Login

प्रेमाची वीण - भाग - 36

Premachi Vin

भाग - 36


( मागच्या भागात आपण बघितले - अनिश आणी आसावरी एका अश्या वळणावर आले आहेत कि जिथून त्यांना मागे फिरताही येत नाही आहे आणी कोणताच निर्णय पण घेता येत नाही आहे - आता पुढे )


केदार गप्पा झालेला बघुन आसावरीचं बोलू लागली,  तू काय करतोस मग. लग्न केलंस कि नाही.

नाही ग! चांगली मुलगी मिळालीच नाही ...
मी सी ए झालो, माझी स्वतःची एक छोटीशी फर्म आहे .
अरे वा, छान..आसावरी खुश होवून बोलली.


केदारची प्रगती बघून आसावरी मनातल्या मनात म्हणाली, केदारच खरं प्रेम होत माझ्यावर , त्याने स्वतःला सिध्द करून दाखवलं आणि तो आता अश्या वळणावर मला भेटतोय जेव्हा मी अनिशला माझं आयुष्य मानलं आहे...  

कसल्यातरी विचारात ती गढलेली पाहून केदार  म्हणाला . “कसला एवढा विचार करते आहेस?”
काही नाही सहजच ... आसावरी एवढचं बोलून गप्प झाली.

खरतरं आज केदारने आसावरीला मागणी घालायचं ठरवलं होत.. पण का कोण जाणे तिच्या एकदम अलिप्त वागण्यामुळे त्याने तो निर्णय बदलला. मग ते असंच इकडचं तिकडचं बोलले, आणि केदारने तिला घरी सोडले.

ती कारमधून उतरताच केदारने तिला हाक मारली, आणि विचारले “आपण परत भेटलो
तर चालेल ?”
“हो चालेल ना,  फक्त सध्या मला वेळ नसतो. मी तुला फोन करून सांगेन ..आसावरी म्हणाली.


मी वाट पाहीन... असं म्हणून एकमेकांना बाय करून दोघे निघाले .

अनिश त्याच्या रुमच्या खिडकीतून हे सर्व पाहत होता. त्याला एकदम भरून आलं. त्याने स्वतःला सावरलं.


आसवरीला चांगला जोडीदार मिळतोय, मी तिच्या आयुष्यातून लांब गेल पाहिजे असा तो विचार करू लागला.. तेवढ्यात आसावरी त्याच्या रुममध्ये आली आणि बोलू लागली..

कसा गेला तुमचा आजचा दिवस, छान ...अनिश बोलला.


“हे पेढे घ्या ना?” तिने हातातला पेढ्याचा बॉक्स पुढे करत अनिशला म्हंटल...

कशाबद्दल पेढे विचारायच्या आधीच अनिश म्हणाला....


अरे वा...लग्न ठरल का?”
काय लग्न..... आसवारीला कसलाच अर्थबोध लागेना..


थोड्यावेळापूर्वी तुम्हाला केदार सोडायला आलेला पहिला ....म्हणून....” अनिश एवढं बोलून  गप्प बसला.


आसावरीला हे अपेक्षित नव्हत.. तिने हातातला पेढ्यांचा बॉक्स टेबलावर ठेवला आणि ती तिथून निघून गेली...

ती आपल्या रुममध्ये आली. तिचे डोळे डोळे पाण्याने
भरले. तिच्या मनात आलं.,
“काय नाही केलं आपण अनिशसाठी. पण त्याने हे बोलताना माझ्या मनाचा जराही विचार केला नाही , तो सरळ केदारबरोबर माझं नात जोडून मोकळा झाला?


का राहतेय मी इथे ... त्याच्यासाठीच ना. बस्स झालं आता अनिशलाच माझ्याबद्दल काही वाटत नाही तर
मी तरी का एवढा प्रयत्न करतेय....


आसावरी अशी काहीच न बोलता पटकन निघून गेल्यावर अनिशलाहि कसतरीच वाटू लागलं.


तो असाच  रूममध्ये बसून राहिला थोड्यावेळाने त्याची आई त्याला बोलवायला आली आणि जेवायला चल असं बोलली, आसावरी डायनिंग टेबलवर पण जेवायला आली नाही ते बघून त्याने आईला विचारले आसावरी कुठे आहे आणि आज एवढं गोडाच श्रीखंड पुरीच जेवण का ... 


त्यावर त्याची आई म्हणाली अरे आसावरी पेढे द्यायला आली तेव्हा तुला काही बोलली नाही का... अरे आसावरीच्या चित्रासाठी तिला एक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे ...


आता अनिशला स्वतःचाच राग आला. त्याने आसवारीला दुखावले होते.


त्यानंतर अनिशला आसावरीला सॉरी कसं म्हणावं तेच समजत नव्हते कारण आसावरी त्याचाशी बोलत नव्हती.


दरम्यान केदारने आसवारीला संपर्क कारण्याचा प्रयत्न केला. पण तिने प्रतिसादच नाही दिला .


शेवटी वाट बघून केदार तिच्या चित्राच्या प्रदर्शनच्या जागी गेला ..

अग किती फोन करतोय तुला ...
मी जरा गडबडीत होते अरे,

तुझ्याशी जरा बोलायचं आहे प्लीज समोर कॉफी पियायला जावूया ना .. आसावरी दोन तीन वेळा नको नको म्हणत होती पण केदार ऐकेना म्हणून तिचा नाईलाज झाला. ती दोघं कॉफी शॉपमध्ये आली.


“बरं झालं तू भेटलास केदार मला पण तुझ्याशी बोलायचं आहे...आसवरीने बोलायला सुरवात केली..

छान हे मी भेटायला जबरदस्ती केल्यावर सांगतेस का.. केदारने विचारलं..


“नाही. तसं नाही. फक्त सुरवात कशी करायची तेच समजत नाहीये... आसावरी बोलली..


“ठीक आहे. मग मी सुरवात करतो , लग्नाचं काय ठरवलं आहेस, केदारने स्पष्टच विचारलं..
“हे बघ, केदार तू समजतोस तसं तुझ्याबद्दल माझ्या मनात काही नाही आहे...
मला कोणीतरी दुसरं आवडतंय .. आसावरी बोलली...


कोण अनिशचं ना...
“होय मला खूप आवडतात  ते , माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर पण त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही हे दुःख आहे, आसावरीचे डोळे पाणावले ....

“तू याविषयी त्याच्याशी बोलली आहेस का?” केदार त्याच्या मनातल्या भावना दाबत बोलला...

सगळ्याचं गोष्टी बोलायला लागतात का.. आसावरी रडत बोलली...

पण त्याचं माझ्याशी फटकून वागणं जास्त आहे त्यामुळे त्यांच माझ्यावर प्रेम नाही... हे सिद्ध होतंय...

आता मात्र केदारला हे कोड सोडवावं असं वाटू लागलं. त्याला ह्या नात्यासाठी काहीतरी करायचला हवं अनिश – आसावरीला जवळ आणावं असं मनापासून वाटू लागलं...


केदारला दुसर्याच दिवशी आठवलं मागे प्रदर्शनला अनिशबरोबर त्याचा एक मित्र पारस पण होता त्याला भेटून केदारने हा गुंता सोडवायचं ठरवलं..


दुसर्याच दिवशी केदार पारसला भेटला आणि बोलला असं असं आहे आणि आसावारीचं खूप प्रेम आहे अनिशवर. अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही रे. मी कमनशिबी आहे खरतरं... आयुष्यभर माझ्या मनाला
हे सल बोचत राहणार.. असो पण तिचं सगळं चांगल होणं गरजेचं आहे.


पारस बोलू लागला , खरतरं अनिशचं पण आसावरीवर खूप प्रेम आहे पण त्याच्या अपंगत्वामुळे – आसावरीला स्विकारण हा त्याला त्याचा स्वार्थ वाटतो , तिच्या आयुष्याची वाट लावणं असं वाटत .. आता केदारच्या मनातली रागाची जागा आपुलकीने घेतली , त्याला अनिशचा आदर वाटू लागला...


अनिश बरा व्हायला हवा रे . आपण काहीतरी
करूया ना....केदार तळमळीने म्हणाला.


हो रे मी तर भाऊच मानतो त्याला. त्याच्यासाठी मी कितीतरी डॉक्टरच ओपिनिअन घेतलं..
त्याच्या मनावर काहीतरी जबरदस्त आघात व्हायला हवा ... आता त्याची इच्छाशक्तीच काहीही करू शकते. असं झालं तरच तो चालू शकतो.. असं पारस म्हणाला ...


केदार म्हणाला आता मी माझा एक प्रयत्न करून बघतो ... तू फक्त माझी साथ दे.. नक्की यार आपण ह्या दोघांना एकत्र आणायचंचं आता. ह्यात आता आपण अनिशच्या आईला पण जरा सामील करून घेवू.. मी आणि तू अधून मधून अनिश्च्या घरी जायचं सहजच मित्र म्हणून आणि मग एक दिवस सर्वाना माझ्या गावी दापोलीला घेवू जावू तिथेच काहीतरी अनिशवर आघात होई,  असा प्लान करू बघू कस शक्य होत ते.


डन, केदार खरच अनिश चालू लागला ना यासारखा मोठा आनंद नाही... पारस खुश होवून बोलला...

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत – केदार अनिश आणि आसावरीला त्यांच्या नात्यात कशी मदत करतो ते...)

🎭 Series Post

View all