३ पेमाचे घरटे
दुसऱ्या दिवशी आराध्या नेहमीपेक्षा लवकर उठली होती. कारण तिला त्या पक्षाची काळजी वाटत होती. आपण ठेवलेले पाणी संपले तर नाही ना! त्या पक्षाने काही खाल्लं असेल की नाही?
आराध्या धावत बाल्कनीत गेली. तर तो पक्षी तिथे दाणे खात बसला होता.
"आई, ए आई. बघ त्या पक्षाला भूक लागली होती. म्हणून तो दाणे खात आहे आणि त्याने पाणी सुध्दा पिले."
"अरे वा! माझ्या छकुलीला किती आनंद झाला आहे ना! "
"हो आई. पण त्याच पिल्लू मरून पडल तेव्हा. त्याला कित्ती वाईट वाटल असेल ना! ए आई, आपण त्याच्या साठी घरटं बांधायचं का? म्हणजे त्याच पिल्लू कधीच झाडावरून पडणार नाही."
तिचा हा विचार ऐकताच स्मिता आणि अनिकेतला आश्चर्य वाटले.
"अहो, आता हे काय नवीन खुळ."
"अग नको काळजी करू. मी तिला समजावतो."
"हे बघ आराध्या, हे पक्षी असतात ना. त्यांना असं आपण ठेवलेल्या घरात नाही राहायला आवडत. ते या निसर्गरम्य वातावरणात आनंदी असतात. त्यांना झाडांवरच राहायला आवडत. एक एक काडी, कापूस जमा करून आणतात आणि स्वतः च छान घरटं तयार करतात. तिथेच ते त्यांच्या पिल्लांना मायेची उब देतात."
"हो पण आपल्याला सुध्दा त्याची काळजी घ्यावी लागेलच ना!"
"आराध्या बाळा अजून तू खूप लहान आहे. नको हट्ट करू. जा आता शाळेत जायला उशीर होत आहे. आवर पटकन."स्मिता
स्मिता आणि अनिकेतने आराध्याला समजावून सांगितले. पण आराध्या खूप नाराज झाली होती. तिच्या मनात चलबिचल सुरू झाली होती. पण तिने मनाशी ठरवलेच होते. की आपण घरटं तयार करायचं म्हणजे करायचं.
अनिकेत कामावर निघून गेला. स्मिता तिच्या कामात लागली. आराध्या दुपारी शाळेतून परत आल्या आल्या ती बाल्कनीत पळाली.
"आई, आज तो पक्षी नाही आला का ग? मला त्याच्यासाठी घरटं बनवायचं म्हणजे बनवायचं आहे. हे घे कागद आणि कैची. मला घरटं बनवायला मदत कर."
"अग नको आराध्या. शक्यतो गेला असेल बाळा तो पक्षी. कदाचित दुसऱ्या ठिकाणी घरटी बांधायला…"
आईने हळुवारपणे समजावलं.
आईने हळुवारपणे समजावलं.
"म्हणजे त्याला सुरक्षित ठिकाणी घरटं बांधायचं आहे का? आपण बांधलेल्या घरट्यात तो राहणार नाही का?"
आराध्याचं चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ती नाराज झालेली बघून..
"आराध्या हे बघ मी काय आणले आहे?"
"आई, तू घरटं विकत आणले. वाॅव, मस्त!"
"हो, आपण हे बाबांच्या हाताने टांगू या. कदाचित तू दिलेल्या प्रेमामुळे आणि करुणेमुळे त्याला पुन्हा नव्याने सुरुवात करायचं बळ मिळेल. तुझ्या पंखांच्या सावलीत तो पुन्हा हसेल."
आराध्या खूप वेळ त्या फांदीवर बसलेल्या पक्षाकडे बघत राहिली. आता तिच्या डोळ्यांत दुःख नव्हतं, तर समाधान होतं – आपण एका छोट्याशा जीवाला आधार दिला, त्याच्या दुःखात सहभागी झालो. एका नव्या उमेदीने तो परत अंडी घालणार आणि त्याची पिल्ले पण दाणे खायला येणार.
संध्याकाळ झाली होती. तो पक्षी परत बाल्कनीत आला आणि दाणा पाणी टिपू लागला.
"आई, आता माझी आणि त्या पक्षाची चांगली मैत्री झाली. आता तो मला भेटायला .रोज भेटायला येणार."
त्या दिवशी एका पक्ष्याच्या दुःखातून, प्रेमातून आराध्या मोठी झाली होती – समजूतदार, करुणामय, आणि खऱ्या अर्थाने माणूस आणि खरोखरच एके दिवशी तिने घरट्यात दोन अंडी बघीतली आणि आराध्याला खूप आनंद झाला.
©® अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा