प्रेमाची वाट...भाग 2
लग्नाची तयारी सुरू झाली सगळं घर आनंदाने
न्हालं होतं कारण सगळीकडे आनंद आणि उत्साह भरून होता.
न्हालं होतं कारण सगळीकडे आनंद आणि उत्साह भरून होता.
लग्नाची तारीख जवळ यायला लागली, तशी सायलीच्या हृदयाची धडधड वाढत होती. असा एकही क्षण गेला नाही की तिला समीरची आठवण आली नव्हती. समीरच्या आठवणीत ती व्याकुळ होत होती पण वारंवार तिला समीरचे शब्द आठवायचे 'प्रेम म्हणजे फक्त मिळवणे नाही तर त्याग सुद्धा आहे'.
सायली हळूहळू प्रेमाच्या वाटेवरून कर्तव्याच्या मार्गावर जाऊ लागली.
लग्नघरी पाहुणे यायला लागले. मंडप, हळद सगळा कार्यक्रम पार पडला.
लग्नाचा दिवस उगवला,
सायली तयार होऊन आरश्यासमोर बसली होती,
सायली तयार होऊन आरश्यासमोर बसली होती,
"सायली किती सुंदर दिसत आहे तू."
"समीर...समीर तू आलास?" ती लगेच मागे वळली.
तिचा चेहरा हिरमुसला कारण मागे कुणीही नव्हतं.
तिने इकडे तिकडे बघितलं.
तिने इकडे तिकडे बघितलं.
"इकडे तिकडे काय बघतेस सायली? तुला मला कुठे शोधायची गरज आहे का? मी तर तुझ्या मनात आहे, हो ना?"
"समीर समोर ये ना, प्लिज मला एकदा तुला बघायचं आहे.
का असं छळतोयस मला, ये ना एकदा."
सायली जोरजोरात ओरडली,
का असं छळतोयस मला, ये ना एकदा."
सायली जोरजोरात ओरडली,
"ये ना समीर."
तिने बाजूला ठेवलेला फ्लॉवरपॉट आरशाच्या दिशेने फिरकवला, काही क्षणात सगळीकडे काचेचे तुकडे विखुरले.
काचेच्या तुकड्याप्रमाणे तिच्या हृदयाचेही तुकडे झाले होते, कधीही न जुळणारे तुकडे.
काचेच्या तुकड्याप्रमाणे तिच्या हृदयाचेही तुकडे झाले होते, कधीही न जुळणारे तुकडे.
काही वेळाने तिने स्वतःला सावरलं.
लग्नाच्या मंडपात फक्त तिचं शरीर होतं मनाने तर ती समीर जवळ होती.
लग्न पार पडलं, निरोपाची वेळ आली.
सायलीचे डोळे समीरला शोधत होते. तिला शेवटचं त्याला बघायचं होतं पण तो आलाच नव्हता. जड अंतकरणाने तिने निरोप घेतला आणि सासरी गेली.
सायलीचे डोळे समीरला शोधत होते. तिला शेवटचं त्याला बघायचं होतं पण तो आलाच नव्हता. जड अंतकरणाने तिने निरोप घेतला आणि सासरी गेली.
वर्षे उलटली,
काही वर्षांनी सायली परत गावाला आली. तिच्या डोळ्यात समाधान होतं पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात समीरची आठवण होती. ती समजून चुकली की प्रेमाची वाट अनेकदा कठीण असते पण ती सन्मान आणि त्यागानेच सुंदर होते.
समीर अजूनही गावात होता, आपल्या शेतात रमलेला, तिच्या आठवणीत जगत आलेला.
अचानक एका वळणावर दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भेटल्या, त्यात काहीही शब्द नव्हते पण एकमेकांविषयी असलेली अपार माया स्पष्ट दिसत होती. प्रेमाचा मार्ग कुठेही जाऊ शकतो पण प्रेम मात्र हृदयात कायमच राहते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा