भाग – 17
( मागच्या भागात आपण बघितले- .नेहाचं लग्न ठरलं आता पुढे )
नेहा आणि शरद आता मनमोकळेपणाने गप्पा मारू लागले होते, नेहा मुंबईला होती त्यामुळे आईबरोबर बाहेर जाणे, खरेदी करणे चालु होते, आई तिला एके दिवशी मंदिरात घेवून गेली आणि मग देवाच्या पाया पडल्यावर त्या दोघी तिथेच थोडा वेळ बोलत बसल्या.
आई बोलू लागली, हे बघ नेहा, ज्यांना एकमेकांची पारख असते, स्वभावाची पहिल्यापासून ओळख असते, त्यांच्या भावना खूप दिवस एकमेकांत गुंतल्या असतात, अशी दोन माणसं पटकन सामावून जातात, पण तुझं आणि शरदचं तसं नाही आहे, शरद तसा तुला अनोळखीच आहे, त्यात त्याच आधी लग्न झाल्याने तो तसा सगळ्यात जास्त रस दाखवेलच असं नाही त्यामुळे त्याला समजून घे, हळूहळू तो तुला स्वीकारेल पण त्याला हि थोडा वेळ लागेल, तू धीर धर, कधी तुमच्या दोघात चुकून भांडण झालचं तर ते सारखं सासूला सांगत बसायचं नाही, दोघांनी साम्नजस्याने ते सोडवायचं, राग धरून रुसून राहायचं नाही, संसार आहे तो त्यात थोडं भांडण, गोडवा असं सगळं असणारच.
सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांची मुलं तुम्ही स्वीकारलीच पाहिजेत – तेवढे मन मोठे करायलाच हवे.... तुम्ही मुलांना जवळ करा, तुम्ही हि आपोआप एकत्र याल, अग नात असंच असत, सणाला सर्व कुटंब एकत्र असणं, एकत्र गप्पा मारणं, आनंद साजरा करणे- ह्यातच गोडवा असतो बघ. योग्यवेळेस तुझं सगळं निट झालं असत तर आज तुझाही सुखाचा संसार असता, पण असो त्या देवाच्या मनात जे असत तेच घडतं, कदाचित तुझ्या नशिबात शरदच असेल. सुखाची वाट तुझ्या आयुष्याला वळसा घालून पार पुढे गेली आणि वयाच्या सदोतीसाव्या वर्षी उशिरा का होईना तुला तुझं हक्काचं घर मिळतंय, त्या देवाचीच इच्छा असेल हि......
हे सगळं ऐकून नेहा म्हणाली, आई त्याची मुलं मला स्वीकारतील ना... शिवानी एकदम गप्पचं होती, कदाचित तिला हे माझं शरदच्या आयुष्यात येण पटलं नसावं, ती तशी मोठी आहे तिला सगळं कळतंय तिला वाईट वाटत असेल ना, सरलाबाई मात्र छान होत्या, त्या मला अगदी आनंदाने सगळं घर फिरवत होत्या, पण त्या पण आजारी असतात. शरद आता जरा बोलायला लागलाय. पण जास्त करून तो मुलांचेच विषय काढतो, ओवीला स्वीकारेल ना ग तो, ओवी तर बाबा मिळणार म्हणून खूप खुश आहे , तिच्या मैत्रिणींचे बाबा त्यांना फिरायला नेतात, त्यांना खेळणी आणतात, शाळेच्या प्रोग्रामला येतात, ते बघून तिला नेहमी असं वाटायचं कि मला लाड करणारे बाबा हवेत.
शरद तिचे लाड करेल ना ग, मला सध्याचं हे आयुष्य सोडून रेडीमेड आईची भूमिका वठवण कठीण जाणार नाही ना गं, तुम्ही अनेक वर्ष मला एकटीला राहताना बघता आहात, पण मला कोणाचे बंधन नाही आहे, मी निवांत असते, कोणी मी जरा घरी उशिरा आले तरी ओरडायला नव्हत, ऐन तारुण्यात माझ्या हातून चूक झाली, आणि मी अशी एकाकी पडले, ओवीचा जन्म आणि तिचा सांभाळ करताना खचले पण पुन्हा उभी राहिले, एकटीने सर्व पेललं, सजून निट राहणं, शरदबरोबर जुळवून घेणं जमेलहि प्रयत्न केला तर, बघू कस काय होतं ते, सध्या तरी नवरी बनण्याचे वेध लागलेत, हे वाक्य ऐकून दोघींच्याहि डोळ्यात पाणी तराळले, तेवढ्यात शुभ्राचा उशीर झाल्यामुळे कुठे आहत विचारण्यासाठी फोन आला. दोघी हो आलोच दहा मिनिटात बोलून देवळातून निघाल्या.
सहा दिवस पटकन निघून गेले, नेहाला हळद लागली, चुडा भरण्यात आला. दोन्ही घरात लगीनघाई चालली होती, लग्नाचा दिवस उजाडला, एका मिनी बसने नेहाकडची पाहुणेमंडळी पुणेला पोचली, लग्न वैदिक पद्धतीने सुमुहर्तावर पार पडले. भावाने नेहाचे कन्यादान केले. सगळं व्यवास्थित पार पडले. विवाहविधी चालू असतानाहि शरदचे मन संमिश्र भावनांनी भरलेले होते, डोळ्यात खिन्नता होती, हे नेहाने जाणले, कदाचित त्याला अस्मिताबरोबरच्या लग्नाची आठवण येत असेल, शरदबरोबर सप्तपदी घेताना ह्या विचाराने नेहाचे डोळे भरून आले.
शुभ्रा तशी हुशार होती, तिला माहित होते दुसरं लग्न असल्याने शरद तसा अधिक रस दाखवणार नाहीत ह्या लग्नात म्हणून तिने कोणालाच न सांगता दोघांसाठी चार दिवसासाठी गोव्याची बुकिंग करून ठेवली होती, मधुचंद्र म्हणून न्हवे तर दोघांच्याहि मनावर ह्या लग्नाचे आलेले टेन्शन दिसत असल्याने आणि दोघेही वेगवेगळ्या मनस्थितीमध्ये होते, म्हणून तिने त्यांचा वेळ सुखकर व्हावा यासाठी हि योजना आखली होती.
शरदला नाही बोलायला शुभ्राने वेळच दिला नाही, हॉटेलपासूनची बुकिंग तीने आधीचं करून ठेवली होती. सरलाताई तीला हळुचं बोलल्या हे मात्र छान केलंस हा तू, त्या निमित्ताने दोघं एकमेकांना समजून घेतील, नात्यात गोडवा येईल.
नेहा सौ. नेहा शरद रानडे झाली, घरी गृहप्रवेश झाला, दुसर्या दिवशी लग्नाची पूजा झाली, आणि जोडपं गोव्याला जायला निघाल. कुंदाताई आणि सरलाताई आणि अजून दोन मावश्या घरी असल्याने मुलांची तशी काळजी नहव्ती, पण तरीही नेहाला ओवी नवीन घरात एकटी पडेल असं वाटत होत पण शरद बोलला, बाकीची सगळी तिला नवीन आहेत पण कुंदाताई ओळखीच्या आहेत ना त्यामुळे काळजी करु नकोस ती राहील छान. ... शरदने नेहाला आश्वस्थ केले, सरलाताई पण बोलल्या तू इकडची काळजी करू नकोस, मस्त फिरून मज्जा करून या दोघे.
नेहा आणि शरद गोव्याला जायला निघाले. नेहाला मनातून खूप छान वाटत होत, दोघे गोव्याला पोचले, फ्रेश होवून मस्त मनसोक्त हिंडले, मंगेशीच देवालय, वेताळाचे सुंदर मंदिर , नदीतून नौकाविहार , पणजी नावाची नगरी, रंगीबेरंगी संध्याकाळ, मोठी भव्य चर्च, सागर किनारे हे सगळं पाहताना मनाची मरगळ पार झटकली गेली. हक्काने आणि अतीव प्रेमाने नेहा शरदच्या मिठीत विरघळत गेली.
दुसरा मधुचंद्र साजरा करताना शरद मात्र मनी अस्मिताची मूर्ती जपतच नेहाशी समरस झाला. नेहाने आपले प्रिय माणूस कठोर यातना झेलून बरेच वर्ष वाट बघून मिळवले होते, त्यामुळे त्या उत्कट बेसावध क्षणाला तिला काहीच आठवत जाणवत न्हवते, ती त्याला एकरूप झाली. सुखाचे क्षण ती अनुभवत राहिली.
अजून दोन दिवस गोव्याचे निसर्ग सौंदर्य बघत इकडे -तिकडे फिरत दोघं खरेदी करू लागले, मुलांसाठी, सासुसाठी, माहेरच्यांसाठी, घरातल्या कामवाल्या मावशींसाठी सुद्धा शरदने नेहाला कपडे घ्यायला सांगितले, मुलांना खुप सारा खाऊ घेण्यात आला.
नेहा गोव्याहून परतली तीच नवीन सळसळनारे चैतन्याचे मन घेवूनच...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – नेहा कसा संसार करते ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा