Login

प्रेमाची वीण - 29

Premachi Vin

- भाग – 29


( मागच्या भागात आपण बघितले – शिवानी दिवसेंदिवस नेहाला जास्तच त्रास द्यायला लागते -  आता पुढे )



        शरद शिवानीच्या वागण्याने त्रस्त होता, आणि त्याला वाटत होत आपण दुसरं लग्न करून शिवानीवर अन्यायचं केला कि काय, तिला तिच्या आईच्या जागी नेहाला कधी बघताच आले नाही, नेहाने मनापासून तिच्यावर माया लावण्याचा प्रयत्न केला, पण शिवानी तिला आपलंस करूच शकली नाही. शिवानी अस्मिता अवेळी गेल्यामुळे आणि त्यात तिची आजी आजारी झाल्यामुळे काही काळ एकटी पडली पण त्यात दोष कोणाचाच न्हवता,  होता तर त्याकाळच्या परिस्थितीचा,  तिला आजी आजारी असल्याने कामवाल्या काकीनीच सांभाळल, मी हॉस्पिटलला सतत आईबरोबर राहिलो त्यामुळे तिची हेळसांड झाली.


          तेरावं वर्ष लागल्यावर शिवानीला पाळी आली, तिला रविवारची सुट्टी असल्याने ती घरीच होती, तिने नेहाला न सांगता जेवण करणाऱ्या काकींना सांगितल, आणि मग त्यांनी जावून नेहाला सांगितल, नेहाला खूप वाईट वाटलं,  सावत्र कां होईना पण मी आई आहे ना तीची, मला सांगायला हवं ना पहिलं तर त्या काकींना जावून बोलली, तिने शिवानीला अंघोळीला पाणी दिल आणि तिला चार शब्द समजावून सांगितले, शिवानीने गप्प उभ राहून सगळं ऐकून घेतलं आणि मग थोड्यावेळाने ती आपल्या रुममध्ये निघून गेली.


       शिवानी रुममध्ये जावून रडत तिच्या आईचा विचार करत बसते, आईची मी किती लाडकी होते, आईची आठवण येतच राहते. आईच्या पांघरुणात ती झोपलेल्याचं तिला आठवत राहत. शिवानी तिच्या आईच्या फोटोकडे पाहत राहिली, मी सेम आईसारखीच दिसते ना असंहि त्याक्षणी तिला मनातून वाटून गेलं, नेहाआई चांगली आहे तशी पण मला आवडत नाही, आता तर ती ओमकारमध्येच गुंतलेली असते. तो लहान असला म्हणून काय झालं त्याच्या ती अवतीभवतीच असते, आणि ती ओवी शांत आहे बिचारी पण माझ्या मैत्रिणीनी सांगितल्याप्रमाणे सावत्र बहिणच ना ती पण शेवटी.. ती नेहाआईचीच कॉपी असणार, बाबांना माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल भडकवणं हेच तर नेहाआई सतत करत असते...


         बघता बघता तीन वर्ष पटकन गेली, शिवानी दहावीला गेली होती, स्वरूप पाचवीला होता आणि छोटा ओमकार नर्सरीमध्ये जायला लागला होता. ओवी पण आठवीला होती.


       शिवानीच्या स्वभावात बदल झाला नाहीच,  पण नेहानेही तिला आपलसं करण्याचे आता सगळे प्रयत्न सोडून दिले..पण एकंदर शिवानीला लहान वयातच बाहेरचं वार लागलं होतं, ती मैत्रिणीशी फोनवर बोलत बसे, सतत गप्पा मारत असे, अभ्यास करण्याची गती पण कमी आली होती..


      नेहाला सतत तिची काळजी वाटे, पण ती हतबल होती, शरद तू काळजी करू नकोस ती आता मोठी झालीय असं बोलून तिला गप्प्प करत असे. जेव्हा नेहा तिला प्रेम लावत होती, मायेचा आधार देत होती, तेव्हा शिवानीने तिचा आधारही नाकारला होता, तेव्हा ती लहान होती मनानेही बालिश होती.


     शिवानीची दहावीची परीक्षा आली, पहिल्या पेपरला शरदने तिला आशीर्वाद देवून शुभेच्छा दिल्या होत्या, नेहाने पण बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर लिही असं बोलली होती, भूक लागली तर काहीतरी खा म्हणून पैसेही दिले होते. आणि ड्रायव्हरबरोबर तिला गाडीने परीक्षेला पाठवले होते. ती निघताना हिरमुसली होती. तीला वाटतं होतं निदान बाबा तरी पहिल्या पेपरला तीला सोडायला जातील, अशांत मनाने ती परीक्षेच्या वर्गात गेली, पण आपल्या नंबरवर बसताच तिने एकाग्रतेने पेपर लिहिला होता.


       शिवानी पहिला पेपर देवून बाहेर आली , पेपर बरा गेला असला तरी तिला बाहेर दिसलेले पालक आठवले, शाळेच्या आवारात बाकीच्या मुलांच्या जमलेल्या पालकांकडे बघून उगीचच तिला वाटले कि नेहाआई पण आली असेल पण कोणीही येणार नव्हते, तिला वाईट वाटलं, ड्रायव्हर काका आले होते ती गाडीत बसून घरी निघून आली.


     दुसर्या दिवशी एक तिच्या वर्गातला मुलगा अनिश तिला तिची वाट बघत उभा असलेला दिसला, त्याने तिला हाक मारली आणि बोलला शिवानी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, ती काय बोल ना असं सहज बोलून गेली, त्याने तिला मला तू खूप आवडतेस असं सांगितल, ती त्यावर म्हणाली आपण ह्या विषयावर पेपर संपल्यावर बोलूया ...आता ह्या विषयावर चर्चा नको असं बोलून ती गाडीत बसली .....


       तिसर्या पेपरला अनिश तीला बेस्ट लक देण्यासाठी हजार होता हे पाहून तिला मनातून छान वाटलं, तो तिच्याकडे बघत राहिला होता, त्याची अबोल लिपी शिवानीच्या उमलत्या भावनेला वाचू लागली, तीही त्याला बाय करून निघून गेली.


    अनिशच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने, आर्जवी शब्दांनी ती बावरली होती,  त्याचे ते बोलके डोळे , सदा हसतमुख असणारा त्याचा  चेहरा आता तिच्या डोळ्यासमोर येवू लागला होता. त्याचा आवाज आता कानात घुमू लागला..तिच्या मनातही वादळे उठली होती.


      जीवाभावाचे बोलायला, हक्काचे माणूस मिळेल असं समजून शिवानीही त्याच्याकडे ओढली जावू लागली... ती  छान तयार होवून पेपरला जावू लागली होती . शेवटी परीक्षा झाली आणि शेवटच्या पेपरला शिवानी अनिशला हो म्हणाली. सुट्टीमध्ये त्याला भेटता यावे म्हणून तिने शरदशी बोलून कॉम्पुटर शिकण्याचा क्लास लावून घेतला.


       नेहाला बदललेलं शिवानीच वागणं जाणवत होत, पण आताशा तिने शिवानिशी बोलण खूपच कमी केलं होत, स्वरूप मात्र तिला अगदी स्वतच्या आईसारखं वागवत असे. तिच्याकडून लाड करवून घेत असे.  शरद पण ओवीचे लाड करत असे.


        नेहाच्या माहेरी ओमकारच्या जन्मानंतर , नेहाचा भरलेला संसार बघून तिची आई खुश असे...तिच्या भावाला दुसरं पुत्ररत्न झालं होतं, माहेरी भावाची नोकरीत बढती झाली होती, वहिनी छान घरं सांभाळत असे.


     
       नेहा माहेरी जास्त जातं नसे, आणि गेलीच तर ओंकार आणि ओवीलाचं घेऊन जातं असे,  एकदा स्वरूपला पण घेऊन गेली होती, पण शिवानीला तीने येतेस कां असंही विचारलं नाही, ह्याचा पण शिवानीच्या मनात राग असे. माझ्या बाबांना पण माझ्यापासून तीने दूर केलं, ओंकारच्या बाबतीत ती जास्तच लाड करते, त्याला जपते, तो लहान असला म्हणून काय झालं त्याला लाडाने तीने चढवून ठेवलं आहे, असे बरेच प्रशन, हेवेदावे, पूर्वग्रह शिवानीला नेहा बद्दल होते...


( पुढच्या भागातआपण बघणार आहोत – अनिश शिवानीच्या आयुष्यात आल्यानंतर शिवानीचा स्वभाव बदलेल कि नाही ते )

🎭 Series Post

View all