भाग - 31
( मागच्या भागात आपण बघितले - अनिश शिवानीबद्दल घरी सांगणार आहे आता पुढे )
अनिश विचारातच घरी पोचला, आज नेहमीपेक्षा जरा तो लवकरचं घरी गेला होता, त्याला बघून त्याच्या आईने विचारलं, अनिश आज लवकर आलास, आणि चेहरा कां पडल्यासारखा दिसतोय तुझा... मूड ऑफ कां दिसतोय, ऑफिसमध्ये काही झालं कां... नाही गं असंच मूड बरा आहे काही नाही...
बघ तू काही सांगत पण नाहीस, तुझे हे असे मूड सांभाळून घ्यायला आता तुला जोडीदारीण आणायची वेळ झाली आहे वाटतं.... जोडीदार म्हंटल्यावर अनिशच्या डोळ्यासमोर शिवानी उभी राहिली, आणि तो विचार करत राहिला...
आई पटकन म्हणाली अरे कां असा विचार करत राहिलास... जोडीदार निवडलास कि काय... अनिश हसला ते बघून आई म्हणाली, अरे म्हणजे आहे कोणीतरी...
हीच आईला सांगायची योग्य वेळ आहे असं समजून अनिश बोलला आई मला एक मुलगी आवडते..
“अरे कोण मुलगी ? कुठली? काय करते? तिचे आई - वडील काय करतात,
आईने प्रश्नांचा भडीमार केला.
आईने प्रश्नांचा भडीमार केला.
अगं हो आई, सांगतो सगळं, आम्ही गेले सात वर्ष एकमेकांना ओळखतो आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, शिवानी रानडे, माझ्या शाळेतली माझी मैत्रीण बघ तिचं, ती दोनदा माझ्या वाढदिवसाच्यावेळी आपल्या घरी पण आली आहे, तिच्या वडिलांची स्वतःची कपड्याची कंपनी आहे, ती सध्या फॅशन डिझाईनचा कोर्स करते आहे...
आई विचार करत बसली ते बघून अनिशने विचारलं काय गं आई काय झालं ..... काही नाही असं बोलून त्या आत गेल्या, त्यांना दोन दिवसापूर्वीचं प्रतापरावांचं बोलणं आठवलं, ते त्यांना बोलत होते अनिश आता आपला बिजनेस चांगला सांभाळतो आहे, कामात लक्ष देतो आहे, त्यामुळे आता त्याला समजून घेणारी, घरपणं जपणारी मुलगी त्याला सहचारिणी म्हणून निवडायला हवी...
आपला अनिश सुस्वभावी आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारा आहे... आणि प्रेरणाताई विचार करत बसल्या, त्यावर प्रतापराव बोलले होते, काळजी सोडा तुम्ही मी अनिशसाठी माझ्या एका मित्राची मुलगी - आसावरी निवडली आहे, संसारी मुलगी आहे, आपल्या एकुलत्या एक लेकाला सांभाळून घेईल, आणि मोठ्यांचा आदर पण करणारी आहे, मी एक - दोनदा त्या मित्राकडे गेलो आहे तेव्हा तिचं वागणं बघितलं आहे...
तेवढ्यात अनिश आई अशी अचानक आतमध्ये कां निघून आली ते बघण्यासाठी बेडरूममध्ये आला, आणि आईला विचारू लागला काय झालं आई तू काहीच उत्तर न देता निघून आलीस...
अरे अनिश बाबांनी तुझ्यासाठी एक मुलगी पसंत केलेली आहे, असं आई बोलली...काय सांगतेस अरे देवा, अनिश काळजीत पडला, कारण त्याला माहित होतं, बाबांना घरं सांभाळून घेणारी मुलगी हवी असणार, आणि शिवानी त्यात जुळवून घेणारी नाही आहे...- मी बाबांशी लवकरच बोलतो... असं बोलून अनिश त्याच्या बेडरूम मध्ये आला...
त्याने शिवानीला कॉल केला आणि बोलला बाबांनी माझ्यासाठी मुलगी पसंत केली आहे, ती ओरडून बोलू लागली तरी मी तुला सांगत होते कि आपल्याबद्दल घरी सांग म्हणून...
बरं आज बोलतो आणि बाबा हा बोलले तर लवकरच लग्न करून टाकू... असं अनिश बोलल्यावर शिवानी चिडून बोलली काय लग्न करू लगेचच मी तुला आधीच सांगितलं आहे मला एवढ्यात लग्न करायचं नाही आहे, तू त्यांना थांबण्यासाठी कनविन्स कर ना, बरं बघतो असं नाइलाजाने बोलून त्याने फोन ठेवला...
रात्री अनिशने बाबांना सांगितलं, बाबा चिडले नाहीत, पण त्या मुलीला उदया मला घरी भेटायला घेऊन ये, मला तिच्याशी बोलायचं आहे एवढंच बोलले हो बाबा असं बोलून तो त्यांच्या रूमच्या बाहेर पडला...
आसावरी भावे, प्रभाकर भावेंच्या
घरातलं शेंडेफळ. उत्साहानं सळसळणारा
झरा होता ती.... अतिशय लाघवी आणि कोणालाही पटकन आपलेसे करणारी अशी ही आसावरी चित्रकलेची आवड असणारी, त्यामुळे पंधरावी झाल्यावर प्रभाकररावांनी तीला चित्रकलेचा क्लास घेशील कां असं विचारल्यावर ती पटकन हो म्हणाली होती, आणि गेली तीन वर्ष ती मुलांचे एका ठिकाणी चित्रकलेचे क्लासेस घेत होती...
घरातलं शेंडेफळ. उत्साहानं सळसळणारा
झरा होता ती.... अतिशय लाघवी आणि कोणालाही पटकन आपलेसे करणारी अशी ही आसावरी चित्रकलेची आवड असणारी, त्यामुळे पंधरावी झाल्यावर प्रभाकररावांनी तीला चित्रकलेचा क्लास घेशील कां असं विचारल्यावर ती पटकन हो म्हणाली होती, आणि गेली तीन वर्ष ती मुलांचे एका ठिकाणी चित्रकलेचे क्लासेस घेत होती...
प्रभाकरराव आणि प्रतापराव एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. प्रतापराव इन्कमटॅक्स ऑफिस मधून रिटायर झाले होते, आसावरीला अजून एक मोठा भाऊ होता.
प्रतापरावांनी जेव्हा आसावरीला अनिशसाठी मागणी घातली तेव्हा प्रभाकररावांच्या डोळ्यात अश्रू आले होते, आणि ते त्यांचा हात हातात घेऊन बोलले, मी भरून पावलो, तुम्ही आणि प्रेरणाताई दोघेही देवमाणसं आहात, माझ्या लाडक्या लेकीला सून म्हणून नाही तर लेक म्हणून जीवापाड जपाल ह्याची खात्री आहे मला.
अनिशचा फोटो बघून तर आसावरी खुप खुश झाली होती, तीला तो खुप आवडला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच शिवानी आणि अनिश भेटणार होते, अनिश खूपचं काळजीत होता आणि शिवानी नेहमीप्रमाणे ओके होती आणि अर्धा तास लेट आली..
अनिश शिवानीला बोलला तुला मी आज बाबांना संध्याकाळी भेटायला नेणार आहे ना मग तू जीन्स, टॉप कां घालून आलीस, मी तुला पंजाबी ड्रेस घाल असं बोललो होतो ना, त्यावर ती चिडून म्हणाली... तसंही आयुष्य आपल्या दोघांना सोबत घालवायचं आहे तुझ्या बाबांच्या पसंतीच मला काय सांगतोस तू...
त्यावर अनिश म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी मुलगी बघितली आहे, तरी पण ते माझ्यावर त्यांच्या असलेल्या प्रेमामुळे आपल्या दोघांच्या नात्याला नाही म्हणणार नाहीत कदाचित, आपण त्यांच्या शब्दाचा मान राखायला हवा ना..
तू काय सारखा बाबा - बाबाचं करतो आहेस, जरा मला विचार करुदेत. शिवानी जोरात ओरडून बोलल्यावर अनिश कायमचं पडतं घेत असे त्याप्रमाणे तो गप्प बसला...
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे शिवानी पंजाबी ड्रेस घालून घरी आली, अनिशने बाबांना ती आल्याचं सांगितलं, प्रेरणाताई दोन नोकरांसोबत नाश्ता आणि पाणी घेऊन आल्या.. त्यांनी शिवानीच स्वागत केलं, आणि शिवानी हलकसं हसली ते बघून प्रतापराव नाराज झाले, अनिशने तीला आई - बाबांच्या पाया पड असं खुणावल्यावर ती नाईलाजाने उठली आणि पाया पडली...
तुझ्याबद्दल अनिशने घरी सांगितलं आहे, प्रेरणाताई बोलू लागल्या...
तुमचं सात वर्ष एकमेकांवर प्रेम आहे, आपण तुमच्या दोघांच्या पत्रिका दाखवून घेऊ, सगळं जर जुळलं तर साखरपुडा करून घेऊ, प्रतापराव बोलले...
पटकन शिवानी बोलली माझा ह्या पत्रिकावर वैगरे विश्वास नाही आहे, माझी पत्रिका पण नसेल ही, आणि लगेचच साखरपुडा शक्य नाही मला एवढ्या लवकर लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही आहे...
प्रतापराव विचार करू लागले ही मुलगी लग्नासारख्या पवित्र नात्याला बंधन समजते तर कशी संसार करणार ही...
खरंतर लग्नाची तशी त्यांनाही फारशी घाई नव्हती, पण शिवानी त्यांना उर्मट वाटली, ती मी कोणीतरी शहाणी आहे असचं वागत होती.. थोड्याचं वेळात प्रतापराव तिथून उठून आत गेले, तेव्हाचं अनिश त्यांना शिवानी पसंत नाही हे समजला होता. प्रेरणाताई मात्र तिच्याशी कुठला तरी विषय काढून बोलत राहिल्या.
थोड्या वेळात दोघे निघाले, अनिश तीला सोडून येतो असं सांगून तिच्यासोबत बाहेर गेला. अनिश गप्पच होता, शेवटी शिवानीच बोलली घरं सुंदर होतं पण तुझे आई - बाबा जुनाट विचारांचे वाटले जरा..
अनिश बोलला ते पत्रिकेवरून बोलले म्हणून असं वाटलं तुला, पण तसं नाही, प्रत्येक घरची वागण्याची पद्धत वेगळी असते.. ते तयारही झाले असते पण तू तिरकसंचं बोललीस आता काय बोलणार मी...
शिवानी त्यावर चिडून बोलली माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे म्हणून मी एवढी ऍडजस्टमेन्ट नाही करू शकत रे, ते लगेचच साखरपुडा करू बोलू लागले मग काय लग्न करून लगेचच बोहल्यावर चढवणार ना आपल्याला.....अनिश गप्प बसला तीला सोडून घरी आला आणि आईच्या रूममध्ये गेला...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - प्रतापराव आणि प्रेरणाताईनी ह्या नात्याला संमती दिली नाही तर पुढे काय होणार )