प्रेमगंध भाग : १
" अग ये सुंगधा चल आवर लवकर शेताकडे गेलं पाहिजे " सुंगाधाची आई मालती बोलत होती.
हो हो आले ... आले ..! सुंगधा पटापट आपली घरातील कामं आवरुन शेतात जाण्यास तयार झाली. शेत तर तणाने बुजबुजलेलं होतं. मालती आणि सुंगधा वेळकाळ न बघता शेतात राबत होत्या.
" अग ये मालती आणि सुंगधा या जेवण करायला फार वेळ झाला आत्ता " सुंगधाचा बाप शिरपा लांबूनच ओरडत होता. शेतातील हिरव्यागार झाडाखाली सुगंधा आणि मालती जेवण करायला बसल्या. झुणका भाकर , वरणभात यावर यथेच्छ ताव देऊन मालती व सुंगधा जरा वा-याला बसल्या होत्या. झुळझुळ सुटणारा वारा , आब्यांची गर्द सावली , भोवतालची हिरवीगार हिरवाई यामुळे सुगंधाचे मन शेतातच रमत होतं. काळ्या मातीचा स्पर्श तिला सुखावत होता.मातीची ढेकळाबरोबर ती कधी - कधी गुज करत असे.मातीचे आणि तिचं नात वेड लावणारं होत. सकाळी लवकर गेलेली सुंगधा दिवसभर शेतातच काम करत असत.शेतीची आवड तिला क्षणभर बसू देत नव्हती.
सुंगधा ही शिरपा व मालतीची लाडाची मुलगी होती.लहाणपणापासूनच तिला त्यांनी लाडात वाढवले होते.तिची प्रत्येक ईच्छा , हौस आईवडिल आनंदाने पुरी करत असत.शाळेत ती फार हुशार होती. अभ्यास वेळेवर करुन तीने आपला हजरजबाबीपणा दाखवला होता. शाळेतील शिक्षकांची ती लाडकी होती.
अत्यंत कमी शेतीत शिरपा व मालती आपले साधे जीवन जगत होते. मालती दुस-यांच्या शेतात मोलमजूरीला जात असे.आपल्या या गरीबीत सुंगधाला कसे शिकवायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे होता पण दोघांच्यात हिम्मत भारी होती.
" आमच्या पोरीला कायपण करुन शिकवायचे " असं शिरपा नेहमी म्हणत असे. मालतीही त्याला दुजोरा देत होती.सुंगधा शाळेत जाऊ लागली. आपल्या कलागुणांनी तिने शाळेत छाप पाडली होती.खेळात व वत्कृत्व स्पर्धेत तिला अनेक बक्षिसे मिळू लागली.हळूहळू तिच्यातील उत्साह वाढत होता.ती खेळात , अभ्यासात शिक्षणात परिपक्व होत होती.तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक शिक्षकांना व आई बाबांना जाणवत होती.

घरात आईवडिल शेतात कष्ट करायला दररोज जात होते हे तिने पाहिले होते. त्यामुळे तिलाही शेताची आवड लागली होती.
" आई मी तुझ्याबरोबर शेताला येणार " असे ती नेहमी म्हणत असत.अगं शेतात आमची राबून - राबून हाडाची काडं झाल्यात आणि तु कशाला शेतात येतीस " यावर सुंगधा आपला हट्ट सोडत नसे. त्यामुळे सुगंधाने शेतातील सगळी कामं जवळून पाहिली होती.आईबरोबर ती सगळी कामं शिकली होती.तिचा शेतातील कामाचा तरबेजपणा पाहून मालतीला आश्चर्यच वाटायचे.

सुंगधा शाळेत दररोज जात होती. मुग्धा , गौरी , प्रज्ञा , खुशी , भाग्यश्री, रेश्मा या मैत्रिणींचा घोळक्यात ती कायम रममाण होत असत.मैत्रिणींच्याबरोबर गप्पा , टिंगलटवाळी
यामध्ये तिला रस होता.तिला ब-याचवेळेला घरची आठवण नसायची.मग आईच्या शिव्या खायच्या आणि घरातील काम करायची शिक्षा मिळायची.
यामध्ये तिला रस होता.तिला ब-याचवेळेला घरची आठवण नसायची.मग आईच्या शिव्या खायच्या आणि घरातील काम करायची शिक्षा मिळायची.
शाळेत मुलांचाही घोळका होताच , मुली दिसताच त्यांच्या टिंगला करणे टोमणे मारणे चालूच असायचे. याच मुलामध्ये सुजित नावाचा मुलगा शांत व सोज्जळ होता. तो मुलांच्यांत असायचा पण कधीच खोड्या करत नसत. शाळेतील अभ्यास वेळेवर केल्यामुळे गुरुजींचा तो लाडका होता.
शाळेत असतानाच सुंगधाची व सुजितची छान मैत्री जमली होती. दोघांच्यात मस्त गप्पा होत. अभ्यासाची देवाणाघेवाण सुरु होती. शाळेला जाताना वाटेत बोलणं व्हायचं त्यामुळे दोघांचे मैत्रीचे छान धागे जुळले होते. सुजितचा स्वभाव तिला फार आवडला होता. शाळेत ती त्याच्याकडे मनमोकळे बोलता असे. त्यांच्यातील संवाद आत्ता वाढला होता. सुजित तिला अभ्यासाच्या निमित्ताने भेटण्यास उत्सुक असायचा.दोघांच्या मनातील चलबिचल खूप वाढली होती. आपण कसे मनातील बोलायचे याचे धाडस होत नव्हते. हृदयातील स्पंदने व वाढणारी धडधड तिला नेहमी सतावत होती.काय करु आणि काय नको अशी तिची अवस्था झाली होती.
अखेर तिने सुजितला शाळेला जात असताना गाठलेच आणि आपल्या मनातील भावना स्पष्ट बोलून दाखवली.
" सुजित तु मला फार आवडतोस आणि माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे."
यावर सुजितला कांही बोलायचे सुचेना , काय बोलते आहे सुगंधा , मला अजून पुढे शिकायचे आहे आणि अशावेळी आपण प्रेमात पडणे बरोबर आहे का ? "
" सुजित तु मला फार आवडतोस आणि माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे."
यावर सुजितला कांही बोलायचे सुचेना , काय बोलते आहे सुगंधा , मला अजून पुढे शिकायचे आहे आणि अशावेळी आपण प्रेमात पडणे बरोबर आहे का ? "
" ते कांही नाही माझे तुला ऐकावेच लागेल." सुंगधा बोलत होती. मी बरेच दिवसापासून तुला माझ्या मनातील ही ईच्छा सांगण्याचा प्रयत्न करत होते पण धाडसच होत नव्हते. शेवटी मला माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहचवणे गरजेचे वाटले.तुझ्या मनात काय चाललंय तेपण मला समजायला हवं अशी बरीच मनधरणी सुंगधा करत असते.
सुजित विचार करत असतो.त्याला काय उत्तर द्यायचे सुचत नव्हते.कारण सुंगधाचे वागणे , बोलणे त्याला माहित होते.सुगंधाविषयी आपल्या मनात काय आहे हे त्याला लवकर सांगायचे नव्हते.
क्रमशः