Login

प्रेमाची वीण - 16

Premachi Vin

- भाग - 16



( मागच्या भागात आपण बघितले - नेहाला शरद योग्य वाटतो आणि ती ह्या स्थळाला होकार देते आता पुढे )


       नेहा घरी आल्यावर खुश असते आणि कुंदाताईना पण सांगते, तुम्हाला ही नेणार आहे मी माझ्याबरोबर - ते ऐकून कुंदाताई पण खुश होतात, नेहाचा भाऊ तीला कॉल करून अभिनंदन बोलतो आणि सांगतो आई, मी आणि शुभ्रा लग्नाची बोलणी करण्यासाठी लवकरच पुणेला येतो. सगळेच खुश होतात.


       इकडे शरद मात्र विचारात असतो - माझी लहान मुलं सख्ख आणि सावत्र या कात्रीत तर सापडणार नाहीत ना, नेहा तशी प्रेमळ वाटली, तीने हौशीने पत्नीपद स्वीकारले तर माझ्या मुलांना ही आपलंस करू शकेल ना, घरचं वातावरण कसं सुखी ठेवायचं हे शेवटी घरच्या गृहिणीच्याचं हातात असते, त्याला अचानक त्याच्या बायकोची आठवण झाली - अस्मिताने कसं सगळं घर सुंदर पद्धतीने सांभाळलं होतं, सगळ्या कामात तिचा हातभार असे.


        शरद आणि अस्मिताचं लव्ह म्यॅरिज होतं, कॉलेजपासूनची मैत्री होती त्यांची, अस्मिता पण शरदसारखीच मोठ्या घरची मुलगी होती, तिचे वडील पोलीस आणि आई इन्कमटॅक्स ऑफिसला जॉबला होती,  अस्मिता आणि सुश्मिता अशा ह्या दोन जुळ्या बहिणी. लाडात वाढलेल्या ह्या दोन्ही मुली,  अस्मिता पण स्वभावाने छान, सालस, जुळवून घेणारी अशी होती. वडील हार्ट अटॅकने गेल्यावर शरदने त्यांचा बिझनेस स्वतःच्या हातात घेतला तेव्हा अस्मिताची खुप मदत झाली, तिच्या हुशारीमुळे बाहेरगावच्या ऑर्डर येऊ लागल्या होत्या. तीने घर आणि बिझनेस सगळ्यात त्याला साथ देऊन मदत केली होती.


      सात वर्षाच्या नात्यानंतर त्यांनी अगदी थाटा- माटात लग्न् केलं होतं, त्यानंतर सुखी - संसारात शिवानीच दोन वर्षांनी आगमन झालं, सगळंच अगदी छान चाललं होतं, त्यानंतर चार वर्षांनी अस्मिता पुन्हा गरोदर राहिली, तिलाच मुलगा हवा होता म्हणून तीने हट्ट केला ती म्हणतं असे चौकोनी कुटुंब कसं छान वाटतं ना, पण गरोदरपणात ब्लड प्रेशर खुप वाढल्याने, तिचा अचानक त्रास होऊ लागला आणि बाळंतपणात तिचा जीव गेला, पण बाळं मात्र वाचलं होतं.


    शरद तिच्या जाण्याने पूर्ण खचला, त्याची जोडीदार अर्ध्यावर त्याला सोडून गेली आहे हे दुःखचं त्याला पचवता येत नव्हते, त्याचं अस्मितावर खुप प्रेम होतं. छोट्या बाळाकडे बघून त्याला वाईट वाटतं असे, पण त्याची आई आणि अस्मिताच्या आईने धीर देऊन त्याला सावरलं होतं.


      बाळासाठी घरात असणाऱ्या मावश्यांनी मदत केली, त्याच्यासाठी रात्री जागून काढल्या, त्याला बाहेरच दुध आणून पाजलं, सरलाताईनी त्याला सर्वतोपरी जपलं,  त्याला सांभाळलं, घरातली गृहिणी गेल्यावर त्याही खुप खचल्या होत्या, अस्मिता त्यांची पण लाडकी होती. त्या तिच्याबरोबर सिनेमा बघायला, शॉपिंगला जातं असतं. सासू - सुना छान मिळून - मिसळून राहात असतं.


        सुखाचा संसार अर्ध्यावर सोडून अस्मिता गेली होती, त्यामुळे घरात सगळीच दुःखी होती, पण सरलाताईनी कालांतराने घर सावरलं, पण एक वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर त्यांनी शरदचं लग्न आता काहीही करून लावून द्यावं असं मनाशी ठाम केलं, त्यांना वाटू लागलं माझ्यानंतर घर कोण सावरू शकेल तर ती शरदची बायकोचं.


      मुलांना शिस्त लावणं, त्यांना प्रेमाने समजावणं ह्यासाठी त्यांना आईचं हवं असं त्या शरदला बोलू लागल्यावर शरद त्यांना नको मी दुसरं लग्न करणार नाही असचं सतत बोलत असे, पण मध्यंतरी सरलाताईची त्यबेत जास्तच बिघडल्यावर तो बरं आई तुला वाटतं असेल तर स्थळ बघ असं आईला बोलला.


       त्याच्या मनातलं अस्मिताचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही असं त्याला वाटतं असे, पण मुलांची आबाळ बघता त्याचा जीव कळवळत असे. शिवानी कधीतरी एकटीच तिच्या आईच्या फोटोकडे बघून रडतं असे.


      एकदा शिवानी त्याला येऊन सांगू लागली आजी हॉस्पिटलला असताना त्या कामवाल्या आशाताई मला ओरडल्या, त्यांनी मला आंघोळीला खुप गरम पाणी दिलं होतं, आणि मी ओरडले तर मलाच मारलं त्यांनी, आणि कधी कधी त्या टिफिनची भाजी खुप तिखट करतात, मी टिफिन परत आणते, उपाशी राहते, त्यात आजी अधून - मधून हॉस्पिटलला असते आजारी असते त्यामुळे मी आशाताईचं नाव आजीला सांगत नाही.


       आजी हॉस्पिटलला असताना त्या तू हॉस्पिटलला गेल्यावर स्वरूपकडे लक्ष द्यायचं सोडून त्याला माझ्याकडे सांभाळायला ठेवून तीन तास बाहेर गेल्या होत्या. हे सगळं ऐकल्यापासून मुलांना प्रेम लावायला त्यांची आईचं पाहिजे असं त्यालाही मनात वाटून गेलं होतं.


        सरलाताईना कॅन्सर झाला नसता तर कदाचित शरद लग्नाला ही तयार झाला नसता. पण मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी कोणीतरी त्यांना जवळचं पाहिजे ह्या विचाराने शरद पुन्हा लग्न करायला तयार झाला.


      नेहाच्या भावाने आम्ही दोन दिवसांनी तुमचं घर बघायला येतो असं शरदला कळवलं. ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी तिघेही आले, सगळे शरदच्या घरी गेले, सर्वाना घर खूपचं आवडलं. शरद पण नेहाच्या घरच्यांशी अगदी छान बोलला. पंधरा दिवसांनी लग्न करायचं ठरलं. लग्न साधेपणाने पन्नास जवळच्याचं माणसांना बोलवून करायचं असं ठरलं.


        शरदचं दुसरं लग्न असलं तरी नेहा पहिल्यांदाच बोहल्यावर चढणार होती. त्यामुळे तीही मनातून खुश होती, सगळ्या घरच्यांना तीने पुणे दाखवलं, फिरवलं खरेदी करून सगळे दोन दिवसांनी गेले.


     नेहा लग्नाआधी आठ दिवस आईकडे जाणार तिथेच हळद लावणी, बांगडया भरणे असं सगळं आटपून वऱ्हाडी हॉलवर येतील असं ठरलं.


        नेहा आणि शरद दोन - तीन दिवसाआड फोनवर बोलू लागले, मोजकंचं बोलत पण खरेदी कुठंवर आली, मंगळसूत्रची डिझाईन, कपडे खरेदी यावर चर्चा करू लागले. सरलाताई पण नेहाच्या आईला कॉल करून चौकशी करू लागल्या.


        नेहा लग्नाला आठ दिवस बाकी असताना मुंबईला ओवी आणि कुंदाताई बरोबर गेली तीने तिचं घर - घरमालकांना सांगून खाली केलं आणि तिघींचं सामान घेऊन मुंबईला गेली.


         ओवीला मामाने छान समजावून सांगितलं कि तुला तुझे फ्रेंड्स विचारतात ना तुझे बाबा काय करतात, कुठे असतात तर आता सांगायचं माझ्या बाबांची स्वतःची कंपनी आहे, आईच लग्न होतंय आता, तुला बहीण - भाऊ मिळणार आहेत, तिथे नीट राहायचं, मोठ्या घरात राहायला जायचं आहे. आणि लवकरच तुझी शाळा पण आपण बदलणार आहोत, बाबांच्या घरापासून तुझी शाळा लांब आहे ना त्यामुळे नवीन मोठी स्कुल जवळचं आहे तिथे तू जायचं आहेस. ओवी समंजस होती हो मामा मला समजलं, मी राहीन सगळ्याबरोबर नीट असं ओवी बोलली.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहा - सौ. नेहा शरद रानडे झाल्यावर कशी वागते ते )

🎭 Series Post

View all