जान्हवी कुलकर्णी एक मध्यमवर्गीय कुटुंबात लाडाकोडात वाढलेली सुंदर मुलगी.
लांबसडक काळे कुळकुळीत केस, गोरीपान, ऊंचपूरी, नाकी डोळी निटस, एका गालावर खळी पडणारी, काळ्या मोठ्या पाणीदार डोळ्याची, लाल ओठांची.... बघता क्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी बार्बी गर्ल !
पण या फुलासोबत काटेही बरेच होते. एक असं की जान्हवी स्वतःच दिसायला सुंदर असली तरी वागायला टॉम बॉय टाईप मुलगी, जिन्स आणि टॉप घालणारी. मुलासारखेच रहाणारी. मुलीसारखा नाजूकपणा, मेकअप वगैरे अजिबात जानूला जमायचं नाही.
त्यात हिचा मोठा भाऊ ब्लॅक बेल्ट विनर, बॉडीबिल्डर, तो स्वतःचं जिम चालवायचा आणि स्पोर्ट्स मध्ये क्रिकेट कोच म्हणून ही काम करायचा.
आई आणि बाबांचे लाडके शेंडेफळ म्हणजे जानू...!
जान्हवीचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. आई सरकारी शाळेत शिक्षिका. आजीची लाडकी एकुलती एक नात. एवढ्या कुटूंबात लहानाची मोठी झालेली जानू.
जान्हवीचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. आई सरकारी शाळेत शिक्षिका. आजीची लाडकी एकुलती एक नात. एवढ्या कुटूंबात लहानाची मोठी झालेली जानू.
जान्हवी कुलकर्णी. एमपीएम पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाली.
आज एच आर पोस्ट साठी एका कंपनीत मुलाखती साठी जायचे होते. गणपती बाप्पाच्या पाया पडुन \"मला नोकरी लागू दे ,मी तुला पहिल्या पगारात हे करीन, ते करीन\" असे चालू असताना. आजीने दही आणि साखर हातावर दिली. जान्हवीने गणपती बाप्पाला आणि घरातील सर्वाना नमस्कार केला.
मुलाखतीच्या तयारी साठी आदल्या रात्री जागरण झाले होते. आजीच्या 50 सूचना. असे कर, तसे नको, जानूनी काही ऐकल्या, काही ऐकल्या सारख्या केल्या, काही कानापर्यंत पोहचू दिल्या नाहीत आणि जान्हवी निघाली मुलाखतीसाठी वेळेत पोहचायला.
. जान्हवी वेळेत पोहचली होती. सगळे व्यवस्थित पार पडले होते. जान्हवीची मुलाखत चांगली झाली होती. आता कंपनीतून आम्ही कळवतो असे सांगण्यात आले.
कंपनीत २ जागा होत्या पण मुलाखती साठी 200 जण आले होते . जीवघेणी स्पर्धा आहे. जान्हवीला आता कंपनी कळवेलच अशी आशा होती. आशेवरच तर जग चालते.
तिची काही कागदपत्रे जमा कंपनी मध्ये जमा करून जान्हवी निघाली.
महत्वाची कागदपत्रे, सर्टीफिकेटची फाईल घेऊन ती परत निघाली.
तिची काही कागदपत्रे जमा कंपनी मध्ये जमा करून जान्हवी निघाली.
महत्वाची कागदपत्रे, सर्टीफिकेटची फाईल घेऊन ती परत निघाली.
आता घरी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन वर आली गर्दी होती त्यात एका मुलाची टक्कर झाली.
डोक्याला डोक आदळले. चांगले जोरातच लागले. जान्हवी जोरात ओरडली - "आई ग. दिसत नाही का? आंधळे आहात का? " दोघांचीही हातातली फाईल वगैरे खाली पडली. मुलाची फाईल पडली म्हणून त्याने कागदपत्रे गोळा केली. दोघांच्या फोल्डर फाईलचा रंग अगदी सारखाच. जान्हवीनी गडबडीत चुकून त्या मुलाची फाईल उचलली.
तेवढ्यात हिची रेल्वे आली. जान्हवी रेल्वेत बसली आणि रेल्वे काही मिनीटात निघून गेली.
मुलाला पहिल्याच नजरेत जान्हवी आवडली होती. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर गर्दीत त्याला वाटले जणु निशिगंधाचा सुगंध घेऊन....
हवेची झुळूक आली .
हवेची झुळूक आली .
इतक्यात ट्रेनचा भोंगा वाजला व तो अचानक भानावर आला.
टक्कर तर जोरातच झाली होती त्यामुळे डोक चोळत बसला होता. तोही त्याच्या रेल्वेत बसून परत गेला.
टक्कर तर जोरातच झाली होती त्यामुळे डोक चोळत बसला होता. तोही त्याच्या रेल्वेत बसून परत गेला.
दोघेही शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लांब रहात होते. एक पुर्वेला तर एक पश्चिमेला!
फाईलची अदलाबदल झालेली दोघांनाही महिती नव्हती.
रेल्वेच्या गर्दी मध्ये प्रवास करून दोघे आपापल्या घरी पोहचले.
जान्हवी घरी येताच. आजी आणि बाबांनी प्रश्न विचारला- "मुलाखत कशी झाली?"
जान्हवीने आनंदाने सांगितलं - "चांगली झाली पण 2 जागांसाठी जवळपास 200 जण आले होते मुलाखती साठी."
बाबा म्हणाले - " जिकडे तिकडे स्पर्धा वाढली आहे कारण बेकारी वाढली आहे."
आजी म्हणते - "जानू हात - पाय धू. ताट, पाणी घेते चल आपण जेवूया."
जान्हवी म्हणते - "तुम्ही दोघे का थांबलात जेवायला. जेवून घ्यायचे ना?"
तिघे जेवायला बसतात. इतक्यात जान्हवीला कंपनी मधून फोन येतो . उद्या मुलाखतीचा दुसरा राऊंड आहे. उद्या आजच्या वेळीच या. सगळी कागदपत्रे, सर्टीफिकेट घेऊन या .
फोन ठेवून जान्हवी गणपती बाप्पा मोरया म्हणून आनंदाने आजी आणि बाबांना ( वडीलांना ) निरोप सांगते. सगळेजण आनंदाने जेवून घेतात.
आता काही कागदपत्रे झेरॉक्स काढून घेऊ, उद्या लागतील म्हणून जान्हवीने फोल्डर फाईल हातात घेतली अन मग तिला समजले.
त्यात मल्हार जोशी नावाने कागदपत्रे आणि सर्टिफिकेट होती. मग आपले फोल्डर कुठे गेले? ती घाबरून, गडबडून गेली. मग तिच्या लक्षात येते की स्टेशन वर आपण हे फोल्डर घेतले म्हणजे आपले फोल्डर त्या मुलांकडे गेले .
आता काय करायचं?
आता काय करायचं?
"उद्या माझे सगळे सर्टिफिकेट लागतील. मी काय करू?" जान्हवीला टेन्शन आले व घडला सगळा प्रकार तिने आजी आणि बाबांना सांगितला.
बाबा जान्हवीला म्हणाले - "आण ते फोल्डर, त्यात बायोडेटा वगैरे मोबाईल नंबर आहे का चेक करू. त्याला सांग. ही त्याची कागदपत्र त्याला लागतीलच आणि तुझी कागदपत्रे तुला दे म्हणावं."
बाबा आणि जान्हवीने फोल्डर पाहिलं
बाबा म्हणाले - "जान्हवी, हा मुलगा क्रिकेट मध्ये चॅम्पियन आहे. खुपच सर्टिफिकेट मिळाली आहेत याला शिवाय डॉक्टर आहे. हे बघ कार्ड आहे. डॉ. मल्हार जोशी. "
मग त्यांनी फोन लावला त्या नंबरवर.
जान्हवीचे बाबा " हॅलो, डॉ. मल्हार जोशी का? "
" हो बोलतोय. बोला. "
" महत्वाची कागदपत्रे असलेले फोल्डर फाइल तुमच्याकडे आलेय ते माझ्या मुलीचे आहे आणि तुमचे माझ्या मुलीकडे आले आहे."
डॉक्टर मल्हार - "हो का. मी पाहिलेच नाही अजून."
जान्हवीचे बाबा - "तुमच्या सोयीने कुठे तरी आजच्या आज भेटून परत कराल का? माझ्या मुलीला उद्या मुलाखती साठी फाईल हवी आहे. हो तीच सकाळची फाइल. तुमचीही फाईल परत घेवून जा."
डॉक्टर - "सर मी आज दिवसभर व्यस्त आहे. तुम्हीच याल का माझ्या दवाखान्यात ? त्या फाईलमधे माझा पत्ता आहे."
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®
©®
राज्यस्तरीय कथा मालिका
जिल्हा - संभाजीनगर
( प्रेमकथा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा