Login

प्रेमाची वीण -13

Premachi Vin
भाग - 13


( मागच्या भागात आपण बघितले - नेहाचा भाऊ तीला बोलतो - लग्नाची बोलणी करायची आहेत तु मुंबईला ये आता पुढे )


             नेहा भावाचा फोन ठेवल्यावर मनातल्या मनात बोलते - ह्याच्या सासरच्या मंडळींना खोटं सांगायचं पण त्यानंतर लग्नात आलेल्या पाहुण्यांना काय सांगणार आहोत - लग्नाला सगळे पाहुणे विचारतील ही छोटी मुलगी कोण असं तेव्हा काय उत्तर देणार सगळ्यांना, कारण आई - बाबांनी सगळ्या नातेवाईकांना माझं अजून लग्न झालेलं नाही आहे, तीला लग्न करायचं नाही आहे असंचं सांगितलं आहे.


           काय करावं ह्या विचारात ती आईला कॉल करते, आई बोलते - अरे हो , हा प्रशन आहेच, तसंही बाबांना अजून वर्ष झालेलं नाही आहे त्यामुळे लग्न तसं काही फार थाटामाटात नाही आहे पण तरीही शंभर - दीडशे माणसं तरी होतीलच. लग्नघर असल्यामुळे तुझ्या आत्या, मावश्या आणि त्यांची मुलं घरी येतीलच, आणि ओवी तिथे असणारच...सगळे चौकशी करतीलच.


        आई बोलते - असं सांगूया कां कि नेहाने पुण्यात एक मुलगी दत्तक घेतली आहे-  तिच्या मैत्रिणीचं आणि तिच्या नवऱ्याचं ऍक्सीडेन्ट झालं होतं त्यांची दोन वर्षाची मुलगी आई - वडील वारल्यावर एकटी पडली होती, आणि त्यांचं लव्ह म्यॅरिज असल्यामुळे कोणी नातेवाईक बोलत नव्हते, त्यामुळे त्या मुलीला अनाथाश्रमवाले नेण्यापेक्षा नेहाने तीला दत्तक घेतले आणि तिचा सांभाळ केला.... नेहा बरं तुला हे योग्य वाटतं असेल तर हे सांगू असं बोलून नेहा फोन ठेवते.


     नेहा फोन ठेवल्यावर कुंदाताईना बोलते म्हणूनच मी नऊ वर्ष सगळयांशी संबंध तोडले होते हे असं सगळं ओवीबद्दल सगळे प्रशन विचारणार हे होणारचं होतं त्यामुळे मी एकटी असते तिचं बरी आहे.


       नेहा ओवीला सांगते आपल्याला दोन दिवसासाठी मुंबईला जायचं आहे, मामीला भेटायला, मामाचं लग्न आहे, ओवी एकदम खुश होते आणि आई कधी जायचं असं विचारते - नेहा बोलते - शुक्रवारी जायचं आहे रविवारी रिटन येऊ आपण. मी आज शाळेत शुक्रवारची सुट्टी टाकते, शनिवार तर असतेच सुट्टी..

       
        पटकन चार दिवस निघून जातात, कुंदाताई त्यांच्या एका लांबच्या बहीणकडे दोन दिवसासाठी जातात आणि ओवी आणि नेहा मुंबईला जायला निघतात.


       ओवी फार खुश असते, मुंबई बघितल्यावर ती अजूनच खुश होते, नेहा आणि ओवी घरी पोचतात, ओवीला बघून आजी आणि मामा पण खुश होतात. दुसऱ्या दिवशी भावाच्या सासरचे सगळे पाहुणे घर बघायला आणि लग्नाची बोलणी करायला येणार असतात म्हणून नेहाची आई, ओवी आणि नेहा जरा मार्केटला जाऊन काही सामान घेऊन येतात. ओवीला नवीन - नवीन ड्रेस आणि खेळणी घेतात.


    दुसऱ्या दिवशी भावाची होणारी बायको, तिच्या दोन बहिणी आणि तिचे आई - वडील,  काका - काकी अशी माणसे येतात - लग्नाची बोलणी होते एक महिन्याने लग्नाचा मुहूर्त काढला जातो त्याच्या दोन दिवस आधी साखरपुडा ठेवला जातो, भावाची होणारी बायको शुभ्रा चांगली असते, सालस असते मुलगी, ओवीला जवळ घेऊन तिच्याशी गप्पा मारते, नेहाला पण ताई, ताई करत असते.


         नेहा सगळं झाल्यावर घरी जायला निघते, ओवी आपण अजून राहूया असा हट्ट करत असते, नेहा बोलते आपण एक महिन्यांनी मामाच्या लग्नाला येणार आहोत तेव्हा आठ दिवस राहूया, तेव्हा बरं असं बोलून ओवी रडायचं थांबते.

