भाग - 33
( मागच्या भागात आपण बघितले - अनिशचा अपघात होतो आता पुढे )
सर्व जण घाईघाईत हॉस्पिटलला पोचले, आसावरी पण सर्वांबरोबर निघाली, प्रेरणाताई खुप रडत होत्या, आसावरी त्यांना धीर देत होती, सर्वच काळजीत होते.
अनिशचं आतमध्ये ऑपेरेशन चालले होते, थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणी म्हणाले, खुप ठिकाणी फ्रॅक्चर झालंय, पण ठीक आहे. ते घाव
कालांतराने भरतात. त्याला घाबरायला नको. हो पण त्याच्या पायांना जबरदस्त मार लागला आहे त्यामुळे त्याला चालताना भविष्यात अडचणी येणार आहेत.
प्रतापराव म्हणाले आपण मोठा डॉक्टर करू, माझा अनिश चालेल बघा लवकरच, प्रेरणाताईनी पण हे ऐकून हंबरडा फोडला, आसावरी त्यांना सावरू लागली. अनिशचा खास मित्र पारस पण होता हॉस्पिटलला तोही सर्वाना धीर देऊ लागला.
आसावरी खुप समजुतीने सर्व परिस्थिती सांभाळून घेत होती ते बघून अनिशच्या मित्राला पारसला तिचं कौतुक वाटलं.
आसावरी अनिशच्या आई - बाबांना आणी तिच्या बाबांना म्हणाली कि तुम्ही सर्व जण घरी जाऊन फ्रेश होऊन, काहीतरी खाऊन या तुम्ही सगळी इथे थांबून अजून विचार करतं राहाल, अनिशसाठी आपण सर्वानी व्यवस्थित असणे गरजेचे आहे.. मी आणी हे अनिशचे मित्र पारस आहोत इथे... तिचं ऐकून थोड्या वेळाने तिघेही घरी जायला निघाले.
सर्व गेल्यावर पारसने आसावरी आणी त्याच्यासाठी चहा आणी नाश्ता आणला, आणी आसावरीला बोलला तू खाऊन घे, तुम्ही सगळे अनिशची जेवणासाठी घरी वाट बघत असतानाच हे सगळं कळलं ना त्यामुळे तू पण संध्याकाळपासून उपाशीच आहेस, आसावरीने नाश्ता केल्यावर तीला पण जरा बरं वाटलं...
आसावरी पारसला बोलू लागली, चालतील ना हे पुन्हा, पारस म्हणाला, हो तसं काळजीचचं कारण आहे... आसावरी म्हणाली नक्की चालतील अनिश...मी आहे त्यांच्याबरोबर... तिच्या आत्मविश्वासाने बोलण्याच्या दृष्टीकोणाकडे पारस बघतच राहिला...
आसावरीच्या डोळ्यात पाणी आलं ती पारसला म्हणाली मी फ्रेश होऊन येते हा, ती तिकडे गेली तोपर्यंत इकडे शिवानी आणी तिचे पप्पा शरद अनिशला बघायला आले, पारस ने त्यांना हे कसं घडलं ते सर्व सांगितलं..पारसला तशीही शिवानी आधीपासूनचं आकडू मुलगी वाटायची...
अनिशच्या पायाच कळल्यावर शरद आणी शिवानी नाराज झाले, शिवानी तर विचारातच पडली, थोडा वेळ थांबून दोघे काही मदत लागली तर नक्की कळवा असं बोलून निघून पण गेले.
पारसला शिवानीच्या वागण्याचं खुप आश्चर्य वाटलं, त्याच्या मनात येऊन गेलं ही शिवानी अनिशच्या पायाच्या अपघाताच ऐकून चरकली, तीला वाटलं असेल असा नवरा नको आणी हा आमचा अनिश तिच्यावर जीव ओवाळून टाकतोय, त्यापेक्षा ही आसावरी अनिशसाठी जीवाचं रान करतेय, रात्रभर त्याच्या सेवेसाठी इथे राहिली आहे...
शिवानी आणी शरद खाली आले आणी गाडीत बसले, शरदला त्यांच्या नात्याबद्दल कुणकुण होती त्यामुळे त्याने सरळ शिवानीला विचारलं, तू अनिशच्या पायाबद्दल ऐकलंस ना... लग्नाच्या बाबतीत निर्णय विचार करून घ्यावा, आता हा अनिश अजून किती दिवस असा बेडवर पडून राहिलं काय माहित...
“हो पप्पा मी तोच विचार करते आहे. एका अपंग मुलाबरोबर मी आयुष्य नाही काढु
शकतं. अनिश कधी चालू शकेल हे डॉक्टर सांगत नाही आहेत कि चालेल कि नाही हे पण आपल्याला माहीत नाही आहे, आता तसा तो पायाने कमजोरचं राहिलं...
मला पण ह्या नात्यात मी अडकून पडून त्याची सेवा करण्यात माझा वेळ वाया घालवू नये असचं वाटतं आहे... मी त्याच्याशी संपर्क ठेवू नये असंचं मला पण वाटतंय.
शिवानी अगदी ठामपणे म्हणाली. ते ऐकून शरद खुशचं झाला... दोघे घरी आले.
इकडे सकाळी अनिश शुद्धीवर आला,
कसा आहेस बाळा, प्रेरणाताईनी रडत विचारलं,
आई काय झालं, माझा अपघात कसा झाला, अनिश प्रश्न विचारू लागला...प्रतापराव आणी प्रेरणाताई आसवं लपवत त्याला सगळं सांगत होते.
आसावरी आणी पारस आत आले, कसा आहेस पारसने विचारलं, अनिशने खुणेनेच पारसला शिवानी बद्दल विचारलं, ती तू बेशुद्ध असताना येऊन गेली... पारस हळूच बोलला..
सहा दिवसांनी अनिशला आय.सी.यु मधून बाहेर शिफ्ट केलं, त्याला आता थोडं फ्रेश वाटतं होतं परंतु राहून राहून त्याला प्रश्न पडला होता की
आपल्याला पाय का हलवता येत नाहीत?
आपल्याला पाय का हलवता येत नाहीत?
आसावरी सततच हॉस्पिटलमध्येचं होती परंतु शिवानी बघायला आली नाही आणी
साधा एक फोनही न केल्याचं त्याला वाईट वाटतं होतं.
रात्री डॉक्टर राऊंडवर आल्यावर अनिशने विचारलं
डॉक्टर मला माझे पाय हलवता येत नाहीत, कशामुळे होतंय असं...मला माझ्या पायांबद्दल शंका यायला लागली आहे, तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं नीट, विश्रांती घ्या, असं बोलून डॉक्टर निघून गेले...
पारस अनिशला बोलू लागला, आता लवकरच डिस्चार्ज मिळेल तुला, अनिश हो बाबा कंटाळून गेलो आहे ह्या हॉस्पिटलच्या वातावरणाला असं हसून बोलला...
दुसऱ्या दिवशी अनिशला स्पेशल रूममध्ये आणण्यात आलं, त्याला पायाला संवेदना जाणवत नव्हत्या, तो चिडून बोलू लागला अरे माझे पाय लागतं नाही आहेत कोणी काही सांगत कां नाही आहे मला...
प्रेरणाताईना तो ओरडून, चिडून विचारू लागला मी चालू शकणार नाही आहे कां, बाबा सांगा ना, बाबांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं ते बघितल्यावर अनिश बोलला उत्तर मिळालं आहे मला....
आसावरी बोलली, तुम्ही नक्कीच चालणार आहात, आणी माझा चमत्कारावर पूर्ण विश्वास आहे, काही होणार नाही तुम्हाला, माझा आत्मविश्वास सांगतोय कि तुम्ही पूर्वीसारखे चालू, हिंडू शकणार आहात... तुम्ही पूर्वीसारखे ऑफिसला जाणार आहात, तिच्या शब्दात जादु होती ती भरलेल्या आत्मविश्वासाने बोलत होती ते बघून अनिशच्या डोळ्यात पाणी आलं... त्याच्या मनात पहिल्यांदा आसावरीविषयी आपुलकी दाटून आली..
आता अनिशच्या जखमा भरून आल्या होत्या, आता त्याला व्हीलचेअरवरचं बसून राहावे लागे, त्यामुळे त्याची चिडचिड वाढत चालली होती, चार दिवस म्हणून राहायला असलेली आसावरी पंधरा, वीस दिवस झाले तरी अनिशच्याच घरी होती...
हळूहळू व्हीलचेअर सोडून कुबड्यांच्या साहाय्याने अनिश स्वतःची काम करू लागला होता. या काळात त्याची आसावरी बरोबर चांगली मैत्री पण झाली.
आसावरीचं तिथे राहणं तिच्या आईला पटत नव्हतं, पण आसावरी ऐकत न्हवती, त्यामुळे तिच्या आईचा नाईलाज झाला होता...तीला प्रेरणाताई बरोबर अनिशची सेवा करायला आवडत होतं.
बाबा मला आता घरात बसून खुप कंटाळा येतो. आपली कंपनी जॉईन करू का?” असं अनिशने विचारल्यावर त्याचे बाबा खुप खुश झाले, त्यांनी त्याला रोज गाडीने ऑफिसला पोचवायची सोय केली..
एव्हाना अनिशचा आसावरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्याच्या मनात हल्ली सारखं येई, ‘ह्या मुलीला आपण नाकारून मोठीच चुक केली. आसावरी खरंच खूपचं गुणी मुलगी आहे.
आणी जिच्यावर मनापासून प्रेम केलं ती शिवानी तीने कठीण काळात माझी साथ सोडली, आणि ही आसावरी त्या काळात माझ्या कुटुंबाच्या पण पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.विचार करत तो आसावरी कडे पाहत खिडकीत बसला होता.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - हे नातं कोणत्या वळणावर नेवून पोचंतं ते )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा