Login

प्रेमाची वीण - भाग -7

Premachi Vin


( मागील भागात आपण बघितले - कुंदाताई आणि नेहाची चांगली गट्टी जमते, आता पुढे )


        बघता बघता ओवी चार वर्षाची होते, ओवी गुणी असते, तिचा फार काही त्रास नसे, ती तिचं खाऊन झालं कि खेळत असे, अभ्यास करत असे, ओवी बोलायला अगदीच गोड होती त्यामुळे नेहाच्या आईला ती फार आवडत असे, ती ओवीसाठी हल्ली सतत फोन करत असे.


       नेहाला खूप वाटे, आईच्या हातचं जेवण जेवावं, आईने तीला मायेने जवळ घ्यावं, पण एवढ्या पाच वर्षात आई एकदाही भेटायला आली नव्हती, बाबांच्या भीतीने ती धीर करत नव्हती, बाबा तर नेहा आपली कोणीच नाही असे घरात वागत असतं, तिचं घरात कोणी नाव घेतलेलं ही त्यांना चालत नसे. सगळंच मागे पडलं होतं.


    नेहा आईचा विचार करत एक दिवस अशीच बसली असताना तिच्या लक्षात येत कि ओवी चार वर्षाची होऊन गेली आहे तीला शाळेत घालायला हवं, पण तिला वडील म्हणून मध्ये कोणाचं नाव द्यावं, माझं नाव दिलं तर शाळेत बाकीची मुलं तीला म्हणणार तर नाहीत ना कि तुझे पप्पा कुठे असतात आईच कां नाव तुझ्या नावाच्या मध्ये, ओवीने एक - दोनदा नेहाला विचारलं होतं पण तीने तुझे पप्पा देवाघरी गेलेत असं सांगून वेळ मारून नेली होती.


    ओवीला घेऊन दोन दिवसांनी नेहा एका शाळेत गेली, तिचं ऍडमिशन झालं, ओवी शाळेत गेल्यावर टीचर किती मुलं उपस्थित आहेत ते बघण्यासाठी उपस्थिती घेत असतं, ओवीच नाव पुकारलं कि तीला वाटतं असे, सगळ्या मुलांचं मधलं नाव वेगळं आहे आणि माझंच मधलं नाव आईच आहे तीने नेहाला एक - दोनदा विचारलं सुद्धा कि मम्मी टीचर सगळ्या मुलांच्या पप्पाचं नाव घेतात पण माझ्या नावात तर तुझं नाव आहे. नेहाने बाळा आपले पप्पा नाहीत ना म्हणून टीचर मम्मीचं नाव घेतात, असं सांगून तीला म्हंटल कि मम्मा तुझे लाड करते कि नाही मग कशाला हवेत पप्पा असं बोलून तीला गप्प केलं.


     अशीच चार वर्ष जातात ओवी तिसरीला गेलेली असते, ती अभ्यासात हुशार असते, कुंदाताईनी तीला रोज देवाचं पुस्तकं वाचणे, तीला अंघोळ झाल्यावर घरातील व्यक्तींच्या पाया पडणे अशा छान सवयी लावलेल्या असतात. ओवी शाळेत स्कुलबसने जातं असे.


     एक दिवस ओवीला शाळेतून यायला उशीर होतो, कुंदाताई तीला विचारतात तर ती बोलते बसवाले काका उशिरा आले, असं दोनदा घडल्यावर मात्र त्यांनी बसवाल्याकाकांना फोन केला तर ते म्हणाले ओवीचं स्कुलगेट मधून बाहेर यायला उशीर करते.


    आता मात्र कुंदाताई आणि नेहाला काळजी वाटू लागली, त्यांनी ओवीला विचारलं असता ती काहीतरी वेगळंच सांगू लागली. बसवाले काका उशीर करतात, टीचर लेट सोडतात, असं काही बाही ती सांगू लागते. नेहाने तिच्या टीचरला कॉल केला तर त्या म्हणायला मी तिच्या बसमध्ये असणाऱ्या अजून दोन - तीन मुली आहेत त्यांना विचारून तुम्हाला कळवते.


      टीचरने कॉल करून नेहाला सांगितलं कि ओवीचे एक काका तीला हल्ली भेटायला आले होते, ओवी त्यांच्याशी बोलत राहिली म्हणून आम्हाला उशीर झाला, असं तिच्या बसमधल्या मुली बोलल्या.....आता मात्र नेहा घाबरते, कोण काका ओवीला तर कोणीच नाही आहे मग हा माणुस कोण होता.


      ओवीला विचारल्यावर तीने सांगितलं एक काका आले होते ते मला माझं पूर्ण नाव विचारत होते, मग मी त्यांना सांगितलं, तेव्हा ते माझी चौकशी करू लागले, कुठे राहतेस विचारू लागले. पण मला आपला पत्ता त्यांना नीट सांगताच आला नाही.

   
     नेहा अतिशय घाबरते आणि कुंदाताईना बोलते कोण असेल हा माणुस आणि कां ओवीला त्याने तिचं नाव विचारलं असेल, ती चार दिवस सुट्टी घेते आणि रोज नेहाला आणायला जाते चौथ्या दिवशी तीला तो माणूस दिसतो जो ओवीच्या दिशेने चालत जातं असतो, त्याला बघून तिच्या काळजात धस्स् होतं, हा तोच तिचा मित्र असतो ज्याच्यामुळे ती गरोदर राहिली होती.


      ती पाठीमागून जाऊन त्याला हाक मारते, आणि बोलते कां आला आहेस तू इथे, आणि माझ्या मुलीकडे तुझं काय कामं आहे, तर तो बोलू लागतो ती माझी पण मुलगी आहे समजलं तुला ...... 


       नेहा चिडते आणि बोलते ये तीला माझं नाव दिलंय मी तुझी कोणीही लागतं नाही ती आणि आता एवढ्या वर्षांनी कां आला आहेस तू, तुझं तर लग्न पण झालंय ना मग आता इथे कां आला आहेस तू, सुखाचा संसार कर ना बायकोबरोबर... मला माझ्या मुलीबरोबर सुखाने राहुदेत ना जा तू...


      तेवढ्यात ओवी समोरून येते आणि नेहाला बोलते, मम्मी हेच ते काका जे मला तुझं नाव विचारत होते ते, नेहा त्याला ओरडून विचारते काय कामं आहे तुझं माझ्याकडे ते सांग मला माझ्या मुलीला घेऊन घरी जायचंय. तो बोलतो मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, पण ओवीसमोर नको, तेवढ्यात नेहाला ओवीची स्कुलबस दिसते ती ओवीला बोलते बाळा तू बसने घरी जा मी जरा वेळाने येते कुंदाताईला पण सांग मी येते थोड्यावेळाने.


     नेहा त्याला बोलते इथे समोर हॉटेल आहे तिथे बसून बोलूया, तिथे दोघे जातात नेहा बोलते आता सांग कशाला आला आहेस तू इथे आणि माझ्या मुलीला कां भेटतो आहेस तू, नेहा चिडूनच बोलते, तो सांगू लागतो माझं लग्न झालं आहे पण मला मुलं नाही आहे, नेहा बोलते अच्छा आता समजलं मला म्हणून तुला ओवीची आठवण झाली कां, काहीही झालं तर माझ्या मुलीवर मी तुझी सावलीही पडू देणार नाही समजलं तुला...

   
     तो चिडून बोलू लागला, दोघांमध्ये वाद होऊ लागले तसं नेहा त्याला बोलू लागली, इथे हॉटेलमध्ये तमाशा नको, इथे जवळ एक गार्डन आहे तिथे जाऊन बोलूत, तो ओके बोलून तिच्याबरोबर निघाला, दोघे गार्डनमध्ये पोहचले,


       तो सांगू लागला, मी अमेरिकेवरून आल्यावर लगेच माझं लग्न घरातल्यांनी ठरवलेल्या मुलीबरोबर झालं, मुलगी सुंदर, हुशार होती त्यामुळे मला सुद्धा आवडली होती. तिचं स्वतःच बुटीक होतं, सगळं छान चाललं होतं.


      पण तिच्या पोटात दुखत असे अधून - मधून,  लग्नाला चार वर्ष झाल्यावर माझ्या बायकोला गर्भपिशवीचा कॅन्सर डिटेक्ट झाला  त्यामुळे गर्भपिशवी काढून टाकली आहे त्यामुळे मुलं होणे शक्य नाही त्यामुळे मला माझं मुलं ओवी हवी आहे मी तीला नीट सांभाळेन, बायको गर्भपिशवी काढल्यापासून मनाने खचली आहे सारखं तीला मुलं हवं असं वाटत राहत, ती मानसिक रुग्ण होतं चालली आहे, बरं मुलं दत्तक घेऊया तर नको बोलतेय.


    ओवी हे सगळं ऐकून खूप चिडली त्याला बोलू लागली अरे नालायका तुझी बायको मनोरुग्ण होऊ नये म्हणून तुला माझी ओवी हवी आहे कां, तुला काय वाटतं मी तुला ओवी देईन, अरे ह्या गेल्या सात - आठ वर्षात मी ओवीला कसं एकटीने वाढवलं आहे ते माझं मलाच माहिती.... आणि तुला मुलं नाही म्हणून तुला ओवी आठवली काय......जा तू इथून निघून ओवी तुला मी अजिबात देणार नाही. त्या दोघांत खूप बाचाबाची होते, आणि रागात तो बॅगमधून एक चाकू बाहेर काढतो आणि ओवीच्या हातावर वार करतो, ओवी आरडा - ओरडा करते आणि तेवढ्यात तो पळून जातो...
   
    
      ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्यातून नेहा स्वतःला कशी सोडवते ते )

🎭 Series Post

View all