श्रेणी - राज्यस्तरीय कथामालिका
विषय - प्रेमकथा
जिल्हा संभाजीनगर संघ
जान्हवी - " बाबा माझ्या मैत्रीणी येणार आहे मी जाते खाली आपल्या मंडळाच्या गणपतीची आरती झाली की येते."
बाबा- " हो. बेटा जानू."
जान्हवी घरातून बाहेर पडली की.
बाबांनी मल्हारच्या तोंडून जान्हवीवर प्रेम आहे ऐकल्यावर त्याला प्रश्न विचारले खुप
बाबांनी मल्हारच्या तोंडून जान्हवीवर प्रेम आहे ऐकल्यावर त्याला प्रश्न विचारले खुप
बाबा - " कमावतो किती? व्यसन आहे का? मल्हार घरात कोण कोण असते? बाबांचे नाव काय तुझ्या? काय करतात तुझे बाबा? आई काय करते? छंद काय तुझे? घर कुठे आहे तुझे?
जान्हवीची आजी -" अरे दत्ता असे...."
जान्हवीचे बाबा -" कोणीही मध्ये बोलणार नाही. "
आजी -" अरे दत्ता झाले काय?"
जान्हवीला मल्हारनी आतापर्यंत भेटी कशा झाल्या. याचे तिच्यावर प्रेम आहे हे सांगितले. तिच्या कानात ते काय ते फोन होते तिला काही नाही महिती. मी मात्र माझ्या कानाने ऐकले मल्हारचे बोलणे.
आजी- " दत्ता शांत हो "
मल्हार शांत, संयमी आणि आत्मविश्वासाने जान्हवीच्या वडीलांच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होता सगळी खरी हे जान्हवीच्या आईला जाणवत होते. हाडाची शिक्षिका होती परीक्षार्थीची हकिकत एकाच नजरेने कळत होती.
मल्हार - माझे एकत्र 10 जणांचे कुटुंब आहे. माझे वडील सी. ए. आहेत सुधाकर जोशी. आमचा स्वतःचा बंगला आहे. तुम्ही माझ्या हॉस्पिटल मध्ये आला तिथूनच जवळच. मला व्यसन नाही कसलेच. माझी आई गृहिणी आहे. सुचित्रा जोशी. माझे स्वतःचे हॉस्पिटल आहे मी दोन दवाखान्यात व्हिजिट देतो. सिरीयस पेशंट हँडल करतो. खेळ खेळायला आवडतात खेळात मेडल मिळाले मला.
मला तुमचा राग आणि प्रश्न सगळे कळत आहे. माफ करा. माझे जान्हवीवर खरचं प्रेम आहे. तिला सांगू शकलो नाही.
आजी - " अरे तू त्याचे डॉक्टर ची डिग्री आणि खेळाचे सर्टिफिकेट पाहिले आहे की तूच त्याला नेऊन दिले होते. दत्ता जरा शांततेने घे. "
इतक्यात मल्हारच्या वडीलांचा फोन येतो. - " मल्हार तुझे प्रेमपत्र वाचले. घरात सगळ्यांना कळले. माझ्या डॉक्टर मुलाने चोरून प्रेम करावे आणि कोण हि जान्हवी मला मुळीच पटले नाही. कुठे आहे तू? आत्ताच्या आता घरी ये."
जान्हवीचे बाबा -" मल्हार फोनवर बोलण्या आधी मला सांग घरी महिती आहे का तुझ्या?"
मल्हार -" माझ्या बाबांचाच फोन आहे. त्यांना आताच कळले आहे. जान्हवीला लिहलेले पत्र त्यांनी वाचले. "
जान्हवीचे बाबा -" बोलाव इथे आई आणि बाबांना तुझ्या. मला बोलायचं त्यांच्याशी. "
मल्हार आईला फोन करतो -" आई माझे ज्या मुलीवर प्रेम आहे तिचे वडील म्हणाले त्यांच्या घरी तु आणि बाबा या मी पत्ता पाठवतो या तुम्ही प्लीज बाबांना आण. मी इथेच आहे. "
आई वडीलांना सांगते. कसेबसे मल्हारच्या वडीलांना शांत करून तिथे चला म्हणून गळ घालते. शेवटी स्वतःची शप्पथ घालून आई, बाबा जान्हवीच्या घरी निघतात.
मल्हार ला पत्ता आणि लोकेशन बाबांना पाठव म्हणून आई फोन करते मल्हारला.
मल्हारला वाटते मोठीच परीक्षा आहे आता. त्याच्या पोटात गोळा येतो. सनी शांततेत मल्हार कडे पाहतो.
मल्हारचे आई बाबा जान्हवीच्या घरी पोहचतात.
मल्हार भितीने गांगरून जातो. घाम फुटला मल्हाला.
मल्हारचे बाबा आणि जान्हवीचे बाबा ऐकमेंकाच्या समोर येताच
सुधा तू दत्तू तू ओरडतात. दोघे एकाच गावातील, एकाच शाळेतील, एकाच वर्गातील जिवलग मित्र निघतात. शाळेनंतर इतक्या वर्षांनी आज भेटून आनंदीत होतात. गळेभेट घेतात. हसतात. टाळ्या देतात.
आजी ओळखते. - " सुधाकर जोशी तू सुधू. "
मल्हारचे वडील - " आई तुम्ही कशा आहात? किती वर्षांनी. मी गणपतीच्या दिवसात घरी यायचो. तुमच्या हातचे उकडीचे मोदक मी ताव मारायचो.... आ हा.. हा.."
जान्हवीची आजी - " आठवते सुधू तुला. अरे तुझा मूलगा मल्हार का?"
मल्हार चे बाबा - हो
दत्ता -" मग जमले लग्न. सुधू म्हणजे हरकत नाही. काय आई. "
इतक्यात जान्हवी येते. मल्हार ची आई ओळखते गणपतीच्या मंदिरात रांगेत चक्कर आली. हिने पाणी दिले मला. बसवले. आपुलकीने विचारपूस केली."
जान्हवीला दत्ता विचारातात - मल्हार नवरा म्हणून पसंत आहे का
जान्हवी लाजते आत पळते. सगळे हसतात. लग्न जमते जान्हवी आणि मल्हार चे
सौ भाग्यश्री चाटी सांबरे
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा