Login

प्रेमाची वीण - भाग -26

Premachi Vin


भाग - 26


( मागच्या भागात आपण बघितले = सरू शाळेत जायला लागते आता पुढे )


    सरू मोठी झाल्यावर अशोक रानडे नंतर तिचे सासरे कसे झाले, त्या आधी काय काय घडलं हे सर्व आपण ह्या भागात बघणार आहोत....


        सरू शाळेत जाऊ लागते, व्यवस्थित शिकते, दहावीला  ( 83 ) टक्के मिळवते, ते ऐकून डॉक्टरसाहेब खुप खुश होतात, सरू आणि तीची आई पेढे घेऊन त्यांच्या घरी भेटायला जातात, डॉक्टरांची पत्नी पण खुप चांगली असते, ती डॉक्टरांना बोलते सरूला आपण मदतीचा हात दिला पण सरूने पण त्याचं चीज केलं...


     डॉक्टरांना एक मुलगा आणि एक मुलगी असते पण  मुलगी अपंग असते ते बघून सरूला आणि तिच्या आईला वाईट वाटतं, डॉक्टर बोलतात सरू आता कॉलेजला जायचं खुप शिकायचं, आईला मोठं होऊन दाखवायचं हा... मी तुझं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करून देतो, उदया सकाळी आपण जाऊया ऍडमिशनला... डॉक्टरांचा मुलगा पण यंदा दहावीला असतो त्याला साठ टक्के मिळालेले असतात...


    डॉक्टर बोलतात तुमच्या दोघांचं ही ऍडमिशन उदया आपण करू,  डॉक्टर बोलतात बरं सरू तुझं एक लेडीज कॉलेज आहे मोठं तिथे आपण तुझं ऍडमिशन करूया...


     सरलाचं लेडीज कॉलेजला ऍडमिशन होतं, तीने सायन्स साईट घेतली असते, सरू शिकते, बारावीला तीला नव्वद टक्के मिळतात ते ऐकून डॉक्टर आणि त्यांच्या मिसेस अतिशय खुश होतात.. सरुची आई देवाला बोलते, देवा पोरगी चांगली शिकतेय, माझ्या कष्टाचं चीज करतेय...


     सरू बारावी झाल्यावर ती बोलते डॉक्टर मला नर्सिंग चा कोर्स करायचा आहे, सरुचा फॉर्म भरला जातो आणि ती नर्सिंगच्या ट्रैनिंगला जायला लागते, सोबत बाहेरून तेरावीची परीक्षा पण देत असते, तीन वर्षात सरू नर्स होते आणि सोबतच पंधरावी पण होते...


     शिक्षण मध्ये आधीच्या काळात तिच्या बाबांमुळे थांबल्यामुळे सरू पंधरावी उशिरा होते, आणि मागच्या काळात तीन वर्ष फुकट गेल्यामुळे सरू वयाच्या चोवीसव्या वर्षी आपले शिक्षण पूर्ण करते...


        सरूला डॉक्टरांच्या ओळखीनेच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरीं मिळते, पगारही चांगला असतो, त्यानंतर तीन वर्षांनी सरू पैसे जमवून मुंबईमध्ये एका छोट्याश्या चाळीत दोन रूमचं घरं विकत घेते ते बघून आई खुप रडते, माझ्या मुलीने माझ्यासाठी घरं घेतलं हे सांगताना ती थकत न्हवती, खुप खुशीत सगळ्या आजूबाजूच्या लोकांना, कौतुकाने सांगत असे...


     डॉक्टरांच्या घरी - त्यांची अपंग मुलगी वयाच्या विसाव्या वर्षी तापाचं निमित्त होऊन वारली होती आणि त्यांचा मुलगा अभ्यासात खुप हुशार नसल्यामुळे डॉक्टर त्याला बिजनेस काढून देतात, त्याला कपड्यांची फॅक्टरी काढून देतात... त्यांच्या मुलाचं कॉलेज मधल्या एका मुलीवर चार - पाच वर्ष प्रेम असतं तिच्याबरोबर डॉक्टर त्याचं लग्न लावून देतात, सरू आणि तीची आई लग्नाला जातात..


     सरूलाही आता अठ्ठावीसाव वर्ष संपत आलेलं असतं, त्यामुळे आई तीला बोलत असते तूझ्या लग्नाचं ही आता बघायला हवं, पण कोणीच नातेवाईक जवळचे नसल्याने स्थळ येत नव्हती... अधून - मधून डॉक्टर आणि त्यांची पत्नी तीची चौकशी करतं असतं, आईची विचारपूस करत असतं.


    असंच मध्ये एक वर्ष गेलं आणि डॉक्टर आणि मॅडम सरूला भेटायला तिच्या घरी गेले होते आणि त्यांची सून गरोदर आहे ही आनंदाची बातमी पण देऊन गेले...


      आई आणि मी त्यांचे अभिनंदन केले... नऊ महिन्यांनी त्यांच्या सुनेला मुलगा झाला तेव्हापण डॉक्टर पेढे घेऊन हॉस्पिटलला मला भेटायला आले होते.. डॉक्टर मला अगदी त्यांच्या मुलीसारखं वागवत असतं..


     त्यांच्या नातवाच्या बारशाला आई आणि मी गेलो होतो, बाळाचं नाव शरद ठेवलं होतं.. खुप थाटामाटात त्याचं बारसं केलं होतं... सगळं छान चाललं होतं, आणि बाळं दीड महिन्याचं असताना डॉक्टरांची सून आणि त्यांची बायको स्कुटीने बाजारात जातं असताना त्यांना मागून एका ट्रकने ठोकल्यामुळे त्यात त्या दोघींचा ही जीव गेला होता...दोघीही जागच्या जागीच ठार झाल्या होत्या...


     हे ऐकून आई आणि मला खुप धक्का बसला आम्ही दोघी पटकन त्यांच्या घरी गेलो, ते छोटं बाळं बघून मन हेलावून गेलं..घरात सगळा आक्रोश चालला होता, सर आणि त्यांचा मुलगा मनोहर खुप रडतं होते... ते सगळं बघून खुप वाईट वाटतं होतं...


       आम्ही दोघी सगळं आवरल्यावर रात्री उशिरा घरी आलो, मन खुप हेलावून गेलं होतं, बाळाची खुप काळजी वाटतं होती, पण मनोहरच्या बायकोची आई तिथे होती ती बाळाला सांभाळत होती.. पण बाळं खुप रडतं होतं..


    दर दोन दिवसाआड मी त्यांच्या घरी जाऊन येत होते, बाळाला खेळवत बसायचे, सगळीचं दुःखात होती, त्यामुळे त्या बाळाची आबाळ होतं होती, त्याला बाहेरचं दुध पाजलं जायचं, ते त्याला पचत नव्हतं, त्यामुळे बाळं शी करत असे, त्याला त्रास होतं असे, ते बघून खुप कसतरीच वाटत होतं...


      असाच मध्ये एक महिना गेला, मनोहरच्या बायकोची आई पण तिच्या घरी जायचं बोलत होती.. बाळाला सांभाळायला कोणीतरी बाई त्यांनी मदतीला ठेवली होती, पण बाळं तिच्याजवळ रडतं असे, तेव्हा डॉक्टरांच्या मनात मनोहरचं दुसरं लग्न लावून द्यावं म्हणजे बाळाला आई मिळेल असा विचार आला... माझं वय तीस होतं आलं होतं माझं ही अजून लग्नचं ठरतं नव्हतं...


        डॉक्टरांच्या मनात मला विचारून पाहावं असा विचार आला आणि ते घरी आले आणि आम्हाला बोलले, आई आधी दुसरंपणाला नकोच बोलत होती पण मी म्हणाले आई मी मॅडम आणि ताई वारल्यापासून त्यांच्या घरी अधून - मधून जातं असते मला पण शरदचा लळा लागला आहे, आणि डॉक्टरांसारखे बापासारखे सासरे माझ्या पाठीशी असतील तर मला तिथे काहीच त्रास होणार नाही बघ...
  

    आणि मग अशाप्रकारे मी सरला मनोहर रानडे झाले, शरद माझा मुलगा झाला, पण त्याला आम्ही कधीच मी त्याची सावत्र आई आहे हे सांगितलंचं नाही आणि जाणवूही दिलं नाही...


     मनोहरना मला बायको म्हणून स्वीकारायला सहा महिने गेले पण मग त्यांनी मला खुप सुखात ठेवलं, खुप ऐश्वर्यातं ठेवले, मी घरात लग्न होऊन आल्यापासून त्यांच्या व्यवसायात खुप भरभराट झाली त्यामुळे ते मला लाडाने त्यांची भाग्यलक्ष्मी म्हणायचे... सुखाचा संसार केला मी....


    मी दुसरं मुलं होऊ दिलं नाही कारण शरद माझा खुप लाडका होता, त्याला मी खुप प्रेमाने वाढवलं आहे, त्याला आयुष्यभर जप...


    डायरी वाचून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं, आपल्या सासूची ही अजून एक प्रेमळ बाजू ऐकून तिच्या मनातला त्यांचा आदर अजूनच वाढला होता...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - नेहा पण शिवानी बरोबर असं नातं टिकवून ठेवू शकेल कां कि शिवानी शेवटपर्यंत तीला सावत्र आई म्हणूनच वागवते ते )