- भाग - 28
( मागच्या भागात आपण बघितले – नेहा गरोदर असते आता पुढे )
शरद शेवटी नेहाचं म्हणण ऐकतो आणि बोलतो, बऱ बाई तू ऐकत नाही आहेस तर होवूदेत एक मुल, नेहा खूप खुश होत्ते, शरद आता नेहाची काळजी घेवू लागला होता, तिच्या माहेरी पण हि बातमी कळल्यावर सगळेच खुश होतात. शिवानी आता शरदचं नेहाच्या बाबतीतलं वागणं बघून शरदचा राग राग करू लागली होती. सुखात मिठाचा खडा नको म्हणून नेहा तिला काहीच बोलत नसे. आता नेहाचे कोणतेच वागणे शिवानीला पसंत पडेना, ती जेवढी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करे तेवढीच ती नेहापासून दूर राही .
शिवानी कशीही वागुदेत पण आपण आपल्याकडून कोणालाच बोलायची संधी द्यायची नाही असं तिने डोक्यावर अक्षदा पडण्यापूर्वीच ठरवले होते. तिच्या आईनेही तिला सासरी निघताना सांगितले होते, अस्मिता भर संसारातून गेलेली आहे त्यामुळे तिचा आत्मा मुलांच्या भोवती घोटाळत असणार, तू त्यांच्यावर प्रेम कर, त्यांना प्रेमाने सांभाळ, दुखवू नकोस, नाहीतर तिचा अतृप्त आत्मा तुझ्या मुलांना बाधेल, म्हणून मुलांना कधी आईची उणीव भासू देवू नकोस.... नेहा त्यावर आईला म्हणाली होती तू काळजी करू नकोस , मी मुलांसाठी झटेन.
शिवानीने दुस्वास चालवला तशी नेहाच्या मनाने कच खाल्लीच, कितीही जिद्दीने तोंड दिले तरी तीची कसरत होवू लागली, तिचे मन हळवे होवून तिला सतत रडू येवू लागले, तिला दिवस गेले होते आणि शिवानीचं हे तिचा राग राग करण तिला सहन होईना, तिने शिवानीची हांजी हांजी करण थांबवल, तिचे लाड करण थांबवल, रागावणे नसले तरी शिवानिशी बोलणे कमी केले. ती दोन जीवांची होती म्हंटल्यावर तिला स्वतला जपणे भाग होते. त्यात वयाची बेचाळीशी संपता संपता ती गरोदर राहिली होती त्यामुळे तिला पहिल्या महिन्यापासून औषध चालू होती.
शारीरिक अवस्था नाजूक असल्याने मन शांत आणि समाधानी ठेवण्यासाठी तिला स्वस्थ राहणे गरजेचे होते आणि म्हणून तिने जाणून – बुजून शिवानिशी बोलण्याचा ओढ कमी केली, शिवानिवरची माया तिने कमी केलेली होती, दिवसानिशी तिची स्थिती नाजूक होत चाललेली, शरद तिला जपत असे, डॉक्टरांनी तिला फिरायला सांगितल्याने शरद तिच्याबरोबर चालायला जावू लागला. तिला फळ आणू लागला.
शरदच्या ह्या वागण्यामुळे शिवानी त्याच्यापासून पण दुर दूर राहू लागली. नेहा तर तिच्या अध्यात- मध्यात नसायची, तीच कुस्कट बोलणहि अश्रूतून लपवायची, पण सहन तरी किती करणार, तिचे डोळे सतत भरून यायचे.
ती शरदला म्हणायची .... मुलाचं मी खूप मायाने करते रे सगळं, त्यांचा अभ्यास, त्यांचे कपडे कपाटात निट ठेवणे, त्यांच अंथरून पांघरून निट लावणे हि सगळी त्यांची काम मी मनापासून करते रे, तरी शिवानी का अशी वागते रे...
बघता बघता नेहाचे नाऊ महिने भरले, तिच्या पोटात दुखू लागले, तिला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले, इकडे शिवानीच मन अजूनच कलुषित झालं, आता नेहाआईला बाळ झालं म्हणजे तीच आपल्याकडे अजिबात लक्षच राहणार नाही असं तिला वाटू लागलं, नव बाळ झाल कि सगळेच त्याच्या अवतीभवती राहतील आपल्याला कोण विचारणार, असं. वाटून ती गप्प गप्पच होती.
नेहाला रात्री अकरा वाजता मुलगा झाला, शरद दिवभर हॉस्पिटलमध्येच होता. त्या रात्री उशिरा शरद घरी गेला, मुलांना झोपेतच हलकेच हलवून त्यांना हाक मारून त्याने सांगितले, मुलानो तुम्हाला भाऊ झाला आहे. दुसर्या दिवशी शरदने सर्व नोकरांना पेढ्याचे बॉक्स वाटले.
नेहाची प्रसूती त्रासाशिवाय नाही हे डॉक्टरांनी आधीच सागीत्ल्याने ती हॉस्पिटलला नर्सेच्या देख्ररेखाली होती. दुसर्या दिवशी सकाळी तिची आई आणि भाऊ आले ... नेहा त्यांना बघून खुश झाली... आता सर्व मानसिक संकटाना तोंड देण्यास मी समर्थ आहे असं तिला वाटून गेल.
पाचव्या दिवशी बाळाला घेवून मोठ्या थाटाने तिने घरात पाऊल टाकलं.. तिला आणखी थोडे दिवस पथ्य पाळायची आणि विश्रांती घ्यावायची असल्याने तिची आई तिच्या घरी येवून राहिली. नवीन बाळाच्या आगमनाने घरातले मळभ नाहीसे झाले, शिवानी निवळली होती, नेहा आपल्या नवजात बाळाच्या बाललीलात हरवून जात होती. महिन्याभराने बाळाच बारसेही आटोपले, बाळाच नाव ओमकार ठेवण्यात आलं, बारसं झाल्यावर नेहाची आईही मुंबईला तिच्या घरी निघून गेली.
शरदला घरकुलात नव्याने होत असलेले बाळरूपाचे आगमन आवडले होते, तो बाळाबरोबर बोबडे बोल बोलत राही, त्याला खेळवत राही, शरदची सगळ्यांवर समान माया होती, पण पहिली बेटी म्हणजे घरची लक्ष्मी असलेल्या शिवानीवर त्याचं जास्त प्रेम होत. शिवानीला आता बारावं वर्ष संपून तेरावं लागलं होत. ती आता अधिक हट्टी, एकलकोंडी झाली होती, आपली आई बाळाच्याच भवती असते, माझ्या मैर्त्रिणी म्हणतात ते खर आहे सावत्र आई अशीच असते हि तिची भावना आता वरचेवर दृढ होत चालली होती. त्यामुळे ती आता बाळाला हात लावेनाशी झाली.
शिवानीच वरचेवर चिडण बघून नेहा शहराला एके दिवशी बोलली हिला आपण बोर्डिंगमध्ये ठेवूया का, माझे कुठलेही बोलणे, वागणे आपल्या विरूद्धच आहे अशी झालेली तिची समजूत तरी कमी होईल ... सावत्र आई असलेल्याच लेबल तिने मला कायमचं चिकटवलेल आहेच ते तरी कालानुसार कमी होईल, आता सहन करायची माझी ताकद संपली आहे, पडत घ्यायची मर्यादा ओलांडली आहे, अशाने माझा स्वभाव बदलत जाईल. माझ्याही नकळत तिच्या अशा वागण्याने मी सतत एकटी पडेन रे....
नाहीतर मी माझं नरमाईच धोरण बदलून आता तिच्याशी कडक वागायला लागेन नाहीतर , मी तडजोड करत आले , पण तिला मी नकोच आहे, आता मी तिला निट करणार, तिला मोठ्यांचा आदर नाही आहे, तिचा स्वभाव ती कोणीतरी खूप मोठी शहाणी असल्यासारखा आहे, तिला मी तिला लावलेली शिस्त आवडत नाही , मी सूत्र हातात घेऊन तिला वठणीवर आणू का त्यापेक्षा, .... कारण मुलगी आहे ती वाया जाऊ नये एवढचं प्रांजळ मत आहे माझ... शरद हतबल होवून नको बोर्डिंगला नको आणि तू पण ओरडू नकोस तिला ती आता मोठी होतेय, हळवी होईल ती, तिथे ती एकटी पडेल, त्यापेक्षा नकोच ते दूर राहणं ...तू काळजी करू नकोस मी बोलतो तिच्याशी असं बोलून बाहेर निघून गेला.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – शिवानीचा स्वभाव तिला कुठल्या ठिकाणी नेवून पोचवतो )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा