Login

प्रेमाची वीण - भाग -6

Premachi Vin
भाग - 6

( मागच्या भागात आपण बघितले - कुंदाताई बोलतात मी येईन तुमच्याकडे कायमची राहायला, नेहा त्यांचं हो ऐकून खुश होते )


         चार दिवसांनी कुंदाताई त्यांचं सामान म्हणजे कपड्यांची एक बॅग, आणि एक मोठी पिशवी भरून जेवणाची भांडी असं सामान घेऊन नेहाकडे राहायला येतात. नेहाला पण त्यांची सोबत मिळाल्यामुळे आनंदी वाटतं असतं. कुंदाताईना मुलं खूप आवडत असतं त्या ओवीचं सगळं अगदीच हौशीने करत असतं.

      पण नेहा मनातून म्हणते कां अशा ह्या कुंदाताई एकट्याच नोकरी करून घरं सांभाळत असतील त्यांना कोणीच नातेवाईक कसे नाहीत. ती म्हणते आज रात्री त्यांना सगळं विचारतेच. नेहा रात्री सगळी कामं आवरल्यावर ओवीला झोपवून कुंदाताईना विचारते ताई तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे पण मग तुम्ही एकट्याच कां राहता, तुमचे मिस्टर कुठे असतात.

    कुंदाताई बोलतात मला मुलं होतं नव्हतं म्हणून त्यांनी मला सोडून दिलं आहे आणि दुसरं लग्न केलं आहे, नेहा बोलते मग तुमच्या माहेरची माणसं ती पण कोणीच नाहीत कां तुम्हाला..

       कुंदाताई सांगू लागतात - माझी कहाणी काय सांगू मॅडम तुम्हाला - माझे आई - वडील माझ्या लहानपणीचं एका अपघातात वारले होते, काकीने माझा सांभाळ केला, सांभाळ कसला नाईलाज म्हणून मला वाढवलं, जेवढा त्रास देता येईल तेवढा तीने दिला, कायम उपेक्षाचं केली.

      तिच्या मुलाला चांगले कपडे आणि मला कायम फाटक्या कपड्यात ठेवलं तीने. काका चांगला होता पण त्याचं काकींपुढे काहीच चालायचं नाही, त्यामुळे शिक्षण पण नाही झालं दहावीला गेल्यावर काकी अजूनच त्रास देऊ लागली, रोजचे कपडे, भांडी, जेवण सगळं माझ्यावर टाकून काकी दिवसभर टी व्ही बघत राहत असे.

 
     दहावीला असताना काकी दुसर्यादा गरोदर होती तिची डिलिव्हरी माझ्या परीक्षेच्या वेळीच होती त्यामुळे मला परीक्षा पण देता आली नाही काकी मनोमन सुखावली, आणि माझं शिक्षण तेव्हा राहील ते राहिलंच, काकीला बाळं झाल्यामुळे मी तिच्या बाळाला सांभाळणारी आयती कामवाली तीला मिळाली होती, काकीच्या घरी सगळं मी करत असे, त्यामुळे मी घरातचं राहू लागली. काकीची मुलं मोठी झाल्यावर तीला आता मी घरात नकोशी झाले.


       माझं वय एकोणीस झाल्यावर काकीने काकाच्या पुढे हीच आता लग्न करून देऊया असं सारखं चालू केलं, काकीनेच एक स्थळ आणलं मला काहीच बोलण्याची त्या घरात परवानगी नव्हती.

     मुलगा एका कंपनीमध्ये कामाला आहे, स्वतःच घरं आहे, पंचवीस वर्षाचा आहे, त्याच्या घरी तो आणि आई असे दोघेच असतात, एका बहिणीचं लग्न झालं आहे, तो निर्व्यसनी आहे असं सगळं चांगल आहे असं काकी काकाला सांगताना मी ऐकलं होतं, साखरपुडा काकीच्या घरी झाला, लग्न पण अगदीच साधेपणाने झाले. मी मनातल्या मनात खुश झाले होते, म्हंटल चला स्वतःच हक्काचं घरं तरी मिळालं.


     मी सरळ बोहल्यावर चढले, मुलगा दिसायला चांगला होता आणि मनातून काकीच्या जाचातून सुटलेल्याचा आनंदचं होता, मी सासरी आले.


     सासू नवरा आणि मी असं छोटंसंच कुटुंब होतं, नवरा तसा स्वभावाने चांगला होता, माझी काळजी घ्यायचा, पण जुगारी होता त्याने जुगारात स्वतःच घरसुद्धा गमावलं होतं, ज्या घरात राहत होते ते घरं भाड्याचं होतं, हे सगळं मला लग्नानंतर समजलं, काकीला हे सगळं ठाऊक होतं पण तीने मुद्दाम मला त्या घरात दिली असो...


     पण नवऱ्याला जुगाराचा नाद होता त्यामुळे कधी कधी तो दोन दोन दिवस घरी येत नसे. सासूला सांगायला गेलं तर ती म्हणत असे, तुझे सासरे त्याला समजावून थकले आणि शेवटी हार मानली त्यांनी ह्याच्या टेन्शननेच वारले ते. मी त्यांना बोलली पण असं असताना तुम्ही मुलाचं लग्न कसं करून दिलंत ती म्हणायची मला वाटतं होतं कि बायको आल्यावर त्याचा पाय घरात टिकेल. पण तसं झालं नाही.


       असं करत दोन वर्ष गेली, नवरा घरात भांडत नसे, पण त्याचा घरात जास्त पाय टिकत नव्हता, पैसे घरी देत असे, त्यामुळे आम्ही दोघी सासू - सुना नीट राहत असू, बघता बघता लग्नाला चार वर्ष झाली, घरात पाळणा हालेना, सासुसुद्धा आता आडून आडून टोमणे मारू लागली. सगळ्या तपासण्या झाल्या, दोष माझ्यात आहे, असचं सासू आणि नवरा बोलू लागले, मग इथून सुरवात झाली मला वाळीत टाकण्याची, नवरा माझ्यावर चीड - चीड करू लागला, रागात माझ्यावर हात उचलू लागला, सासू बोलेनाशी झाली.


      मी ह्या सगळ्यातून जरा वेगळं वातावरणात जावं म्हणून आता आहे ती आपल्या हॉस्पिटलची नोकरीं धरली, सासू - नवरा काहीच बोलले नाहीत, माझ्याबरोबर दोघांनी पण मोजकेच बोलणे चालू केले, आला दिवस मी रडून घालवू लागले, मला ना कोणी नातेवाईक ना कोण मैत्रीण, मी एकटी पडत गेले.

    असेच दिवस जातं होते आणि एक दिवशी रात्री सासू अचानक हार्ट अटॅक येऊन वारली. आणि मी एकटी पडले,नवऱ्याला सासूचा जरा तरी धाक होता आता ती गेल्यावर तो पण राहिला नाही. सासूला जाऊन दोनच महिने झाले होते आणि एके दिवशी नवरा त्याच्यासोबत एका बाईला घेऊन आला, आणि मला धमक्या देऊ लागला जा इथून तू, मला मुलं हवं आहे ते तू देऊ शकत नाहीस म्हणून मी दुसरी बायको करणार आहे, तीला आज घरं दाखवायला आणलं आहे.


    मी खूप घाबरले, त्याच्या हाता- पाया पडले, पण तो बधला नाही, मला बाहेर जा असं करू लागला, मला घरातून हाकलून देऊ लागला, शेवटी मी त्याला बोलले, मला दोन दिवस दे मी जाते तेव्हा तो गप्प झाला. त्या दोन दिवसांत खूप वेळा मनात आलं जीव द्यावा, स्वतःला संपवावं, पण धीर झाला नाही. नशीब मी ही नोकरी करत होते त्यामुळे माझ्या गाठीशी दोन पैसे होते, थोडे पैसे मी साठवले होते.


     नवऱ्याने ते दोन दिवस खूप त्रास दिला, माझ्या समोर त्या बाईला आत घेऊन जाऊन तिच्याबरोबर लगट करू लागला, तेव्हा मात्र मी हरले, खूप रडले, पण स्वतःला सावरले, मी लहानपणापासून संकटचं झेलून खंबीर झाले होते.


     मला नोकरी होती जास्त पगार नसला तरी उपाशी राहीन अशी अवस्था नव्हती, शेवटी मी हॉस्पिटलमधल्या एका दुसऱ्या आयाबाईच्या मदतीने भाड्याने रूम घेऊन राहू लागले. नवरा मी जाताना खुश झाला ते बघून खूप मन हललं, मी ज्या नवऱ्याबरोबर सुखाने संसार केला त्यानेच मुलं नाही म्हणून मला डावलंल होतं....त्यामुळे मीही अशी एकटी आहे...अशी ही माझी कहाणी आहे, सर्व ऐकून नेहा सुन्नच झाली.


     नेहाच्या डोळ्यातलं पाणी बघून कुंदाताई बोलल्या, मॅडम वाईट वाटून घेऊ नका पण तुम्ही पण ह्या अशा एकट्या किती दिवस राहणार, तुम्ही शिकलेल्या आहात तुम्ही भविष्यात जोडीदाराचा विचार करा... एकटीने जगणं अवघड असत अहो... नेहा बोलली माझं राहुदेत, तुम्ही आता इथे निवांत राहा, कसलीच काळजी करू नका...


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ओवी चार वर्षाची होते तीला शाळेत घालताना नेहाला काय अडचणी येतात आणि त्यातून ती बाहेर पडत नाही तो पर्यंत कोणतं मोठं संकट तिच्यावर येत )

🎭 Series Post

View all