Login

प्रेमाची वीण - भाग -38 ( अंतिम भाग )

Premachi Vin

भाग - 38 ( अंतिम भाग )


( मागच्या भागात आपण बघितले - अनिश आणी आसावरीचा संसार सुखाचा होतो आता पुढे )


         इकडे शिवानी अमेरिकन मुलाबरोबर लग्न करून अमेरिकेत निघून जाते, पारस आणी अनमोल तिच्या जुन्या मित्र - मैत्रिणीच्या व्हाट्सअप ग्रुपवर असल्यामुळे इकडून - तिकडून एकमेकांबद्दल बातम्या कळत असतं.


       एका मैत्रिणीने पारसला सांगितलं शिवानी अमेरिकेत लग्न करून गेली पण तिकडेही तिचे तिच्या नवऱ्याबरोबर नीट पटत नव्हते, आणी तीला अमेरिका सोडून यायचं नव्हतं, मग कसतरी करून ती तिकडे राहू लागली, पण लग्नानंतर दोन वर्षांनी ती गरोदर राहिल्यावर तीला तीची फिगर खराब होईल म्हणून ते मुल नको होतं, आणी तिच्या नवऱ्याला ते मूल हवं होतं, त्यामुळे त्या दोघांत वाद होऊ लागले, आणी एके दिवशी शिवानी नवऱ्याला न सांगता ते मूल अबोर्ट करून आली आणी त्यामुळे त्या दोघांत खुप टोकाचे वाद झाले आणी ती घरं सोडून मुंबईला निघून आली. आता ती आणी तिचे वडिल शरद मिळून त्यांचा फॅमिली बिझनेस सांभाळतात...


       शिवानीची सावत्र बहीण ओवी इंजिनिअर झाली, दुसरा भाऊ स्वरूप लंडनला नोकरीला असतो आणी लहान भाऊ ओम सी ए झाला, ते तिघेही आपापल्या क्षेत्रात मस्त पुढे गेलेत. तीची आई नेहा - ओवी, स्वरूप आणी ओमकार बरोबर कायम साथीने राहिली, त्या तिघांना तीने चांगले संस्कार दिले, चांगले घडवले.


      शिवानी तिच्या वडिलांच्या अतिलाडामुळे कायम स्वतःचच खरं करत राहिली, आणी आता आयुष्यात एकटी पडलीय, तिच्या वडिलांना शरदना हल्ली बरं नसतं त्यामुळे शिवानी एकटीच कंपनीचा कारभार सांभाळते आहे...


      ओवीचं लग्न ठरलंय, तीला सुंदर सासर मिळालं आहे, ते बघून आता शिवानीलाही वाटतंय, मी पण माझं नातं टिकवलं असतं तर माझा पण सुखाचा संसार असता, पण बाबांनी केलेल्या अतिलाडामुळे मला कोणाचं ऐकून घ्यायची सवयचं नाही आहे, जे पाहिजे ते बोलल्यावर लगेचच बाबांनी आणून दिलं. त्यामुळे मी एकटीच शहाणी आहे असं वागू लागले..


      दोन नंबर भावाने तिकडे लंडनलाच एका मुलीबरोबर लग्न केले आहे, तो तिकडे सुखात आहे, ओंकारची पण त्याच्याच क्षेत्रातली गर्लफ्रेंड आहे ओवीच्या लग्नानंतर तो ही लग्न करणार आहे...


        बघता बघता पटकन पाच वर्ष सरली, ओवीला एक मुलगी झाली, स्वरूप तिकडे सुखात आहे, ओमकारचं पण लग्न झालं, मध्यंतरी शिवानीचे वडिल शरद वारले, त्यामुळे शिवानी अजूनच एकटी पडली, आई नेहाबरोबरं तिचं कधी जास्त पटलंच नाही, त्यामुळे आता घरात ओमकार त्याची बायको आणी आई नेहा असे सगळे छान मिळून मिसळून राहात असतं ते बघून शिवानीला कसतरीचं होतं असे, त्यामुळे तीने स्वतःहून वेगळं एकटीने राहण्याचा निर्णय घरी सांगितला...


        शिवानीला मनातून खुप वाटतं होतं कि सगळे तीला अडवतील जाऊ नकोस बोलतील पण तीला कोणीच अडवले नाही, ठीक आहे तू निर्णय घेतला आहेस ना तर तुझं खरं.. एवढंच तीची आई नेहा बोलली...

    

        शिवानी स्वतःचा फ्लॅट घेऊन वेगळी राहू लागली, तसंही ओमकारची स्वतःची फर्म असल्यामुळे घरी पैश्याची काहीच कमी नव्हती, शिवानी वडिलांचा बिजनेस सांभाळून एकटी राहून कंटाळून गेली आणी कालांतराने वयाच्या पन्नाशीमध्ये तीने एका सहा वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले. आता शिवानी निवळली आहे, स्वतःची मुलगी घरी आल्यावर नात्यांची किंमत तीला कळली आहे. ज्या पैश्यावर तीला माज होता तो माज आता राहिला नाही आहे, आता ती आणी तीची मुलगी मिळून आयुष्य एंजॉय करत आहेत...


इथे ही कथा संपते आहे, लवकरच भेटू एका नवीन कथेसह....


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all