   

      आई बोलते - नेहा लग्नाच्या जरा आठ - दहा दिवस आधी ये हा, खरेदी आणि बाकीची तयारी पण आहेचना, तुझी मावशी पण येणार आहे आठ दिवस आधी... बरं बघते सुट्टीचं असं बोलून दोघी निघतात...

        एक महिन्यांनी दोघी पुन्हा लग्नाला येतात, लग्न व्यवस्थित पार पडत, शुभ्रा पण चांगली असते, आईशी तर अगदीच मुलीसारखं वागत होती ते बघून नेहाची आईबद्दलची चिंता कमी होते.


          नेहा चार दिवसांनी जायला निघते, त्यावेळी मात्र आई हयावेळी बोलते - नेहा तु लग्नाचा कां विचार करत नाहीस, असाच तुझ्यासारखा एकटा असणारा जोडीदार तुला नक्कीच मिळेल, सुख - दुःखाची देवाण - घेवाण करायला जोडीदार हवाच अगं, आणि तुझी आवड - निवड जपणार कोणीतरी तुलाही हवंचं कि...


       शुभ्रा पण बोलते - ताई तुम्ही आई बोलतायत तर एकदा विचार तरी करा, विवाह मंडळात नाव नोंदवलं तर नक्कीच कोणीतरी  मिळेल असं मला ही वाटतं..आपला माणूस असणं वेगळंच असतं अहो... त्याच्याकडे आपली दुःख शेअर करता येतात आपलं हक्काचं घरं मिळेल तुम्हाला, किती दिवस तुम्ही अशा ओवीला घेऊन भाड्याच्या घरात राहणार आहात, कुठेतरी स्थिरता हवीच ना....


        नेहाला शुभ्राचा एक शब्द मात्र मनोमन पटला - आपला माणूस... नेहा बोलते अग पण कोण कुठला तो गळ्यात माळ घालताच आपला कसा होईल, वीस - एकवीस वयात ते ठीक असतं गं, त्यावेळी शारीरिक आकर्षण पण असतं, आता पस्तीशी ओलांडली आहे आता हे सगळं स्वीकारणं आणि संसारात पडणं मला जमेल कां. आणि हे सगळं नीट होईल कां, भविष्यात अजून त्रास झाला तर, त्यापेक्षा आपणचं आपलं जीवननाट्य आहे तसं ढकलूया असं सध्या तरी वाटतंय. तरी पण बघूया, सध्या तरी मी काही सांगत नाही..मी निघते आता असं बोलून नेहा निघते.


    नेहा ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आई आणि वहिनी बोलल्या त्यावर विचार करू लागली. तिच्या अंतर्मनाचा खेळ सुरु झाला, त्या मित्राने केलेला स्त्रित्वाचा अपमान तिच्या तेव्हाही जिव्हारी लागला होता. ती स्वतःशीच बोलू लागली.

पण हे लग्न कशासाठी करायचं?
आईला वाटतंय, तिच्या पश्चात माझं कसं होणार?
आणि आता अजून काय व्हायचं राहील आहे,
लग्न झालं नाही तरी एक मुलगी आहे पदरात....


     तीला चार दिवसापूर्वी तिच्या एका मैत्रिणीने सांगितलेली तिची व्यथा आठवली - सानिका सहा महिन्यात माहेरी परतली, का तर तिचे आणि नवऱ्याचे मानसिक बंध जुळले नाहीत, विचार पटले नाहीत, म्हणून ती भांडण करून माहेरी आली पण तिच्या आई - वडिलांनी तीला माहेरी ठेवून घेतलं, कां तर सानिकाचा भरमसाठ पगार...


    अजून एक मैत्रीण - आसावरी - लग्न होऊन दहा वर्षांनी दोन मुलं झाल्यावर बेबनाव होऊन नवऱ्यापासून वेगळी झाली, आणि मुलगा - मुलीला आईकडे ठेवून नोकरीं करून मुलांचा सांभाळ करून भाड्याने रूम घेऊन राहू लागली.


    नेहा मनातल्या मनात बोलू लागली - सुखाचे संसार असे कितीसे होतात, कोणी नाईलाज म्हणून सहन करत राहते, तर कोणी पदरात पडलंय ते पवित्र मानून सुखात राहते, काहींच्या संसारात सुखाची झूळूक आली कि वैधव्य येते....


विचार करत करत पुणे स्टेशन येत पण ओवी बोलते आई आपण जवळ आलो तेव्हा ती भानावर येते...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहा आधीचं मुलं असलेल्या माणसाशी लग्न करेल कां ते )


🎭 Series Post

View all