल्या होत्या .

सनी आणि मल्हार घरात नव्हते, काहीतरी गणपतीच्या मंडळात जातो वगैरे सांगून जान्हवीच्या घरी आलेले होते.

यावेळी मल्हारच्या बाबांना चष्मा हॉल मध्ये सापडला आणि मल्हारच्या बाबांच्या हातात असलेलं ते प्रेमपत्र बाबा वाचायला घेतात.


क्रमशः


©® सौ भाग्यश्री चाटी सांबरे
जिल्हा - औरंगाबाद (संभाजीनगर)

🎭 Series Post

View all