Login

प्रेमाची वीण - भाग - 18

Premachi Vin
- भाग - 18


( मागच्या भागात आपण बघितले-  नेहा गोव्याहून घरी आली आता पुढे )


      नेहा घरी आली, शिवानी तिच्याशी बोलत न्हवती, तिच्यापासून दूर दूर राहत होती, नेहाने दहा दिवसांची शाळेतून सुट्टी घेतली होती, त्यामुळे ती अजून पाच दिवस घरीच असणार होती.

   
      शरदने ऑफिसला जायला सुरवात केली होती, स्वरूप आणि ओवीच छान पटत होत, दोघं मिळून – मिसळून राहत होती, गोडी – गुलाबीने खेळत होती. शिवानी त्यांच्यात खेळायला पण जातं नव्हती, ओवीने एक - दोनदा शिवानीला चल नां बाहेर बॅडमिंटन खेळायला जाऊया असं विचारल्यावर ती ओरडून बोलली, जा तू मला नाही यायचंय, तिथंपासून ओवी तीला घाबरूनचं होती.


       शिवानी ओवी आणि नेहा दोघींपासून लांब राहत होती , तिचा अभ्यास करत एका रूममध्ये असायची, नाहीतर टीव्ही बघत बसायची. नेहाने तीला काही विचारलं तरी हो, नाही एवढंच बोलायची.


      नेंहाची पाऊले किचनकडे वळली कि सरलाताई म्हणत असत , राहूदेत गं, मावशी आहेत त्या करतील काम, तू आराम कर, मुलांबरोबर वेळ घालवं, सातव्या दिवशी सरलाताई म्हणायला आज तू शरदबरोबर आपली कंपनी बघायला जा, नंतर तुझी सुट्टी संपली कि तुला शाळेमुळे वेळ मिळणार नाही.


        शरद त्यावर आई एवढी काय घाई आहे नंतर नेईन तीला असं बोलला, त्यावर सरलाताई म्हणाल्या अरे घरची लक्ष्मी आहे ती, तीला तिची कंपनी दाखवायला नको, त्यावर बरं नेहा पटकन तयार होऊन ये, आपण जाऊ ऑफिसला असं तो म्हणाला...


    नेहा छान साडी निसून तयार होऊन आली ते बघून सरलाताई म्हणाल्या अरे वा, गोड दिसतेय सुनबाई.... शरद पण तीला बघून हसला.


     दोघे ऑफिसला जायला गाडीत बसले, इकडे सरळताईनी ऑफिसला फोन करून स्टाफला नेहाच्या वेलकम ची तयारी करायला सांगितली.


       शरद गाडीमध्ये गप्पच होता, नेहानेच मग बोलायला सुरवात केली, शिवानी जास्त बोलत नाही आहे माझ्याशी, तीला कसं समजावू असं बोलून तीने सुरवात केली.


      शरद म्हणाला अस्मिता गेली तेव्हा शिवानीला बऱ्यापैकी कळत होतं, त्यामुळे तिचा तिच्या आईवर प्रचंड जीव होता, तीला तिची आई खुप प्रिय होती त्यामुळे ती तुला पटकन आई म्हणून स्वीकारताना कचरतेय, तू शाळेत जायला लागलीस कि तीला खेळणी, कपडे असं काहीतरी तिच्या आवडीचे आणून बघ, कदाचित ती नरमेल ही..... तिच्या आवडीचे पदार्थ करून बघ, तीला चायनीस, पिज्जा घरी केलेलं आवडतं, तसं करून बघ.


        बरं प्रयत्न करून बघते असं नेहा म्हणाली, तेवढ्यात ऑफिसला दोघं पोचले, दरवाजातून आत घुसतानाचं एका मुलीने वेलकम मॅडम म्हणत बुके हातात दिला ते बघून नेहा सुखावली. मग पुढे गेल्यावर सगळा स्टाफ तिच्याभोंवती गोळा झाला, सगळेचं वेलकम मॅम बोलू लागले.


       शरदने तीला ऑफिस दाखवायला सुरवात केली, स्टाफने तीला मिठाई दिली, सगळ्या लेडीजनी मिळून एक साडी गिफ्ट दिली. लग्न साधेपणाने असल्यामुळे ऑफिस स्टाफला आमंत्रण नव्हते, त्यामुळे सगळे नेहाला पहिल्यांदाचं भेटत होते. सगळ्यांचं प्रेम बघून नेहा अगदी भारावून गेली, दोन तास ऑफिसला थांबून शरदने ड्रायवरला नेहाला घरी सोडायला सांगितले. नेहा खुशीतचं घरी पोचली..


       सरलाताईनी विचारलं कसं वाटलं ऑफिस, नेहा म्हणाली खुप सुंदर आहे, स्टाफ पण छान आहे, त्यावर ओवी म्हणाली आई मला पण बघायचं आहे ऑफिस, सरलाताई म्हणाल्या दिवाळीला लक्ष्मीपूजनला ऑफिसमध्ये पूजा असते, शरद दरवर्षी मुलांना नेतो ह्यावेळी तू पण जा, दिवाळी तशीही चार महिन्याने आहेच, हो चालेल आजी असं बोलून नेहा गेली.


       सरलाताई नेहाला बोलल्या- ओवीचं इथल्या मोठ्या शाळेत ऍडमिशन करूया आपण दोघी उदया सकाळी, तिलाही सोबत घेऊन जाऊया, नेहा म्हणाली अहो आई आहे ती शाळा पण तशी बरी आहे, पण त्यावर त्या म्हणाल्या अगं पण इथून लांब पडेल तीला, आपण जाऊया उदया, तिचा अभ्यास बुडायला नको, उगाच उशीर नको असं सरलाताई बोलल्या..


       ओवीचं नवीन मोठ्या शाळेत ऍडमिशन झालं,ओवी खुश होती, मुलं एकत्र शाळेत जाऊ लागली. असेच दिवस जातं होते.


      नेहाचा संसार नवीन होता, त्यामुळे ती शाळेत गेल्यावर तीला शरदने एक फोन करावा असं तीला वाटे, जेवलीस कां विचारावं असं तीला वाटे. शाळा सुटल्यावर दोघंचं कुठेतरी भेटून कॉफी वैगरे पिऊन बोलत एकत्र घरी जावं असं तीला वाटे. दोघांनी हातात हात घालून फिरायला जावं, मज्जा करावी, शॉपिंग करावी असं तिच्या मनात चालू असे.


      पण शरद मुरून जुना झालेला, त्याचं दुसरं लग्न होतं त्यामुळे असं काही ती बोलली कि त्याला तिचे बेत नवथर, थील्लर वाटतं, तो तीला प्रत्येक गोष्टीत काय पण काय तुझं, असं बोलून तीला गप्प करे, दोघांत थोडी थोडी नाराजी होऊ लागली. पण काहीही झालं तरी दोघंही आपलं भांडण किंवा अबोला घरच्यांसमोर दाखवून देत नसतं. बेडरूममधलं भांडण बाहेर पोचू नये यासाठी मात्र दोघं खबरदारी घेत असतं.


       शरद ऑफिसमधून आल्यावर आपण कुठेतरी बाहेर जाऊया असं नेहाने विचारल्यावर त्याचं नाही म्हणणं रोजचंचं झालं, आणि मग त्याचे नकार, तिचे हट्ट, दोघांत कुरबुर व्हायची.


       शरदचं ऑफिस, त्यानंतर मित्र- मंडळीत रमणे, संध्याकाळी कधीतरीच पण फक्त मुलांनाचं फिरायला घेऊन जाणे, तीला थोडंसं खटकू लागे, आणि घरात सगळ्यात राहूनही तीला एकप्रकारचा परकेपणा, एकटेपणा तीला जाणवू लागला.


         त्यात लग्नानंतर तीन महिन्यांनीचं सरलाताईची त्यबेत खुप बिघडली, त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले, त्यांची त्यबेत सिरीयस होती,  सरलाताई खूपचं चांगल्या होत्या, नेहाला नेहमीच त्यांचा आधार वाटतं असे, त्या कधी त्यांच्या समोर चुकून शरद नेहाला काही बोललाच तर त्या शरदलाचं ओरडत असतं. नेहाला अगदी त्या मुलीसारखं वागवत असतं.


नेहाच्या माहेरचे पण एक दिवसासाठी येऊन त्यांना हॉस्पिटलला भेटून गेले.


       हॉस्पिटलमध्येच चौथ्या दिवशी त्या नेहाला जवळ बोलवून बोलल्या, हा कॅन्सर काय मला आता जगू देत नाही बघ, तू घर सांभाळ, मुलांची काळजी घे, आणि जमलंचं तुझी नोकरीं सोडून घर सांभाळ, आणि आपली आर्थिक स्थिती पण चांगली आहे, तुला काही कमी पडणार नाही, सॉरी मी तुला असं सांगतेय पण त्या मावश्या आपल्या पाठीमागे मुलांना नीट संभाळून घेत नाहीत, असं शिवानी म्हणते, तू शाळेत गेलीस तर मुलांची आबाळ होईल, आतापर्यंत मी घरी होते, त्यामुळे चिंता नव्हती.


      आणि माझ्या कपाटात वरच्या ड्रॉवरला तुझ्यासाठी एक चिट्ठी लिहून ठेवली, आणि माझी एक डायरी पण आहे त्यात मला त्यात काहिबाही लिहायची आवड होती, ती माझं काही झालंच तर एकटी निवांत बसून वाच. आणि काही वस्तू पण आहेत ते सगळं चिठ्ठीमध्ये आहेच.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - सरलाताई अजून नेहाला काय काय सांगतात ते )

🎭 Series Post

View all