Login

प्रेमभंग आणी फसलेली ती

Prembhang
चॅम्पियनस ट्रॉफी - 2025


टीम वनिता


( सत्य कथा )


कथेचे नाव -प्रेमभंग


मुंबईला राहणारा अनमोल जोशी.

अनमोल श्वेताच्या गावी सहा महिन्यांसाठी एका प्रोजेक्टसाठी आला होता.


श्वेता चौदावीत शिकणारी मुलगी, घराला हातभार म्हणून पार्ट टाईम एका मोबाईलच्या दुकानात काम करत होती.


अनमोल त्यांच्या मोबाईलचं रिचार्ज करायला गेला असता तिथेच अनमोलबरोबर श्वेताची ओळख झाली. दोघांच्याही मनात तारुण्याची कैफ होती. प्रेमाचं पहिलं पाऊल उचलायला दोघंही आसूसलेली होती.


अनमोलचं स्मितहास्य, त्याचा गोड आवाज ह्याची श्वेताला भुरळ पडली. दोघेही सतत भेटू लागले. आता दोघंही गावात नं भेटता लॉजवर भेटू लागले. नंतर नंतर प्रेमाची जागा शारीरिक आकर्षणाने घेतली. एकमेकांना भेटल्याशिवाय राहावेनासे झाले.
अशातच पटकन सहा महिने कधी सरले हे समजले सुद्धा नाही.


अनमोल जायची वेळ झाली. अनमोलने तिला विश्वातसात घेतलं.
"श्वेता, मी लवकर येतो. फक्त थोडा वेळ वाट बघ." त्याच्या त्या शब्दांनी ती आश्वस्थ झाली.


दिवस उलटत गेले, आठवडे गेले आणि अनमोलचा फोन बंद येत होता. त्याचा कॉल येईनासा झाला.


श्वेताला महिन्यांपूर्वी कळलं होतं, की ती गरोदर आहे. सुरुवातीला तिला खूप आनंद झाला.
'आता मी आणि अनमोल एकत्र एक नवीन आयुष्य सुरू करणार' ती स्वतःशी बोलायची. 


पण अनमोलचा काहीच कॉन्टॅक्ट होतं नव्हता. तो नक्की येईल ही तिची वेडी आशा होती.


घरात रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशात ती स्वतःचं भविष्य पाहत होती. अनमोल आणि तिचं जन्माला येणारं मुलं.. याचा ती सतत विचार करतं राही.


तिच्या डोक्यातं सारखा विचार येत असतं, की बाळाचं नाव काय ठेवायचं? त्याला कोणत्या गोष्टी शिकवायच्या? प्रत्येक विचारात तिला सुख मिळायचं, पण त्या सुखातही चिंता होतीचं.


अनमोल परत येण्याची चिन्ह धुसर होतं होती हे सगळं माहित असताना 'तो नक्कीच येणारं' असं सतत ती स्वतःला समजावत राहिली. ती त्याच्या प्रेमात ठार वेडी झाली होती.


श्वेता एकटी पडली होती. शरीर थकलेले होते, मन उदास झाले होते, डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह सुरू होता, पण ती वाट पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती.


ती स्वतःशी बोलत राही. 'अनमोल.. माझ्या मैत्रिणी बोलतायत तसा तू फसवा तर नाही आहेस. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. तू नक्कीच येशील.' पण उत्तर कुठेच नव्हतं.


ती समुद्रावर जाऊन बसायची. स्वतःशीच बोलायची. 'अनमोल.. तू खरंच येणार होतास ना!' तिचा आवाज वाऱ्यात मिसळून जायचा.


वाट बघत दोन महिने गेले. आता आपली पाळी आली नाही, तर आईला काय उत्तर द्यायचं? याची तिला चिंता वाटू लागली.


ती गावच्या वेशीतल्या जुन्या मातीच्या पावलांवर चालत होती. पायांमधली ताकद नाहीशी झाली होती. एका क्षणी मन हरलं आणि तिने ठरवलं की तिच्या दुःखाचा शेवट करावा. अंधारलेलं भविष्य घेऊन कसं जगायचं.


प्रेमाच्या आणाभाका घेतलेला अनमोल. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही असं सतत बोलणारा अनमोल तिच्या नजरेसमोर येत होता.


ती चालत चालत तिच्या नेहमीच्या समुद्र किनाऱ्यावर गेली. अनमोलचा विचार करता करता श्वेता खोल पाण्यात गेली.


श्वेताने शेवटी अनमोलची वाट बघून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता.


इकडे घरी संध्याकाळ होऊन गेली तरी श्वेता अजून घरी आली नाही; म्हणून शोधाशोध सुरु झाली.
"श्वेता.. श्वेता कुठे आहे?" आई वडील आक्रोश करत होते.


दोन दिवसांनी श्वेताची बॉडी गावच्या समुद्राच्या काठावर मिळाली.


आई वडील रडत ओरडत होते.
"काय.. काय झालं? माझ्या मुलीसोबत हे कसे होऊ शकते?"
छोटा भाऊ आणि बहीण घाबरून रडत होते. हातात हात धरून बसले होते. घरातले वातावरण अचानक काळोखाने भरून गेले.


आई बॉडीच्या अंगावर हात ठेवून श्वेता श्वेता करून रडत होती.

पण घरात फक्त आक्रोश आणि आक्रोश.


एकेकाळी हसतमुख असणारी श्वेता, आता शांत झोपेत घरच्यांच्या समोर पडलेली होती. घरच्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हृदयातून किंचाळी उठते, वडील तिच्या बॉडीला मिठी मारून रडत होते.


घरातले वातावरण आता फक्त दुःख आणि आक्रोशाने भरलेले होते. प्रत्येकाच्या मनात एकचं प्रश्न असतो. श्वेताने असं कां केलं?


बॉडी तपासणीला गेल्यावर समजतं, की  श्वेता गरोदर होती. आई वडील हे ऐकून अक्षरशः हादरतात.


काही दिवसांनी श्वेताची एक जवळची मैत्रीण प्रिया त्यांच्या घरी येते.


प्रिया रडत सांगते,"काकी अनमोलने तिला फसवले आणि मग तो पळून गेला. श्वेताला वाटलं, की तो येईल. तिने खूप वाट बघितली, पण तो आला नाही आणि म्हणून तिने हे पाऊल उचललं."


श्वेताचे वडील तिला विचारू लागतात," प्रिया तुझ्याकडे अनमोलचा मोबाईल नंबर आहे कां? आपण निदान न्याय मिळवून श्वेताला श्रद्धांजली देऊ." प्रिया अनमोलचा मोबाईल नंबर त्यांना देते.


श्वेताचे आई वडील अनमोलच्या विरोधात तक्रार दाखल करतात.


अनमोल वर्षाने त्याचा मोबाईल चालू करतो आणि तो पकडला जातो. त्याला अटक होते.


श्वेताचा अंत झाला, पण तिचं दुःख गावातल्या बाकीच्या मुलींना एक धडा देऊन गेलं...


क्षणिक आकर्षणाचं नाव प्रेम नसतं, खरं प्रेम आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देतं...


मुलींनो क्षणिक प्रेमाला भुलून आपल्या आयुष्याची वाट लावून घेऊ नका. आपल्या आई वडिलांचा विचार जरूर करा.


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0