Login

प्रेमाची वीण - भाग -11

Premachi Vin
भाग - 11

( मागच्या भागात आपण पहिले - नेहा आईकडे जाऊन येते भाऊ तिची नऊ वर्षाने प्रेमाने चौकशी करतो आता पुढे )


          नेहा घरी येते, फ्रेश होते आणि कुंदाताई आणि ओवीला सगळं सांगते, ओवी मुंबईला जायचं ऐकून खूप खुश होते, आणि आनंदाने उड्या मारायला लागते...नेहा बोलते अगं हो एवढ्यात नाही आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये जाऊया आठ दिवस.


        नेहा दुसऱ्या दिवसापासून शाळेत जायला पुन्हा सुरवात करते, ह्या शाळेत तीने कोणालाच ओवीबद्दल सांगितलेलं नसतं, ती आणि तिची एक काकी एकत्र राहतात असं तीने सर्वाना सांगितलेलं असतं.


     ओवीबद्दल सांगितलं कि लग्नाआधी झालेलं मुलं ह्याच नजरेने तिच्याकडे बघितलं जाईल असं नेहाला वाटे त्यामुळे ती त्याबद्दल जास्त कोणालाच सांगत नसे.


      नेहा शाळेत तिचं शिकवायचं कामं मन लावून करत असे, अल्पवधीतच मुलांची पण ती आवडती टीचर बनली होती. हळूहळू तिच्या लक्षात येत कि तिच्यावर लाईन मारणारा तिचा कलीग अनिकेत हल्ली तिच्याशी जास्तच जवळीक साधू लागला आहे.

    
         अनिकेत, वय-  सत्तावीस, दिसायला सुंदर, आई - वडिलांचा एकुलता एक मुलगा, उंचपुरा, घारे डोळे, गोरा रंग, त्याचं ते सुंदर राहणं, त्याचं व्यक्तिमत्व आकर्षित होतं, त्याचं ते मधाळ बोलणं नेहालाही कधी कधी भुरळ घालत असे. त्याची समोरच्याशी बोलण्याची, त्याच्यात समरस होण्याची वृत्ती, त्याची काळजी करणं, प्रेमाने चौकशी करणं अगदीच आवडणार असे. पण नेहा त्याच्याशी जवळीक साधणे टाळत असे कारण आपण त्याच्यात गुंतत जाऊ अशी तीला भीती वाटतं असेल.. नेहा रोजचं तिचं कामं करून घरी येत असे.


       नेहा संध्याकाळी घरी आल्यावर गॅलरीमध्ये बसून समोरच्या रस्त्यावरच्या जाणाऱ्या लोकांना बघत बसली होती, गॅलरी ही तिची अतिशय आवडती जागा, नेहमी हयाच जागेवर बसून ती तिचा भूतकाळ आठवत बसायची, एका चुकीची शिक्षा, एकट्या नेहाच्या पदरात ओवीला टाकून गेलेला तिचा मित्र, जग पुढे जात होतं, पण ह्या आठवणी आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती, त्यातून मनावर झालेली जखम तीला भरून काढता येत नसे.


     तीला पण इतर मैत्रिणीप्रमाणे आपला पण सुखी संसार असावा असंही कधी कधी वाटतं असे. पण आता कोण मला स्वीकारणार असा मनात विचार येऊन ती तिचं नवरी होण्याचं स्वप्न बाजूला ठेवत असे. ओवीसकट आपल्याला कोणीच स्वीकारणार नाही हे तीला माहित होतं. त्यामुळे ती तो विचार मनातून काढून टाकत असे.

   
    आज तीला खूप अस्वस्थ वाटतं होतं, कारण उदया ओवीचा नववा वाढदिवस होता. नऊ वर्ष ती एकटीच ओवीला घेऊन हा गाडा ओढत होती, तिलाही कोणाच्या आधाराची गरज वाटतं असे आणि हल्ली शाळेतला कलीग अनिकेत तिच्या प्रेमात पडत चालला आहे हे तीला दिसून येत होतं पण नेहा वयाने त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती पण तीने स्वतःला खूप मेंटेन ठेवल्यामुळे तिचं वय जास्त वाटतं नसे. कोणीतरी आपल्यावर प्रेम करावे एवढी आपली लायकीच नाही असं तीला वाटतं असे. त्यामुळे ती अनिकेतपासून शक्य तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करत असे.

   
      ओवीचा वाढदिवसाच्या दिवशी ओवी तीला नेहमी म्हणे, आई - माझ्या मैत्रिणी आई - बाबांबरोबर पार्टी करतात, वाढदिवसाच्या दिवशी कुठेतरी लांब फिरायला जातात, आपले बाबा नाहीत पण तू पण कसलाच मोठा प्रोग्राम करत नाहीस, घरीच आपण केक कापतो आणि तू, मी कुंदाताई बाहेर जेवायला जातो, बस एवढंचं आपलं सेलेब्रेशन असतं.


        ओवीचं बोलणं आठवून नेहा मनात विचार करते ह्यावेळी आपण ओवीच्या चार - पाच मैत्रिणींना बोलवून आणि जरासं घर सजवून वाढदिवसाच्या दिवशी ओवीला खुश करूया कां, ती गॅलरीमधून उठते आणि कुंदाताईना बोलते ओवीचा उदया वाढदिवस आहे तर मी त्यासाठी थोडंसं डेकोरेशनचं सामान घेऊन येते, आणि मुलांसाठी पाव - भाजीच सामान पण घेऊन येते आपण ओवीच्या मैत्रिणीसाठी पाव - भाजी बनवूया आणि केक पण कापू, कुंदाताई म्हणतात अरे वा मॅडम खूप छान आयडिया आहे, मी आहेच मदतीला, छान साजरा करू वाढदिवस, नेहा बाजारात जायला निघते.

   
    नेहा वाढदिवसासाठी दुसऱ्या दिवशी शाळेत हाफ डे टाकते आणि लवकर घरी जाण्यासाठी निघते, तेवढ्यात तीला समोरच्या बसस्टॉप वर थांबलेला दिसतो अनिकेत तिच्यासाठीचं थांबलेला असतो तो तीला हाय करतो आणि बोलतो मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, ती मनातल्या मनात समजून जाते ह्याला काय बोलायचं असणार पण तरीही ती हा बोल ना असं म्हणते.

   
     अनिकेत स्पष्टचं बोलतो - नेहा मला तू खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, नेहा बोलते अरे अनिकेत माझं वय काय तुझं वय काय, केवढं अंतर आहे बघ आपल्यात.... अनिकेत बोलतो पण वयाचा मला काहींचं प्रॉब्लेम नाही आहे अगं, माझ्या मनातल्या फीलिंग्स मी तुला आज धाडस करून सांगितल्या आहेत, प्लिज तू नकार देऊ नकोस.


       नेहा बोलते - अरे पण मला ह्या सगळ्यात नाही पडायचं आहे, हे प्रेम वैगेरे मला माझ्या आयुष्यात नकोय, बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी येत, ते बघून अनिकेत अगदीच भावुक होतो आणि बोलतो अगं पण कां, नकार देण्याचं काही कारण तर असेल ना...


    नेहा बोलते बरं आज मला लवकर घरी जायचं आहे आपण निवांत ह्या विषयावर बोलू असं बोलून तो विषय टाळून ती जायला निघते, अनिकेत तिचा हात पकडतो आणि बोलतो, खरंच माझा विचार कर माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे अगं.  नेहा बरं सांगते लवकरच असं बोलून निघते आणी तेवढ्यात तिची बस येते ती त्यात बसून घरी जायला निघते.

 
    घरी आल्यावर दुपारी सगळं आवरून कुंदाताई आणि ती ओवीच्या वाढदिवसाच्या तयारीला लागतात, संध्याकाळी ओवीच्या पाच मैत्रिणी घरी येतात, ओवी खूप खुश होते, नेहा हैप्पी बर्थडेचं सॉंग लावते, सगळ्या मैत्रिणी हैप्पी बर्थडे बोलून टाळ्या वाजवतात, ओवी केक कट करते, नेहा आणि कुंदाताईना केक भरवते. सगळ्या मैत्रिणी ओवीच्या जवळ जाऊन तीला गिफ्टस देतात ते बघून ओवी खूप खुश होते.


    नेहा सगळ्या मुलींना पाव - भाजी देते, खाऊन मुली छान खेळतात, जवळ जवळ तीन तासांनी सगळ्या आपल्या घरी जातात, ओवी सगळी गेल्यावर नेहाला मिठी मारून बोलते आई खूप खूप थँक यु, छान झाला बर्थडे...
   

    वाढदिवसाचा दिवस संपतो, ओवी दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना बसमध्ये विचार करत जाते आता त्या अनिकेतला कसं आणि काय उत्तर द्यावं आणि ओवीबद्दल बोललं तर तो शाळेत कोणाला चुकून बोलला तर माझ्याकडे बघण्याचा लोकांचा नजरिया बदलेल...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत ओवी अनिकेतला काय उत्तर देते ते )


🎭 Series Post

View all