भाग - 37
( मागच्या भागात आपण बघितले - केदार आणी पारस अनिश आणि आसावरीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आता पुढे )
केदार, पारस आणि अनिश आता नेहमी भेटू लागले, केदार आणी पारस मिळून अनिशच्या घरी पण अधून - मधून जाऊ लागले, सर्व मिळून गप्पा मारू लागले, आसावरी, अनिश, केदार, पारस मिळून कॅरम खेळू लागले.
अशातच चार दिवसांनी आसावरीच्या एका चित्राला पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात तीने सर्वाना रात्रीच्या जेवणासाठी घरी आमंत्रण दिलं, तीने एकटीने सर्व स्वयंपाक केला, अनिशच्या आवडीची बासुंदी पण आवर्जून केली होती.
जेवण झाल्यावर सर्व अनिशच्या रूममध्ये गप्पा मारत बसले होते, ह्यावेळी अनिशची आई पण त्या गप्पामध्ये सामील झाली होती, आणी केदारने वेळ साधून सर्वाना कुठेतरी दोन दिवस पिकनिकला जाऊया कां असं सुचवलं, हा स्पॉट नको तो स्पॉट नको करता करता गुहागर फिक्स झालं आणी मग सगळे मिळून येत्या शनिवार- रविवार पिकनिकला जाऊया असं ठरलं...
ठरल्याप्रमाणे सगळे शनिवारी सकाळी लवकरच सहा वाजता जायला निघाले, पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे वातावरण सुंदर होते, नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यामुळे मातीचा सुंगध सगळीकडे पसरला होता, सर्व जण हॉटेलवर पोचले.
सर्वजण दमले होते म्हणून सर्वानी विश्रांती घ्यायचं ठरवलं, पण आसावरी म्हणाली तुम्ही सर्व झोपा मी माझी अंघोळ करून घेते आणी देवाचं रोजचं स्तोत्र वाचन पण करून घेते.
आसावरीने मनोमन देवाला प्रार्थना केली आणी म्हणाली अनिश पूर्ण बरा होऊ देत. पहिल्यासारखा हिंडू - फिरू लागुदेत, काहीतरी नक्कीच चांगलं होणार ही तिच्या मनातली इच्छा अजूनच प्रबळ झाली.
थोड्या वेळाने एक एक करतं सर्वजण उठले, चहा-नाश्ता,अंघोळी आटोपल्यावर सर्वानी बाहेर फिरायला जायचं ठरवलं.
सर्वप्रथम इथल्या ग्रामदैवतेच दर्शन घेऊन मग फिरायला जाऊ असं ठरलं, सगळे देवळात जायला निघाले, आसावरीने साडी नेसली होती. केसांची सैलसर वेणी घातली होती, ती खुप सुंदर दिसत होती. देवदर्शन झाल्यावर सगळे बीचवर निघाले.
अनिशची मात्र दमछाक झाली होती. नाही म्हंटल तरी कुबड्यांचा त्याला त्रास होई. त्याच्या दमलेल्या चेहऱ्याकडे बघून आसावरीला कसतरीच वाटलं. तीने संध्याकाळ होतं आली हे बघून निघूया असं सर्वाना सुचवलं, सात वाजत आले होते, काळोख व्हायला सुरवात झाली होती.
सर्वजण निघाले, एका ठिकाणी गाडी थांबवून चहा पिण्यासाठी थांबले असताना गाडीत एकटीच आसावरी थांबली आहे बघून दोन चोरांनी तीच्या गळ्यातीळ चैन ओढण्याचा प्रयत्न केला, ती ओरडली तसं त्यांनी तीला बाहेर काढून तिच्या गळ्याला चाकू लावला, सगळे धावत आले, त्यातल्या एका चोराने पटकन पारस आणी केदारला पकडून चाकू दाखवला..
आसावरी संकटात होती, अनिशच्या डोळ्यासमोर त्या
मारेकऱ्याने तीला पकडलं होतं. आसावरी त्याच्या तावडीतून सुटण्याचा आटापिटा करत होती. त्या माणसाने सुरा अजून गळ्याजवळ नेला.
अनिश मला वाचवा, मला मरायचं नाही आहे असं जिवाच्या आकांताने आसावरी ओरडू लागली..
तो प्रसंगच भयानक होता. आणी एक चोर ओरडला अरे तो अपंग आहे तो काय मदत करणार तुला...
आता अनिश हादरला आणी थोड्याचं वेळात अनिशच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होतं - काहीही करून आसावरीला वाचवायचं. तो उठायचा प्रयत्न करू लागला पण परत पडला. त्याने पुन्हा प्रयत्न केला आणी आता त्याच्यात दहा हत्तींचं बळ आलं होतं. तो उठून उभा राहिला..
त्याने बेसावधपणे उभ्या असलेल्या त्या मुलाला एकच ठोसा मारला. तो मुलगा जमिनीवर पडला,अनिशने त्याची गचांडी पकडली, आणी त्याला उचललं, आणी जोरात ओरडून बोलला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आसावरीला हात लावायची...
अनिशला उभं राहिलेलं बघून आसावरी आनंदाने रडू लागली, ते बघून केदार हसायला लागला, आणी ती दोन मुलं सॉरी दादा, मॅडम तुम्हाला लागलं कां, सॉरी हा... असं बोलू लागले. अनिश चिडला आणी ओरडून बोलू लागला, अरे केदार हसतोस कां, आज आसावरीला काही झालं असतं तर...
हसत केदारला उभा असलेलं पाहून अनिशला काहीच कळेना, अरे मी गंमत केली असं सहजच केदार बोलून गेला... अरे माझं राहुदेत तू स्वतःच्या पायावर उभा आहेस ते बघ आधी... अनिशने आनंदात केदारला मिठी मारली...
सर्वच घटना इतक्या पटकन झाल्या कि आसावरीला व्यक्त व्हायलाच वेळच मिळाला नाही, तीला त्या परमेश्वराचे आभार कसे मानावेत हेच कळेना.
ज्या क्षणाची ती गेले नऊ महिने वाट बघत होती तो क्षण आला होता.. आसावरीने केदारचे अक्षरशः पाय धरले आणि बोलली तुझे कसे आभार मानू तेच कळत नाही आहे... केदार म्हणाला कर्ता करविता तो देव आहे अगं मी फक्त निमित्तमात्र झालो...
केदार अनिशला बाजूला घेऊन बोलला, अजून एक गोष्ट कर ना, आसावरीला मस्त तुझ्या स्टाईल मध्ये घरी गेल्यावर लग्नासाठी विचार, ती तुझी वाट बघतेय अरे...हो उदया घरी गेल्यावर नक्की अनिश हसून बोलला..
सगळे घरी पोचले, सगळीजण आनंदी होते, प्रेरणाताई आणी प्रतापराव तर केदारला हात जोडून धन्यवाद बोलले. दुसऱ्या दिवशीची सकाळ सुंदर प्रसन्न होती, घरी सगळेच खुश होते...
अनिश नाश्ता करायला डायनींग टेबलवर आला, त्याच्या आवडीचे आलू - पराठे आज नाश्त्याला होते ते बघून तो अजूनच खुश झाला. नाश्ता झाल्यावर तो तसाच उठून सोफ्यावर बसलेल्या आसावरीकडे गेला... आणी बोलू लागला...
आसावरी मी तुझ्याबाबतीत नेहमीच चुकलो. पण मी तुझ्याशी मुद्दाम नाही असं वागलो, ज्यावेळी माझ्याकडे सर्व होतं त्यावेळी तू मला नको होतीस आणी आता माझ्या पडत्या काळात तुला कोणत्या तोंडाने मी मागणी घालणार होतो. म्हणून मी तुझ्यापासून लांब राहू लागलो होतो.
पण आज मला तुला काही सांगायचे आहे....
तू मला आयुष्यभरासाठी माझ्या आयुष्यात हवी आहेस. माझ्याशी लग्न करशील?”
आसावरीचे डोळे आनंदाश्रूनी भरले.
आसावरीने मानेनेच होकार दिला..
प्रेरणाताईनी फोनवर लगेचच आनंदाची बातमी आसावरीच्या घरी कळरवली. आसावरीच्या घरचे ताबडतोब आले..
प्रेरणाताईनी फोनवर लगेचच आनंदाची बातमी आसावरीच्या घरी कळरवली. आसावरीच्या घरचे ताबडतोब आले..
दोन दिवसात एका मोठया हॉलला अनिश - आसावरीचा साखरपुडा झाला. आणी पंधरा दिवसांनी लग्नाचा मुहूर्त पण काढला गेला. लग्न झाले, आसावरी सौ. आसावरी झाली, अशा प्रकारे अनिश आणी आसावरीच्या सुखी संसाराची सुरवात झाली..
संसार सुखाचा झाला, दोन वर्षाने आसावरीला मुलगा - मुलगी अशी दोन जुळी अपत्य झाली.
पुढच्या अंतिम भागात आपण बघणार आहोत अनिशच तर सर्व छान झालं पण शिवानी तीची आई नेहा आणी तिच्या घरचे ह्यांचं भविष्यात काय झालं ते...
( वाचकहो - भाग पोस्ट करायला खुप उशीर झाला त्याबद्दल सॉरी, पण त्यबेत बरी नसल्याने विलंब झाला.)
.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा