प्रेमाची आस
भाग 1
"तुम्हे देखती हु तो लगता है ऐसे
के जैसे युग से तुम्हे चाहती है...... "
शुभदाचे खणखणीत गीत सुरू झाले आणि सभागृहात शांतता पसरली. तिचा तो आर्त स्वर, गायनाचा अभ्यास, गायनातला खरेपणा आणि खऱ्या प्रेमासाठी उतावळे झालेले तिचे मन , ऐकणाऱ्याच्या हृदयात खोलवर जखम निर्माण करत होते. शुभदा इतकी भावविवश होऊन गात होती कि, डोळ्यातून अश्रू बाहेर पडू पाहात होते, त्याचेही तिला भान उरले नव्हते. गाणे संपले. काही शिक्षण त्याच स्तब्धतेत गेले आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. सभागृहातील प्रत्येक जन आज उभे राहून शुभदाला अभिवादन करत होता. त्याचा आवाज ऐकून शुभदा भानावर आली. नम्रपणे तिने सर्वांचे अभिवादन स्वीकारले.
आज जवळपास 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शुभदा गाण्याच्या मैफिलीत गीत सादर करत होती. लग्न, मुलेबाळे घरचे, या राहाटगाडग्यात ती स्वतःलाच विसरून गेली होती. आज मात्र दर्दी रसिकांनी दिलेल्या प्रेमामुळे तिला तिच्या उत्कृष्ट कलाकार असण्याची पावती मिळाली होती.
आपल्या वाट्याला रसिक श्रोत्यांचं भरभरून कौतुक यावं. हीच एका कलाकाराची आस असते. श्रोतांकडून मिळालेली दाद कलाकाराला दहा हत्तीचे बळ देते. शुभदाला तर आज आभाळही ठेंगणं झालं होतं. कार्यक्रम संपला.
शुभदा आणि सहकलाकार विंगेत आले. शुभदाला भेटण्यासाठी, तिचं कौतुक करण्यासाठी काही रसिक श्रोते देखील विंगेत आले होते.
त्यांच्यापैकीच एक 'राहूल' . राहुल काळे. गायण्याचे आवड जपणारा एक गर्दी श्रोता ! वय वर्षे 44 / 45 असणारा एक उद्योजक. सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय. स्वतःच्या हिमतीवर , स्वतःच्या कौशल्याने, आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी "रागिनीज कॉस्मेटिकला " उभे केले होते. आणि आज तो ब्रँड झाला होता.
अल्पावधीतच त्यांनी एक प्रतिथयश उद्योजक म्हणून नाव कमावले होते. मुलगा, मुलगी आणि पत्नीसोबत तो शहरात रहात होता. आई वडील गावी शेतीसाठी रहात होते. राहुलचे वडील निवृत्त शिक्षक, तर आई प्रवचानकार! राहुल वर त्यामुळे खूप चांगले संस्कार झाले होते. खूप काही त्याच्या श्रवणी पडत असे. आपसूकच तो चांगला श्रोता म्हणून तयार झाला होता.
ज्याचे ' कान ' चांगले तो विचाराने ही चांगला असतो. राहूल ही सदसदविवेक बुद्धी असणारा सुस्वभावी तरुण होता. त्याला संगीताचीही आवड होती.
गाण्याची मैफिल म्हणजे त्याच्या तणावमुक्तीचे साधन होते . शक्य तेव्हा अशा गाण्याच्या कार्यक्रमांना जाणे, अनेक गायकांना ऐकणे, जुन्या नव्या गाण्यांवर चर्चा करणे हा त्याचा छंद! त्याची पत्नी प्रिया मात्र गायनापासून चार हात लांबच असे. चांगली गाणी ऐकावी, कधी गुणगुणावे, या पलीकडे तिचे कधी या गायना सोबत सुरू जुळले नाही. मात्र ती उत्तम गृहिणी, आदर्श पत्नी, माता आणि सूनही होती. राहुलला प्रत्येक बाबतीत ती खंबीरपणे साथ देत होते .
पण घरची जबाबदारी पार पाडत असताना मात्र ती राहुलची ' मैत्रीण' होण्यात कमी पडत असे.
आज राहुलला या कार्यक्रमासाठी दोन प्रवेशिका मिळाल्या होत्या. परंतु मुलीचा बॅडमिंटनचा क्लास असल्यामुळे प्रिया राहुल सोबत कार्यक्रमाला येऊ शकली नाही.
राहुल शुभदा चे गाणे आवडले होते, तिचे कौतुक करण्यासाठी तो विंगे त आला. तिच्या जवळची श्रोत्यांची गर्दी एव्हाना कमी झाली होती.
" तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे शुभदाजी. किती सुंदर गाता हो तुम्ही! मला तर असं वाटत होतं की तुमचं हे गीत परत परत ऐकत राहावं. पौर्णिमेच्या रात्री चांदण्यांच्या सौख्यात मन जस चैतन्यमय होऊन जातं ना, तसंच तुमचं गीत ऐकताना कैवल्याच्या चांदण्याचा अनुभव मिळत होता. "
" बास बास किती तारीफ कराल ? मी साधी गृहिणी आहे. आवड म्हणून गाते. "
" हा तुमचा मोठेपणा आहे. पण तुमच्या गळ्यात दैवी शक्ती आहे. तुम्हाला असं गाताना ऐकणं हे आमच्यासारख्या श्रोत्यांचं भाग्यच!! नेहमीच तुम्हाला असं गाताना ऐकायला आवडेल आम्हाला. तुम्ही व्यवसायिक कार्यक्रम करता का? "
" आवरलं असेल तर घरी चल शुभदा. मुली आणि आई बाबा वाट बघत आहेत. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. घरी जाऊन तुला स्वयंपाक करायचा आहे. "
रागाने ओरडलेल्या तिचा नवऱ्याचा शंतनू चा आवाज ऐकला आणि क्षणातच शुभदाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. हास्य, समाधान जाऊन त्याची जागा चिंता, भीती, अपमानाने घेतली. कोणाकडेही न बघता शुभदा निघाली. मात्र राहुलची आणि तिची नजरा नजर झाली. नकळत शुभ त्याच्या हृदयात जरा जास्तच धडधड झाली. चोरट्या नजरेने राहुल कडे पहात शुभदा रागीट शंतनूच्या मागे निघाली....
क्रमश :...
©®गीतांजली सचिन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा