ट्रिंग ट्रिंग बेल वाजली .... आणि लातूर कॉलेज च्या २०११ च्या बॅचचा शेवटचा पेपर संपला. ४ वर्षांमध्ये झालेली ती मैत्री, दुश्मनी, भांडण, YEAR ड्रॉप आणि बरच काही आता सगळं नाहीसं होणार होतं. ह्या बॅच मध्ये एक विशेषता होती. सगळ्या प्रकारचे विध्यार्थी ह्या बॅच मध्ये तुम्हाला सापडतील. अगदी पार्ट-टाइम जॉब करण्या पासून तर कॉलेज ला bmw घेऊन येण्यापर्यंत. स्टेट लेवल च्या टेनिसपटू पासून तर शास्त्रीय संगीतातल्या पारंगत पर्यंत.
आणि ह्याच बॅच मध्ये वर्ग होता. क्लास-B , संपूर्ण कॉलेज ओळखत होतं असा वर्ग होता तो. सगळ्या प्रकारचे नमुने त्यात भरले होते. त्या वर्गात शिक्षक गेले तरी शिक्षकांचा क्लास होत असे. ४ वर्षात बरेच भांडणं , मैत्री, प्रेम , ब्रेकअप्स बराच काही घडलं होतं पण सर्व जण शेवटच्या दिवशी सगळं काही विसरून एकमेकांना कायमचा निरोप देत होते. काही जण दूर गावरून आलेले तर काही जण दुसऱ्या देशात जाणार होते. संपूर्ण क्लास B अतिशय भावुक झाला होता..
शेवटचा पेपर संपला आणि कॉलेज च्या गेट जवळ सगळे जण जमले. सगळे जण फोटो काढण्यात आणि आयुष्यभरासाठी आपली आठवण राहावी म्हणून काही ना काही प्रयत्न करत होता. त्याच वर्गात एक "ड्रीम गर्ल " होती.
" अश्विनी " - सर्व गुण संपन्न. फक्त वर्गातल्या नाही तर पूर्णच कॉलेजातल्या मुलांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्यांनी विचारला होतं त्यांना नकार मिळाल्यामुळे ते नाराज होऊन तिचे मित्र बनून राहिले होते.
अश्विनी म्हणजे प्रत्येक मुलाला आवडेल अशी. अभ्यासातच हुशार नाही तर बॅडमिंटन प्लेअर सोबत गाणं गाण्यात अतिशय सुरेख.
लांबसडक केस आणि ते मोठे डोळे- कॉलेज युनिफॉर्म मध्ये सुद्धा सुंदर दिसायची.. फक्त रूप नाही तर सगळ्या वर्गात सुद्धा ती आवडायची.. सिनिअर्स आणि जुनिअर्स सगळेच तिचे फॅन होते..
फक्त मुलांचीच नाही तर वर्गातल्या मुलींना सुद्धा तिने आपल्या गोड स्वभावामुळे जिंकलं होतं. कॉलेज नंतर सुद्धा ती आधार आश्रमात मदत करण्या साठी जायची आणि कॉलेजात सगळ्या उपक्रमाने मध्ये अव्वल.
अश्विनी सुद्धा शेवटच्या दिवशी अतिशय भावुक झालेली. सगळ्यांना मिठी मारून ती निरोप देत होती. सगळे जण एक-मेकांच्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहू असं प्रॉमिस करत होते..
त्याच वर्गात एक "नितीन" नावाचा तिचा मित्र होता. नितीन हा अगदी शांत...... म्हणजे अगदी कोणी प्रश्न विचारला तेवढच उत्तर देईल असा. त्याला सुद्धा अश्विनी प्रचंड आवडायची पण अश्विनी सोबत च काय.......कोणत्याही मुलीशी बोलणे हीच त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती........ पण अश्विनी वर त्याच मनापासून प्रेम होतं.
कॉलेज संपल्यावर अश्विनी जेंव्हा आधार आश्रमात जायची तेंव्हा तो हि तिच्या पाठी जाऊन ती बाहेर येईपर्यंत तिची वाट बघायचा आणि तिला रिक्षा मिळते कि नाही हे बघायचा. तिला कॉलेज मध्ये कधी यायला उशीर झाला तर स्वतःची अट्टेण्डन्स न लावता तिची लावायचा. तिच्यासाठी नोट्स ची XEROX काढून ठेवायचा पण ती तिला जाऊन देईपर्यंत कोण-ना कोणी तिला नोट्स दिलेली असायची. पण "नितीन अतिशय शांत असल्यामुळे तो अश्विनी ला कधीच काही बोलला नव्हता.
आणि अश्विनी ला, अश्विनी ला तर नितीन म्हणजे फक्त वर्गातला आपला एक वर्गमित्र. तिचा स्वभाव बोलका असल्यामुळे ती सगळ्यांशी जस प्रेमाने बोलायची तसच नितीनशी सुद्धा बोलायची. पण नितीनच तिच्यावर इतका प्रेम आहे हे तिला कधी ४ वर्षात समजलंच नाही. नितीन मात्र तिच्यासाठी जीव द्यायला तयार होता आणि तिला तीळ मात्र खबर नव्हती.
शेवटच्या दिवशी नितीन फक्त अश्विनी कडेच बघत होता. आज बोलायची हिम्मत केली तर कदाचित माझा विचार करेल आणि तिला बोलू नाही शकलो तर कदाचित ती आयुष्यात पुढे कधीच भेटणार नाही.
नितीन हा शांत जरी असला तरी विचारांनी मात्र तल्लख होता. आणि दिसायला तर प्रिन्स चार्मिंग. कॉलेज मधल्या मुलींनी त्याला विचारायचा प्रयत्न सुद्धा केला पण तो कधी कोणत्या मुलीशी नोट्स देण्या पलीकडे बोललाच नव्हता.
सगळा वर्ग एकमेकांना शेवटचा भेटत होता. नितीन ला अश्विनी कडे बघून ४ वर्षात घालवलेला प्रत्येक दिवस आठवत होता. नितीन ला ठाऊक होता की अश्विनी शी बोलणं आणि ते सुद्धा मला ती आवडते हे .... मात्र ह्या जन्मी शक्य नव्हतं.
नितीन फक्त अश्विनी कडे टक लावून बघत होता. त्याला अश्विनी शिवाय दुसरा कोणीच कॉलेजे मध्ये दिसत नव्हतं. त्याच पहिलं प्रेम आयुष्यातून निघुन जाणार होतं कायमचं.
नितीन चा एक मित्रापेक्षाही जास्त भावासारखा मित्र होता "अजिंक्य",
संपूर्ण कॉलेज मधून फक्त अजिंक्य लाच माहित होतं की नितीनच अश्विनीवर जीवापाड प्रेम आहे.
नितीन आणि अजिंक्य ची खरी मैत्री असल्यामुळे अजिंक्य ने ४ वर्षांत कोणालाही समजू दिलं नव्हतं.
संपूर्ण क्लास-B आज भावुक झाला होता.. अश्विनी च्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू दोघं दिसून येत होतं .
अश्विनी सगळ्यांना भेटून कोणासोबत SELFIE काढत होती तर कोणच्या शर्ट वर MESSAGE लिहीत होती.
अजिंक्य चा निरोप घेऊन अश्विनी नितीन जवळ आली.
नितीन ला काही सुचेनासं झालं. हिच्याशी बोलू का? काय बोलू? कि नको बोलायला?
" हाय नितिन"
नितीन नजर चुकवून हाय म्हणाला
"अश्विनी चा तो गोड हसरा चेहरा बघून नितीन आतल्या आत लाजला होता "
"काय मग"?? काय ठरवलं आहेस पुढे"?? जॉब करणार की शिक्षण?
"ठरवलं नाही अजून" नितीन ने अश्विनी कडे बघितल आणि परत नजर चोरली.
" बरं, तुझा शर्ट दे की, मी साग्क्यांच्या शर्ट वर कायमचं लक्षात राहील असा मेसेज लिहितेय "
नितीन ने गुपचूप आपल्या बॅग मधून शर्ट काढला आणि अश्विनी ला दिला.
अश्विनी ने तो नेहमी सारख्या हसऱ्या चेहऱ्याने घेतला आणि शर्ट वर लिहायला लागली.
नितीन पुन्हा तिच्याकडे बघायला लागला. त्याला सारखं जाणवत होत कि माझ्या आयुष्यच पाहिलं प्रेम मी जातांना बघतोय.. तिला बघत असतांना त्याने मोठा आवंढा गिळला आणि हसत तिच्याकडे बघायला लागला"
अश्विनी ने त्याला शर्ट वापस केला आणि म्हणाली
" ओके , गुड बाय नितीन.. ऑल दि बेस्ट फॉर FUTURE !!! असं म्हणत तिने नितीन सोबत हॅन्ड शेक केला आणि तिच्या दुसऱ्या मित्रांना भेटायला गेली."
नितीन ला आता मात्र डोळ्यातलं पाणी आवरलं नाही... त्याचे डोळे ओले झाले.... आणि अजिंक्य ने त्याच्याकडे बघितला.
अजिंक्य नितीनच्या पाठीवर हाथ ठेऊन म्हणाला " गेली ती मित्रा आता, आपल्याला सुद्धा जायची वेळ आली "
हे ऐकून नितीन च्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.. तो पळत पळत वॉशरूम मध्ये केला दरवाजा लावला आणि खाली बसून मोठ्या मोठ्याने रडायला लागला... अजिंक्य त्याच्या मागे पळत आला.
अजिंक्य दरवाजा ठोकत होता पण आतून नितीन मात्र काहीच उत्तर देत नव्हता..
५ मिनिटानंतर वॉशरूम चा दरवाजा उघडला . नितीन बाहेर आला.. पण त्याच्या चेहऱ्यावर आता अश्रू नव्हते..
"चल अजिंक्य, बरोबर बोललास तू.,, ती गेली निघून आता कायमची.. " आपणही निघायला हवं
माझ पाहिलं प्रेम कधी बोललो नाही पण पहिलं प्रेम गमवल मी.
"चला,, आयुष्य चालतच राहणार :'
" तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं कि तो शर्ट वॉशरूम मधेच विसरला आहे "
तो पुन्हा शर्ट घ्यायला गेला.. आणि त्याने अश्विनीने लिहिलेली अक्षरे बघितली .
" I LOVE U "
नितीन पळत , पळत अजिंक्य कडे गेला आणि त्याने अजिंक्य ला दाखवलं.
अजिंक्य ने नितीन ला पकडून कॉलेज च्या गेट पर्यंत नेल. गर्दी असल्या मुले दोघं अश्विनी लाच शोधत होते.. शेवटी अश्विनी त्यांना दिसली..
तिची गाडी सुरु करून ती निघतच होती..
"नितीन,, जा आता तुझ्या पहिल्या प्रेमाला वाचव"
"नितीनला मात्र अजूनही काहीच सुचत नव्हतं.. ती तसाच अश्विनी कडे बघून उभा होता"
"जा आता नितीन" - अजिंक्य ओरडून ओरडून सांगत होता.
नितीन मात्र तसाच गेट जवळ उभा...
अश्विनी ने गाडी सुरु केली.. गाडी हळू हळू पुढे जायला लागली"
नितीनला जाणीव झाली आता आपलं प्रेम वाचवायची ही शेवटची वेळ आहे'"
जिवाच्या आकांताने तो पळत पळत अश्विनी कडे जात होता.. अश्विनी मात्र गाडी सुरु करून पुढे निघाली होती... पळत पळत तो पार्किंग पर्यंत पोहोचला ..
संपूर्ण कॉलेज त्याला बघत होतं पण अश्विनी पाठमोरी असल्यामुळे तिचा लक्ष नव्हतं.
" अश्विनी,,,,,,,,," नितीन अगदी जिवाच्या आकांताने ओरडला
"अश्विनी.... I love YOU ..... " I CANT LIVE WITHOUT YOU ""
अगदी इतक्या मोठ्याने ओरडला कि संपूर्ण कॉलेज ला ऐकू गेलं. सगळ्या कॉलेज ची नजर आता अश्विनी आणि नितीन कडे होती.
अश्विनी ने तो आवाज ऐकून गाडी तशीच सोडली आणि मागे नितीन कडे बघून ती उभी होती..
नितीन पळत पळत तिच्या कडे जात होता.. तिच्या चेहऱ्यावरआनंदाश्रू येत होते..
नितीन तिच्या पर्यंत पोहचला, पळून त्याला दम लागला होता..
अश्विनी I REALLY LOVE U ...
अश्विनी रडत रडत म्हणाली " माहितीये मला - पण हे सांगायला इतका उशीर का केलास"
नितीन खाली मान घालून उभा राहिला..
" I LOVE YOU TOO नितीन"
हे ऐकताच नितीन रडायला लागल.. त्याने अश्विनी ला मिठी मारली.. दोघं जण रडायला लागले .. आणि संपूर्ण कॉलेज मात्र हे दृश्य बघून भावुक झालेल.. अजिंक्य ने टाळ्या वाजवायला सुरवात केली.. आणि संपूर्ण कॉलेज टाळ्या वाजवायला लागला..
टाळ्यांचा आवाज ऐकून नितीन ला जाणीव झाली आणि त्याने मिठी सोडली आणि दोघांनाही लाजिरवाण्या सारखं वाटलं. अजिंक्यने पळत जाऊन नितीन ला मिठी मारली..
नितीन च्या डोळ्यातले अश्रू अजूनही तसेच होते.. संपूर्ण कॉलेज च्या डोळ्यात पाणी होतं.
अश्विनी अजिंक्य कडे बघून म्हणाली
"थँक यू अजिंक्य"
नितीन ने प्रश्नार्थक नजरेने अजिंक्य कडे बघितल ..
" सॉरी नितीन,, मी अश्विनी ला सगळं सांगितलं कारण मला माहित होतं तू कधी बोलू शकणार नाही आणि तिच्या शिवाय जगू हि शकणार नाही"
अजिंक्य आणि नितीन ने पुन्हा मिठी मारली.. सर्व कॉलेज पुन्हा टाळ्या वाजवायला लागलं.
थोड्यावेळात संपूर्ण क्लास बी , अश्विनी आणि नितीन ला भेटायला आला ..
आणि क्लास बी चा शेवटचा दिवस संपला..