Login

प्रेमाची वीण - भाग - 8

Premachi Vin
( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

भाग -8


( मागच्या भागात आपण बघितले - तो माणूस नेहाच्या हातावर वार करून पळून जातो आता पुढे )


        नेहा ओरडल्यावर गार्डनमध्ये राऊंड मारणाऱ्या दोन महिला तिच्याजवळ धावत येतात आणि विचारतात, काय झालं कोण होता तो, नेहा बोलते माझा मित्रचं होता, वार करून पळून गेला, आमच्यात भांडण झालं म्हणून असं केलं त्याने, त्यातली एक बाई बोलते तुमच्या घरी कॉल करून कोणाला बोलावू कां, नेहा बोलते हा कुंदाताई म्हणून नंबर आहे बघा माझ्या मोबाईलमध्ये त्यावर कॉल करून बोलावून घ्या.


        कुंदाताई ओवीला शेजार्यांकडे ठेवतात आणि रिक्षा पकडून पटकन दहा मिनिटात तिथे येतात आणि नेहाला घेऊन हॉस्पिटलला जातात. नेहाचा रक्ताने भरलेला हात बघून त्या पण घाबरतात.


      नेहाला ड्रेसिंग केलं जातं, मनगटावर त्याने वार केलेला असतो, डॉक्टर चौकशी करतात ते बोलतात पोलिसांना कळवावे लागेल, नेहा बोलते डॉक्टर प्लिज माझी मुलगी लहान आहे कृपया करून हे प्रकरण वाढवू नका... अगदी ती डॉक्टरांसमोर हात जोडते, प्लिज डॉक्टर असं बोलते.... बरं ठीक आहे असं बोलून डॉक्टर निघून जातात.


      हात खूप दुखत असतो, दोन तासांनी नेहा आणि कुंदाताई घरी येतात, नेहा त्यांना रडतं रडतं सगळं सांगते. ओवी पण आईच्या हाताला पट्टी बांधलेली बघून घाबरते.


     नेहा कुंदाताईना बोलते मला तर आता ओवीला शाळेत पाठवायला पण भीती वाटतेय, त्याने ओवीला पळवून नेलं तर, कुंदाताई बोलतात मॅडम तुम्ही घाबरू नका मी तीला रोज सोडायला आणि आणायला जातं जाईन, तुम्ही काळजी करू नका.


     नेहा मनातल्या मनात बोलते काय होऊन बसलंय हे, माझ्या नशिबामुळे माझ्या एका चुकीमुळे बिचाऱ्या ओवीच्या वाट्याला पण माझ्यासारखीचं फरफट आलीय, ओवीला त्या नीच माणसापासून वाचवायलाचं हवं, माझ्या नशिबात सुख लिहिलेलंच नाही बहुतेक देवाने... 


        झाल्या प्रकाराने नेहा अस्वस्थ झाली होती ती ओवीला मिठी मारून बसते, तीला आता ओवीची काळजी वाटतं होती, बरं पोलिसात जावं तर ते हा तुमचा कोण पासून सगळे प्रशन विचारतील म्हणून कोणाला सांगताही येत नव्हतं.


     आठ दिवसांनी नेहा पुन्हा हॉस्पिटलला जायला लागते. पण ती सारखी विचार करत राहते हा पुन्हा ओवीला न्यायला आला तर काय करायचं... कसंही करून ओवीला सुरक्षित करायला हवं, ती विचार करत असते, संध्याकाळचे चार वाजलेले असतात आणि कुंदाताई तीला रडतं फोन करून सांगतात..... मॅडम तो माणूस घरी आला आहे तुम्ही लगेच घरी या...


     नेहा धावतच घरी जायला निघते, नेहा घरी पोचते..... तो ओवीला मांडीवर घेऊन तिच्याशी गप्पा मारत असतो, नेहा त्याला घरी बसलेलं बसून हादरून जाते आणि बोलते तू पुन्हा आलास... तो बोलते माझी मुलगी आहे मी कधीही येईन तीला भेटायला तू मला रोकु शकत नाहीस, हो कि नाही गं ओवी असं तो हसून बोलतो, नेहाला काय करू तेच कळत नसतं.


     नेहा त्याला बोलते, तू जातोयस कि मी पोलिसांना बोलावू, तो हसून बोलतो काय सांगणार आहेस लग्नाआधी मी थेरं केली आणि त्यातून झालेली ही मुलगी, नेहा बोलते ये ओवीसमोर असलं काही बोलायचं नाही हा. तो बोलतो मग मला ओवीला घेऊन जाऊदेत...


    नेहा कुंदाताईना बोलते तुम्ही ओवीला घेऊन खाली गार्डनला जा, तो अडवतो मला माझी मुलगी दे असं ओरडून बोलतो... ती बोलते बरं तू आता जा रविवारी ये मला सुट्टी आहे आपण निवांत बोलू ह्या विषयावर... त्याला काय वाटतं काय माहित पण तो जायला निघतो आणि बोलतो रविवारी मी माझ्या मुलीला घेऊन जाणारचं... बघ तू....
     

    त्याच्या धमकीने नेहा घाबरते आणि मनातल्या मनात बोलते रविवारला अजून चार दिवस आहेत काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा.

     ती विचार करत राहते, दूर कुठेतरी जावं तर पुन्हा नवीन घरं, नोकरीं सगळंच नव्याने कसं होणार, ही नोकरीं बरी आहे, कुंदाताई ओवीला छान संभाळतात. पुन्हा नव्याने सुरवात करायची तर कसं होणार आणि अजून किती दिवस मी ह्या सगळ्यापासून पळणार... पण आता माझ्या लेकीला त्या नालायक माणसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी काहीतरी मार्ग काढायलाचं हवा.


     पण चार दिवस जातंच नाहीत, दोन दिवसांनीच शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन येतो आणि जोरजोरात नेहाचा दरवाजा वाजवतो, सगळे आजूबाजूचे शेजारी जमा होतात, तो धिंगाणा करतो माझी मुलगी मला दे, नशेत ओरडत राहतो, कसेबसे आजूबाजूचे लोक त्याला हाकलून देतात. नेहा आणि कुंदाताई रात्रभर बसून विचार करतात हे असचं होतं राहणार आता ह्यावर पर्याय काय...


        ती रात्र सरते, आणि दुसऱ्या दिवशी नेहाचे घरमालक तीला येऊन बोलतात तुम्ही लवकर घर खाली करा, माझ्या सोसायटीमध्ये हे असले तमाशे मला सहन होणार नाहीत. लवकरात लवकर घर सोडून जा, ह्या वाक्याने ती अजूनच गळून पडते, घरमालक तावातावाने बोलून निघून जातात.


       नेहा कोंडीत सापडते ती कुंदा ताईना बोलते असं करू कां, पुणेला शिफ्ट होते, सध्या ओवीचं शैक्षणिक वर्ष संपायला दोनच महिने उरलेत, त्यामुळे हे वर्ष वायाच जाऊदेत, आता तीला त्या शाळेत पाठवायला भीतीच वाटतेय,इथे राहायला पण नकोच.  त्यात रविवारी त्याने येऊन पुन्हा धिंगाणा केला तर काय करायचं, उद्या - परवा मध्येच काहीतरी निर्णय घ्यायला हवा आहे.


      ओवीला सुखरूप वाचवण्यासाठी मला तात्काळ काहीतरी मार्ग शोधावाचं लागेल, तीला घेऊन आधी नवीन ठिकाणी जाईन, दोन महिने सगळं सेट करेन आणि मग ओवीला हॉस्टेलला ठेवते आणि मी कुठेतरी राहीन, नवीन नोकरीं बघते, उद्यापासून नोकरीं शोधायला लागते.


     आईने दिलेले दागिने तसेच आहेत आणि थोडीफार सेविंग पण आहे. त्यात कुठेतरी एकटीसाठी भाड्याने घरं बघेन, तुम्हाला पण माझ्याबरोबर चला म्हंटल असतं पण तुमची नोकरीं इथे आहे, तुम्हाला मी उगाच अडकवल्यासारखं होईल.


       कुंदाताई बोलतात, मॅडम मी पण येणार तुमच्याबरोबर मला ही आता ओवीशिवाय राहवणार नाही, तुम्ही न्याल तिकडे मी यायला तयार आहे.मी नवीन ठिकाणी नोकरीं शोधेन, काहीच नाही जमलं तर अगदीच स्वयंपाकाची कामं करेन मी. नेहा बोलते बरं चालेल, उद्या - परवा मध्ये त्या नालायक माणसाला कळु न देता गुपचूप इथून पळून जाऊया, म्हणजे तो ओवीला त्रास देणार नाही.
  
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहाची नवीन नोकरीं आणि तिचं नवीन जागेत शिफ्ट होणं त्यात तिचे बाबा अचानक वारतात )
   

   

🎭 Series Post

View all