भाग – १४
( मागच्या भागात आपण बघितले - नेहाची आई आणि वहिनी तीला आता तरी तुला जोडीदाराची गरज आहे, तू लग्न करण्याचा विचार कर असं सांगतात आता पुढे )
नेहा चांगल्या घरातली मुलगी होती. चुकून तिचा तोल गेला होता, पण सावरल्यावर ती पुन्हा कधीच दुसर्या वाईट वाटा शोधत नहव्ती राहिली, तिच्या ओवीवर असणार्या प्रेमामुळेच तिने इतर कोणाला कधी जवळ केले नह्वते.
कितीही असल तरी तिने कायम स्वतः जवळ कायम पर्समध्ये एक चाकू बाळगलेला असे. जर चकुन कोणी बळजबरीने शरीर भ्रष्ट करण्यासाठी जवळ आलाच तर ती त्या चाकूने त्याचा शेवट करणार होती. जवळ असणार्या चाकुनेच तिला सुरक्षित वाटत असे, लोकांच्या नजरेत भरण्यापेक्षा, उतरण्यासाठी नेहाने विरक्ती पत्करली होती..... आणि तिच्या दृष्टीने हेच जीवन आहे असं वाटून तिचे दिवस सुरळीत दिवस जात होते.
पण मग हे मध्येच आई आणि वहिनीने लग्नाचं टुमणं कां बऱ सुरु करावं, भावाच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यापैकी कोणी आईचे’ कान तर भरले नसतील ना....असंही तीला वाटून गेलं...
आईने हे सुचवणे, वहिनीने तिला विनवणे तिला हे शांतपणे पचवता येत नहव्ते, स्वतःची व्यथा तिला आता सलतच राहू लागली. तिने ती एकटीच ओवीला वाढवत असल्याने मित्रं – मैत्रिणी सगळ्यांनाचा दुर केले होते. आणि आता सगळ्या मैत्रिणी लग्न होवून आपापल्या संसारात सुखी असतील असं तिला वाटे...
आई म्हणत होती उभारी आहे तोंवर संसार उभा करायला हवा. नोकरी ते घर आणि घर ते नोकरी , एवढ्या रस्त्यावरचं तूझ आयुष्य वाया जातंय ते पाहून वाईट वाटते, एकही मैत्रीण जोडली नाहीस, कोणाकडे जात नाहीस, कोणात जास्त मिसळत नाहीस, किती शिक्षा देशील अजून स्वतःला, मला वेडीला वाटते तू अजूनही लग्नाचा विचार कर, निदान आनंदी तरी रहा, हे बोलताना आई रडत होती अस्वस्थ होती ते बघून नेहा स्तब्ध झाली होती.
नेहा विचार करू लागली- संसार आणि तो पण सुखाचा माझा होईल का, खर तर सगळी म्हणतात जोड्या ह्या देवाने ठरवलेल्या असतात, पण सगळ दैवावर कसं ढकलायचं , आणि खर तर मी देवाजवळ काहीच मागत नाही , फक्त माझ्या ओवीला सुखी ठेव एवढचं कायम बोलते.
आनंदाच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. मला वयाच्या पस्तीशीनंतरहि संसार थाटता येईल का.... कि मी कायम माझा दुखी सुतकी चेहरा लपवण्यासाठी आजन्म अविवाहितचं राहाव ...कर्मभोग आहेत माझे असं समजून आयुष्य एकटीनेच घालवावं का... भाऊ , वहिनी , आई माझ्या काळजीने तर बोलत आहेत ना, त्यांना वाटत माझं भलं व्हावं...
नेहा पूर्ण आठ दिवस विचार करून लग्न करावं ह्या निर्णयावर पोचली आणि तिने तसं आई आणि वहिनीला कळवलं, दोघी खूप खुश झाल्या, नेहा बोलली पण मला होणारा नवरा पुणेला राहणाराचं हवा आहे, ओवीची शाळा आणि सगळचं इथे आहे. शुभ्रा बोलली ताई तुम्ही काळजी करू नका मी तुमचं विवाहमंडळात नाव नोदवते, तुम्हाला कळवते लवकरच.. नेहाच्या मनात पण आताशा सुखी संसाराची स्वप्न फेर धरू लागली होती.
आई आणि शुभ्रा नेहासाठी स्थळ बघत होत्या, पण लाग्नाधीची एक मुलगी पदरात आहे म्हंटल्यावर होकार येतच नसे, आणि असं कोण स्वीकारणारचं नाही असं नेहाला खूप वाटतं असे.
शेवटी वर्ष – दीड वर्षाने- विधुर, घटस्फोट झालेल्या किंवा बायको वारलेल्या, मुलं असलेल्या माणसांची ...अशी स्थळ येवू लागली.
नेहा आता तुम्ही दोघी स्थळ पाहण बंद करा माझं लग्न काही होत नाही असं त्या दोघींना सतत सांगत असे, पण त्या दोघीही ऐकत नह्वत्या.
नेहाला सदोतीसव वर्ष चालू होत आणि एका श्रीमंत मुलाचं स्थळ आलं, पुण्याला स्वतःचं मोठ वाड्यासारखं घर होत त्याचं, त्याची आई कॅन्सरने आजारी होती, शेवटच्या स्टेजला होती, त्यामुळे तिला आपल्या मुलाला जोडीदार आणि त्याच्या दोन मुलांना आई मिळावी अशी तिची शेवटची अपेक्षा होती. कुटुंब खूप श्रीमंत होत, घरात सगळ्याला नोकर – चाकर होते.
मुलाचं नाव – शरद रानडे होत. त्याची स्वतची एक कपड्याची कंपनी होती, कपडे बाहेरगावी इम्पोर्ट होत असत. दुसर्या मुलाच्या जन्माच्यावेळी त्याची बायको वारली होती. त्याला दोन मूलं होती एक मोठी मुलगी – शिवानी ( वय – आठ वर्ष ) आणि दुसरा मुलगा – स्वरूप ( वय – तीन वर्ष ).
घरी दोन नोकर कायमचे होते. शरद बायको वारल्यावर खूपच खचला होता. त्याला पत्नीचा विरह सहन होईना, मुलांची आबाळ पाहवेना, त्यांचा पोरकेपणा त्याला पाहवेना. एकंदर आयुष्याला लागलेली उतरती कळा विसरण्यासाठी शरद अधून- मधून दारू पियु लागला होता. त्यामुळे काळजीने त्याची आई त्याचं दूसर लग्न लावून द्यावं असं सारख म्हणत होती, त्यात तिच्या कॅन्सरमुळे तिची शास्वती कमी राहिली होती.
शरदची मुलगी शिवानी सारखी आईची आठवण काढून रडत असे, सारखी शरदला मिठी मारून, बाबा तुम्ही नवीन आई आणणार असं आजी रोज बोलतेय काय करणार तुम्ही असं त्याला विचारात राही, त्यामुळे शरद अस्वस्थ असे. त्यामुळे त्याच्या आईने विवाह मंडळातून नेहाच्या आईची संपर्क केला होता.
चांगल मोठं घर होत, त्यात घरी नोकर – चाकर होते त्यामुळे आई आणि शुभ्राला हे स्थळ आवडल होत. त्यात आर्थिक स्थिती उत्तम होती.
शरद एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे भविष्यात कसली चिंता नव्हती, आर्थिक स्थिती खूपचं छान होती आणि नेहाला हक्काचं, स्वतःचं घर मिळणार होत, ओवीला सोबतीला भावंड मिळणार होती.
शरद वयानेही जास्त नव्हता, अडोतीस वय होत त्याचं. दिसायला खूप सुंदर, गोरा आणि देखणा होता, स्वतःची कंपनी होती त्यामुळे नेहाने नोकरी केली किंवा नाही केली तरी चालणार होत.
सगळचं छान होत, पण त्याची दुसरी बायको होणं नेहाला जरासं खटकत होत, पण आई , भाऊ- वहिनी एकदा त्या शरदला भेटून तरी घे असं बोलू लागल्यावर नेहा बऱ भेटून बघते आणि सांगते तुम्हाला असं बोलून शरदला आणि त्याच्या आईला भेटायला तयार झाली.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – नेहा ह्या लग्नाला तयार होते कि नाही ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा