- भाग - 9
( मागच्या भागात आपण बघितले - नेहाला घरमालक घर सोडून जायला सांगतात, त्यामुळे ओवी पुणेला शिफ्ट व्हायचा निर्णय घेते आता पुढे )
नेहा, कुंदाताई आणि ओवी शिफ्ट व्हायचं ठरवतात, पण पुणेला जाऊन राहायचं कुठे हा प्रशन असतोच, पण कुंदाताई बोलतात मॅडम मी एक सुचवू कां, कोणी मैत्रीण किंवा मित्र तिकडचा आहे कां त्यांच्याशी बोलून सध्या अगदीच साधीशी पण रूम घेऊन आपण राहूया, मग तुम्ही नोकरीला लागल्यावर आपण चांगली रूम घेऊया. सिंगल रूम असली तरी चालेल, आपण करू ऍडजस्ट.
नेहा बोलते असं कोणीच नाही आहे ओळखीचं, कुंदाताई बोलतात आपल्या हॉस्पिटलमधली एक नर्स आहे तिचं माहेर पुणे आहे आपण तीला विचारूया कां, नेहा बोलते चालेल ना, लगेच तीला कॉल करूया.
नेहा त्या नर्सला कॉल लावते आणि देवाच्या कृपेने त्या नर्सच्या माहेरचा एक व्यक्ती रूम संबंधित एजन्टचं चं कामं करत असतो, त्याच्याशी बोलून नेहा एक रूम आहे कां विचारते तो बोलतो आहे पण असं अर्जेन्ट सांगितलं म्हणून मी माझं कमिशन दोन हजाराने जास्त घेईन, नेहा बोलते बरं चालेल. तुम्ही मला व्हॉटसप वर रूमचे फोटो पाठवा मी कळवते थोड्याच वेळात, नेहा त्याने पाठ्वलेले फोटो बघून एक रूम निश्चित करते आणि त्याला सांगते आम्ही उद्या येतो आहे.
रूम रिकामीच असते त्यामुळे तो माणूस नेहाला बोलतो तुम्ही या मी तुम्हाला चावी देतो. आणि अशाप्रकारे नेहा पुणेला शिफ्ट होते रात्रीत गुपचूप रूम सोडून निघते. ती घरमालकांना पण सांगते कि कोणालाच काही बोलू नका आणि माझा मोबाईल नंबर त्या मला त्रास देणाऱ्या मुलाने मागितला तर देऊ नका, मी तिकडे गेल्यावर मोबाईल नंबर चेंज करणार आहे.
पुणेला पोचल्यावर तो माणूस तिथे उपस्थितचं असतो तो नेहाला रूमवर घेऊन जातो, नेहाला रूम आवडते छोटीशीच दोन खोल्यांची रूम असते पण त्याला एक छोटी गॅलरी पण असते ती नेहाला खूप आवडते. कुंदाताई आणि ओवी पण रूम बघून खुश होतात.
दुसऱ्या दिवसापासून नेहा नोकरीच्या शोधात असते, आणि दहा दिवसांनी एका शाळेत तीला सिनियर के जी च्या मुलांना शिकवण्याची नोकरीं मिळते, शाळा सुंदर असते. नेहाला शाळा खूप आवडते. सी बी एस सी बोर्डची स्कुल असते.
नेहाच्या नोकरीचं पक्क झाल्यावर ती ओवीच्या स्टेट बोर्डच्या शाळेसाठी शोधाशोध करते आणि फायनली ती ओवीचं एका चांगल्या शाळेत ऍडमिशन घेते. नेहाचं सगळं आठ दिवसांत सेट होतं. तिच्या शाळेतला स्टाफ पण चांगला को ऑपरेटिव्ह असतो. नेहा नवीन शाळेत चांगलीच रूळते.
ओवीची शाळा दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असे, त्यामुळे कुंदाताई पण त्यांच्या आजूबाजूच्या बायकांना सांगून ठेवतात कि दुपारच्या वेळात कोणाकडे काही स्वयंपाकाची कामे असतील तर प्लिज सांगा, तर शेजारची एक बाई बोलते ताई समोर तिथे एक मोठी बिल्डिंग आहे तिथे तुम्हाला कामं मिळेल तुम्ही तिकडे जाऊन भेटून या, कुंदाताई त्या बाईने सांगितल्याप्रमाणे त्या बिल्डिंगमध्ये जातात आणि त्यांना तिथे दोन ठिकाणी चपाती - भाजी करण्याचं कामं मिळतं.
नेहाची आई तीला अधून - मधून कॉल करत असते, अजूनही आठ वर्ष झाली तरी नेहा बाबांमुळे घरी गेलेली नसते. आताशा भावाचं शिक्षण पूर्ण होऊन तो चांगला जॉबला ही लागलेला असतो, भाऊ अधून - मधून आई फोनवर बोलत असताना काय ताई कशी आहेस, कसं चाललं आहे सगळं असं दोन - तीन वाक्य बोलून फोन पुन्हा आईकडे देत असे.
सगळ्या पाहुण्यांना नेहा बंगलोरला नोकरीसाठी असते असंच सांगितलेलं असतं आणि लग्न करायचं नाही असं म्हणतेय असचं बाबा सांगत असतं. आई पण कोणी काही विचारलं कि बाबांची री ओढत असे, ह्या आजकाल च्या मुली ह्यांना लवकर लग्न करायचं नसतंच हल्ली असं बोलून आई पण वेळ मारून नेत असे.
नेहाच्या शाळेत स्टाफ खूप चांगला असतो आणि नेहा पण खूप हुशार असल्यामुळे ती तिथे चांगलीच रूळते, असेच सहा महिने जातात, आणि नेहाच्या शाळेतला एक कलीग तिच्या प्रेमात पडतो, त्याचं ते मधाळ बोलणं, त्याचं ते नेहाकडे सारखं आडून - आडून बघणं तिच्या लक्षात येत असतं पण ती त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करते. आणि तिच्या वर्गातल्या मुलांना शिकवायचे कामं करते.
एके दिवशी नेहा नेहमीप्रमाणे घरी येते, ओवी आणि कुंदाताई बोलत बसलेल्या असतात, ती फ्रेश होऊन बसते तोपर्यंत ओवी तिच्याजवळ येते आणि बोलते...
"आई, आपले पप्पा माझ्याबरोबर का नाही? ते कुठे आहेत?" माझ्या एका फ्रेंडचे पप्पा बाहेरगावी गेले होते त्यांनी तिकडून तीला छान छान कंपासबॉक्स आणला होता तो ती वर्गात सर्वाना दाखवत होती आज... नेहाचा चेहरा पडतो तीला काय उत्तर द्यावे तेच कळत नाही. ओवी आता तिसरीला गेलेली असते. त्यामुळे तीला हल्ली असे प्रशन पडत असतं.
आणि नेहा अजूनही नेहमीप्रमाणे ओवीची चर्चा टाळते, आणि बोलते "हे बघ ओवी आई काय करतेय आज तुझ्यासाठी......तुझे आवडते नूडल्स....आणि नेहा किचनमध्ये जायला निघाली.
पण ओवी आज तिच्या आईच्या मागे किचनमध्येच उभी होती, जणू काही ती आज तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता नेहाला तिथून हलूच देणार नव्हती. पण नेहाने नेहमीप्रमाणेच तिच्या गोड बोलण्याने ओवीचं मनोरंजन केले. तीला आपण आज संध्याकाळी फिरायला जाऊ असं बोलून तीने ओवीला खुश केलं...
नेहा मनात बोलू लागली, ओवी आता मोठी होतेय, ती हा प्रश्न पुन्हा विचारेल, पण मी काय उत्तर देणार आठ वर्षांची ओवी तीला काय सांगणार मी...
नेहा देवाजवळ दिवा लावते आणि देवाला बोलते - बाप्पा - तूच तारणहार आहेस, आतापर्यंत सगळं सांभाळून घेतलं आहेस पुढे पण घे, मला सतत ओवीची काळजी असते, तिच्या भविष्याची चिंता, तीला पुन्हा कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ नये ही काळजी असते, बर्याच वेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, स्वत: ला समजावून सांगत, मुलीच्या भावनिक गोष्टींनी डगमगू न देता , दिवसेंदिवस स्वत: ला बळकट करत लढत राहतेय ..सगळं तू बघतो आहेस ना...अशीच कृपा ठेव माझ्यावर असं बोलून ती गॅलरीत जाऊन बसते.
आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर तिच्या भावाचा कॉल येतो, असा अवेळी कधी कॉल न करणाऱ्या भावाचा कॉल बघून ती पटकन कॉल उचलते आणि बोलते हा बोल ना, तिकडून तो रडतच बोलतो ताई बाबा गेले तू लवकर घरी ये...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहा जवळजवळ नऊ वर्षांनी तिच्या घरी जाणार आहे )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा