भाग - 32
( मागच्या भागात आपण बघितले - शिवानी अनिशच्या घरच्यांशी मी कोणी तरी शहाणी असल्यासारखी वागते आता पुढे )
अनिश घरी आल्यावर त्याने आईला विचारलं, आई - बाबा काय म्हणाले...
आई त्यावर म्हणाली त्यांना शिवानी अजिबात आवडली नाही, आणि खरं सांगू - मला ती मुलगी खास अशी तुझ्या योग्यतेची वाटली नाही, बघ तू ह्यावर विचार कर, तूझ्या आयुष्याचा प्रश्न आहे... आता पुढे काय ह्यावर अनिश विचार करत तिथेच सोफ्यावर बसला.
तेवढ्यात घरातला फोन वाजला, अनिशची आई अगदी उत्साहात फोनवर बोलत होती. अनिश तिथून जायला निघाला तर त्याच्या आईने त्याला हाताने खून करून थांबायला सांगितलं.
थोड्याचं वेळात त्या फोन ठेवून अनिशच्या जवळ येऊन बसल्या, आणी बोलू लागल्या - अनिश मला तुझ्याशी फार महत्वाचे बोलायचं आहे, तू एक समजूतदार, समंजस, मनमिळाऊ मुलगा आहेस, तू त्या शिवानीशी कसं काय जुळवून घेऊ शकणार आहेस ते तुलाच माहित...
आणी आता बाबा तुझ्यासाठी जी मुलगी बोलत होते ना त्यांच्याच घरातून फोन होता, ते लोक उदया काही कामासाठी पुणेला येत आहेस तर प्लिज तू त्या मुलीला एकदा भेट... अनिश चिडला काय आई तू पण बाबांच्याच बाजूने आहेस म्हणजे मला वाटलं होतं तू माझ्या प्रेमाला समजून घेशील.. मला अडचणीत टाकते आहेस आई तू...
आई त्यावर म्हणाली तू शिवानीबद्दल सांगितल्यावर बाबा आणी मी तीला भेटायला तयार झालो ना, आता तू बाबांचा मान राखून एकदा तरी त्या मुलीला भेट... मी आसावरीचा फोटो पहिला आहे, खुप सुंदर मुलगी आहे... बरं असं बोलून अनिश त्याच्या खोलीत गेला..
रात्री जेवायला आल्यावर अनिशचे बाबा अनिशला म्हणाले ते माझे मित्र आणी त्यांची मुलगी चार दिवस आपल्याकडे राहणार आहेत, त्यांच्याशी नीट वाग, बाकी तू समंजस आहेस चं. अतिथी आहेत ते आपले, त्यांचा आदर कर....
हो बाबा बोलून जेवून अनिश त्याच्या खोलीत जाऊन विचार करत बसला, कोण कुठली ही मुलगी आसावरी, हिच्याशी मनात नसून पण नीट वागायचं... शिवानी पण ना त्यादिवशी आई - बाबांशी नीट, सालस मुलीसारखी वागली असती तर एव्हाना सगळं नीट झालं असतं...
दुसऱ्या दिवशी सकाळचं आसावरी आणी तिचे बाबा आले, फ्रेश होऊन सगळे नाश्त्यासाठी टेबलवर जमले, अनिशच्या बाबांनी आसावरी आणी अनिशची ओळख करून दिली, आसावरीचे डोळे खुप पाणीदार आणी घारे होते अनिश कां कोण जाणे पण तिच्या डोळ्यात बघत राहिला..
आसावरीला अनिशच घरं खूपचं आवडलं होतं, खुप प्रशस्त आणी मोठा बंगला बघून ती खुश झाली होती, अनिशच्या पटकन मनात आलं ह्या एवढ्या सुंदर घराला पण शिवानीने नावं ठेवली... आणी ही आसावरी तर घरं बघुनच हरखून गेलीय.
प्रेरणाताई आणी आसावरीचं छान ट्युनिंग जमलं, त्यांना आसावरी खुप आवडली होती, त्या सारख्या मनोमन देवाला प्रार्थना करत होत्या हे लग्न जुळू दे असं देवाला सांगत होत्या.
पण अनिश आसावरीबरोबर तुटक वागत असे, आसावरीने प्रेरणाताईना विचारलं पण अनिश असं कां वागतो ते त्यावर त्या तीला म्हणाल्या अगं तो त्याच्या कामाच्या व्यापात असतो ना....
शेवटी एक दिवसाने अनिशला एकट्याला गाठून प्रेरणाताईनी त्याला ओरडून विचारलंच - त्यावर अनिश म्हणाला माझं शिवानीवर प्रेम आहे मग तुम्ही दोघं कां मला ह्या नात्यात गुंतवता आहात...
प्रेरणाताई म्हणायला अरे त्या आसावरीचा तरी विचार कर जरा, निदान तू साधं नीट मैत्री केल्यासारखं तरी बोलू शकतोस ना तिच्याशी...ती आपल्याकडे चार - पाच दिवसच आहे तो पर्यंत तरी नीट वाग... ठीक आहे, माझ्या मनाचा कोणीच विचार करू नका आणी मी सगळयांच्या मनाचा विचार करत बसायचं असं रागाने बोलून अनिश तिथून निघून गेला...
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अनिश ऑफिसमधून आल्यावर प्रेरणाताई आणी आसावरी गप्पा मारत बाहेर गार्डन मध्ये बसल्या होत्या. अनिशने स्वतःहुन आसावरीला हाक मारली आणी हसून विचारलं काय करमतंय ना इकडे, आसावरी खुप खुश होऊन हसून हो हो छान वाटतंय असं बोलली...
तेवढ्यात पटकन प्रेरणाताई बोलल्या, अरे आसावरी घरी कंटाळून गेली आहे, जा जरा तीला बाहेरून फिरवून आण बघू, तीला बरं वाटेल, अनिशला नकार द्यायचा होता पण तिथे आसावरीचे बाबा आणी अनिशचे बाबा पण चहा घेण्यासाठी आले त्यामुळे सर्वांसमोर त्याला नाही बोलता आलं नाही, आसावरी तयार होण्यासाठी आत निघून गेली.. तो आणी शिवानी आज बऱ्याच दिवसांनी भेटणार होते पण आता हे आईने अचानक सांगितल्यामुळे त्याने शिवानीला आज जरा घरी काम आहे असा मेसेज केला... त्याला शिवानी चिडली असणार हे माहित होतं तो काळजीत पडला...
थोड्याचं वेळात अनिश आणी आसावरी निघाले, अनिशने नेहमीप्रमाणे त्याच्या आवडीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला जाऊ असं ठरवून तिकडे गाडी वळवली, दोघं पण गप्पचं होते, एकमेकांशी काय बोलायचं हा संभ्रम पडला होता.
थोड्याचं वेळात दोघे हॉटेलमध्ये आले, आसावरी काय खाणार असं विचारून अनिशने बोलायला सुरवात केली, कसं वाटतंय इथे, तुमच्या कोकणातलं वातावरण खुप वेगळं आहे ना इकडच्यापेक्षा... खुप फरक आहे ना आमच्या वागण्या- बोलण्यात..
“हो पण माझ्या मते घरातली माणसं महत्वाची, ती जर छान सांभाळून घेणारी, पाठींबा देणारी असली तर मी इथेही खुश राहू शकते ” आसावरी हसून म्हणाली.
अनिशला तिचं म्हणणं पटलं होतं, त्याने तीला विचारलं तूला माहित आहे ना तू इथे कशाला आली आहेस ते आपल्या लग्नाचं चाललं आहे ते....
हो मला माहित आहे आसावरी खुश होऊन बोलली.
अनिश बोलला - आसावरी मला तुला काहीतरी सांगायचं आहे....... हा बोला ना असं ती बोलेपर्यंत अनिशच्या पाठीवर येऊन शिवानीने हात ठेवला, ती तिच्या मैत्रिणीबरोबर सेम हॉटेलला आली होती.. मला वाटलं तुला अचानक खूप महत्वाचे काम निघालं होतं...शिवानी चिडून अनिशला बोलली.
आसावरी समोर गोंधळ नको म्हणून अनिश बोलला आसावरी मी हिच्याबरोबर आमच्या अजून दोन - तीन मैत्रिणी पण आल्या आहेत त्यांना पटकन समोरून भेटून येतो हा...अनिश शिवानीबरोबर निघाला, शिवानी चिडून बोलू लागली ही तुझ्या घरातल्यानी पसंत केलेली मुलगी कां, पक्की गावठी वाटतेय रे...
शिवानी चिडू नकोस ऐक ना, मी तुला आज भेटणार होतोचं अगं पण आईने ऐनवेळी हा प्लॅन सांगितला आणी मला नाही बोलता आलं नाही.
उदया तुझ्यावर घरातले दबाव आणून हिच्याशी लग्न पण करायला लावतील, करशील ना मग लग्न, शिवानी संतापून म्हणाली... अगं रिलॅक्स हो मी तीला आपल्याबद्दलचं सांगायला इथे आणलं होतं, शिवानी हे ऐकल्यावर जरा नरमली आणी बोलली हे बघ पाहिजे तर आपण साखरपुडा करू पण लग्न नको रे इतक्यात...
हो बाई बरं मी जातो आता तू तुझ्या मैत्रिणीबरोबर जाऊन बस, पण शिवानी ऐकेचना, तू त्या आसावरीला सांग मी तुझ्या ऑफिसमधली कलीग आहे आणी आपल्या दोघांना आता एका मीटिंगला जायचं आहे मी तुला आता तिच्याबरोबर तिथे बसू देणार नाही म्हणजे नाही, आपण मस्त डिनर करून घरी जाऊ...
अनिश बोलू लागला अगं पण ती आसावरी इथे नवीन आहे, असूदेत नवीन तीला टॅक्सी करून दे जाईल ती, शेवटी अनिशचा नाईलाज झाला, शिवानी अतिशय हट्टी आहे आणि ती आपलं आता ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं त्याने आसावरीजवळ जाऊन म्हंटल, सॉरी हा पण मला एक मिटिंगसाठी अर्जंट निघावं लागतंय मी तुला टॅक्सी करून देतो तू घरी जा, आसावरी बरं बरं काही हरकत नाही बोलून निघाली पण...
आसावरी तुम्ही नीट या हा, असं बोलून हसून निघाली,तिच्या ह्या वाक्यावर अनिशला हसायला आलं.
आसावरी घरी आली. तीला एकटीला पाहून प्रेरणाताईनी अनिशबद्दल तीला विचारलं - “त्यांना
काहीतरी महत्वाचे काम आले त्यामुळे त्यांनी मला टॅक्प्सी करून दिली.. असं आसावरी बोलली, प्रेरणाताईना अनिशाचा खुप राग आला पण त्या गप्प बसल्या.
काहीतरी महत्वाचे काम आले त्यामुळे त्यांनी मला टॅक्प्सी करून दिली.. असं आसावरी बोलली, प्रेरणाताईना अनिशाचा खुप राग आला पण त्या गप्प बसल्या.
इकडे अनिश आणी शिवानी प्रेमाच्या गप्पा मारून रात्री नऊ वाजता आपापल्या गाडीने घरी जायला निघाले, शिवानी तिच्या गाडीने निघाली, अनिश त्याच्या गाडीने.
घरी सर्वजण अनिशसाठी जेवणासाठी थांबली होती, त्याला खूपचं उशीर झाला होता, सगळे बोलू लागले कुठे राहिला हा, काळजी वाटू लागली.
दहा वाजत आले अनिश फोन पण उचलत नव्हता, जेवूनच येतोय कि काय हा असं प्रेरणाताई बोलू लागल्या, आसावरी पण अस्वस्थ वाटतं होती.
थोड्याचं वेळात घरच्या फोनवर अनिशचा ट्रकड्राइव्हर च्या चुकिमुळे अपघात झाल्याचा घरी कॉल आला...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अनिशच्या अडचणीत त्याला शिवानी साथ देते कि आसावरी ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा