Login

प्रेमबंधन

प्रेमावर कविता
प्रेमबंधन


शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम
ओळकाव्य उपक्रम
#-ह्दयावरती-नाव-तुझे-मी- कधीच- कोरले
दिनांक:- १३०३२३

रुप आणि स्वभाव तुझा
मनात माझ्या कधीचाच बसला
तुला पाहुनी मन माझे हसले
ह्दयावरती नाव तुझे मी कधीच कोरले..!

आता तुझ्याविना माझे
जीवन एकाकी उरले
तु माझे मन चोरले
ह्दयावरती नाव तुझे मी कधीच कोरले.!

माझ्या नावाचे कुंकू तुला आहे लावायचे
तुझ्यासाठी मी सोन्याचे मंगळसूत्र बनविले
तुझे रुप मनात माझ्या भरले
ह्दयावरती नाव तुझे कधीच कोरले.!

आवडला माझा स्वभाव तुझ्या बाबांना
स्वप्न जावई त्यांचा बनण्याचा मी पाहिले
भाग्यलक्ष्मी तुला बनविण्याचे मी ठरविले
ह्दयावरती नाव तुझे मी कधीच कोरले..!

मोहन सोमलकर नागपुर