भाग - 10
( मागच्या भागात आपण बघितले - नेहाच्या भावाचा तीला कॉल येतो आणि तो तीला सांगतो - ताई बाबा वारले..... आता पुढे )
नेहा कुंदाताईना बोलते, काकी दोन, तीन दिवस ओवीला सांभाळाल ना मी आईकडे जाऊन येते, तिथे पाहुणे असतील सगळे त्यामुळे मला ओवीला नेता येणार नाही, आई - बाबांनी सगळ्यांना मी नोकरीनिमित्त एकटीच बाहेर राहते असं सांगितलं आहे, ओवीबद्दल कोणालाच काही माहीत नाही आहे, बाबा वारलेत त्यामुळे सगळेच पाहुणे जमा झाले असतील मी लगेच रात्रीच्या ट्रेनने मुंबईला निघते, कुंदाताई बोलतात मॅडम तुम्ही निश्चिन्त होऊन जा मी आहे ओवीजवळ.
नेहा रडत रडत तिची पटकन बॅग भरते आणि ओवीला बोलते मी आजीकडे जाऊन येते दोन दिवसांत तू शहाण्यासारखी वाग, ताईना त्रास देऊ नकोस, ओवी हा आई मी राहीन नीट, तू रडू नकोस असं बोलते, नेहा घाईघाईत निघते, प्लॅटफॉर्मवर आल्यावर लगेच तीला ट्रेन भेटते, ती ट्रेनमध्ये बसते. तीला बसल्या बसल्या सगळ्या जुन्या आठवणी आठवून रडायला येत.
लहानपणापासून बाबांनी कधी कुठल्या गोष्टीला विरोध केला नाही, पाहिजे ती वस्तू घेऊन दिली, कधी रागाने ओरडले नाहीत, तिच्या हुशारीच त्यांना सतत कौतुकचं असायच. शिक्षणात तीला कायम त्यांनी प्रोत्साहनचं दिलं. नंतर नंतर ती वीस वर्षाची झाल्यानंतर तिचं मित्र - मैत्रिणींबरोबर फिरणं, हिंडण जास्तच वाढल्यावर बाबा तीला ओरडू लागले, ते पण जास्त नाही.
पण तिचं हे लग्नाआधीचं प्रेग्नेंट चं प्रकरण झालं आणि बाबा चिडले, कायमचे दुरावले ते आतापर्यंत दुरावलेच... आई त्यांच्याबद्दल फोनवर बोलायची पण त्यांनी नेहाशी झाल्या प्रकरणावरून अबोला धरला होता. त्यांची मनधरणी तरी नेहा काय करणार होती तिची चूकच त्यांच्या दृष्टीने खूप मोठी होती. विचार करत नेहा मुंबईला पोचली.
नेहा सकाळी लवकरचं ठाणे स्टेशनला पोचली, रिक्षा पकडून घरी गेली, बिल्डिंगखाली खूप गर्दी झाली होती, सगळे तिची वाट बघत होते, आई आणि दादाने तीला पाहून हंबरडा फोडला. सगळेच जोरजोरात रडू लागले, मग आजूबाजूच्या लोकांनी येऊन त्या तिघांना सावरले.
बाबांना हार्ट अटॅक आला होता, संध्याकाळी चहा पिऊन खुर्चीत बसले असतानाच त्यांच्या छातीत जोरात दुखू लागलं, डॉक्टरकडे नेईपर्यंत त्यांनी रिक्षातचं जीव सोडलेला होता. आई रिक्षात ओरडू लागली, हॉस्पिटलला नेल्यावर त्यांनी बाबांना मृत घोषित केलं, त्यांना घरी आणलं गेलं.
दादा बोलू लागला- बाबा दोन दिवस सारखे तुझे लहानपणीचे फोटो बघत होते , जुना अल्बम काढून बसत होते. नवीन फ्लॅटमध्ये नेणार होतो बाबांना दोन महिन्यांनी, ते खूप खुश होते मोठ्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी, आणि अचानक हे असं झालं, देवाच्या मनात काहीतरी वेगळंचं होतं.
बाबांच्या नेण्याची तयारी करण्यात आली, त्यांना नेताना तिघे पण खूप रडले, बाबांना नेण्यात आलं, संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले, घरात आई, भाऊ आणि नेहाचं उरले.
आई बोलू लागली त्यांनी तुझ्याशी बोलायला हवं होतं ना, आता बघ सगळंच राहून गेलं. ओवीला तर त्यांनी एकदाही बघितलं नाही, मी व्हिडिओ कॉलवर तरी तीला बघितलं आहे, सगळंच मागे ठेवून गेले बघ...
भाऊ बोलू लागला, ताई नवीन फ्लॅट घेतला आहे टू बी एच के चा- मुलुंडला, दोन महिन्यात शिफ्ट होणार आहोत. इथे सगळे शेजारी तुला ओळखतात ना म्हणून तुला इथे बोलावता येत नव्हतं त्यात बाबा तुझ्याशी बोलायला तयार नव्हते, आता नवीन घरी तू कधीही बिनधास्त ये, ओवीला पण मला बघायचं आहे, सगळंच मागे पडलं आहे, त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता, नेहा त्याचं बोलणं ऐकतच राहिली.
भावाला पण नेहाने जवळजवळ नऊ वर्षांनी बघितलं होतं तो आता चांगला उंच झाला होता, चांगला नोकरीला लागला होता. तुझं कसं चाललं आहे, ओवी कितवीला आहे असं सगळी चौकशी भावाने केली. भाऊ सांगतो ताई माझं पण लग्न करायचं आहे, मी मुलगी बघून ठेवली आहे पण लग्नाआधी नवीन फ्लॅटवर राहायला जाऊन मग बाबांना सांगणार होतो पण बाबांचं हे असं झालं... आईला माहित आहे मुलगी माझ्याचं ऑफिसमध्ये आहे. नेहा बरं आरामात मला तिचा फोटो दाखव हा असं बोलते.
दुसऱ्या दिवशी नेहा आईला बोलते आई मी उद्या निघते आणि दहाव्या दिवशी येते आणि मग बाराव, तेरावं अशी दोन्ही कार्य झाली कि पुन्हा जाईन ओवी तिकडे कुंदाताईकडे आहे.
आई रडून बोलते राहा ना अजून थोडे दिवस मला आधार वाटेल, नेहा बोलते आई मी ओवीला घेऊन येईन नवीन घरी तुम्ही राहायला गेल्यावर, पण आता नको, तीन - चार महिन्यांनी येईन ओवीने पण मुंबई कधी बघितली नाही आहे तीला घेऊन येईन मी चार - पाच दिवसांसाठी...
नेहा तिसऱ्या दिवशी निघते आई तीला बिलगून खूप रडते, भाऊ पण बोलतो ताई आठ दिवसांनी ये मी वाट बघतोय, हो बोलून जड पावलांनी नेहा रडतंचं निघते.
नेहा घरी येते, ओवी शाळेत गेलेली असते, कुंदाताईनी स्वयंपाक करून ठेवलेला असतो, नेहा फ्रेश होते आणि मग दोघी जेवायला बसतात, नेहा कुंदाताईना सगळं सांगते बाबांचं कसं झालं ते, आणि सांगते मला पुन्हा दहाव्या दिवशी जावं लागेल तुम्हांला ओवीने ह्यावेळी काही त्रास नाही ना दिला, कुंदाताई बोलतात मॅडम काही नाही अहो त्रास, अश्या वेळी तुमचं जाणं गरजेचं आहे, जा तुम्ही आहे मी, आठ दिवस पटकन निघून जातात, नेहा पुन्हा मुंबईला जाते.
बाबांचं कार्य होतं आणि आणि नेहा पुन्हा पुण्याला जायला निघते, ह्यावेळी मात्र भावाच्या डोळ्यात पाणी असतं तो बोलतो ताई मी पण तुझ्याशी न बोलता दुरावा राखूनच राहिलो माफ कर मला, पण काही गोष्टी काळानुसार बदलतात, तसा मी बदललो आहे माझा तुझ्यावर आता कसलाही राग नाही,
झालं गेलं विसरून जाऊ आपण, मी तुला नियमित कॉल करेन, आणि माझ्या होणाऱ्या पत्नीला पण मी तुझ्याबद्दल सांगितलं आहे तीला पण तुझ्याशी बोलायचं आहे, आम्ही दोघे मिळून एक दिवस तुला कॉल करू किंवा जमलं तर पुण्यात येऊन ओवीला पण बघून जाऊ.
नेहा बोलते हो नक्की ये, नऊ वर्ष रक्षाबंधन पण नाही केलं आपण ह्यावर्षी रक्षाबंधनला नक्की ये, ओवी पण मामाला बघून खुश होईल.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहा भावाच्या सांगण्यावरून भविष्यात लग्न करेल कि नाही ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा