प्रेमगंध
भाग : २
सुंगधाच्या मनात निव्वळ सुजितचा विचार घोळत होता. बसल्या जागेत ती हरवून जायची
" काय असेल सुजितच्या मनात? " मला होकार देईल का ? माझ्यावर प्रेम करेल का ? असे असंख्य विचार तिच्या मनात यायचे. घरातील मंडळी तिच्या या विचित्र वागण्याला कंटाळली होती. धड तिचे अभ्यासावर लक्ष नव्हते ना घरातील माणसांवर …! बेभान झालेले मन फक्त प्रेमात बुडाले होते. सुजितच्या विचाराशिवाय तिला कांही सुचत नव्हते. एरवी शाळेतील मुलींमध्ये मिसळणारी सुंगधा एकटेपणात हरवली होती. ती फक्त मुलींच्यात शरीरानेच असायची.

शालेय जीवनातील प्रेमाची गुंफण फार वेगळी असते. बाह्य जगाचा थांगपत्ता नसतो ,व्यावहारिक ज्ञान नसते. कोवळी मने पटकन जुळतात आणि प्रेमाचा गहण अर्थ देतात. निरागस मनाला प्रेमाच्या धाग्यात गुंफुण आपण वेगळ्याच विश्वात रमत आहोत असा भ्रम सतत त्यांना झालेला असतो. नेमकं हिच गत सुंगधा व सुजितच्या नात्यात झालेली असते.
सुजित शाळेला आज लवकरच गेलेला असतो. शाळेत वातावरण शांत असते.का कोणास ठाऊक आज सुंगधाही वेळेवर तयार झाली आणि शाळेला आली. शाळेतर कोणीच नव्हते पण सुजितसारखे कोणीतरी दिसले म्हणून पाहायला ती आली तर तो सुजितच होता. तिला पाहताच सुजित आश्चर्य चकीत झाला.
" सुगंधा , तु .. आणि इतक्या लवकर ? "
" हो लवकरच आले , तुझ्यासाठी "
" बोल तु काय करायच ठरवलं आहेस ? "
सुजित विचारात पडला अचानक सुंगधाने यावं आणि मला कैचीत पकडावं असं त्याला वाटले.
सुजितच्या मनात सुगंधाविषयी प्रेमभावना होतीच पण त्यांने सयंम दाखवला होता. सुगंधाची प्रत्येक गोष्ट त्याला आवडत होती.सुगंधाचे बोलणे , तिचा निटनेटकेपणा , संस्कार , व्यावहारिकता , आदर , सन्मान हे सगळे गुण तिच्यात ठासून भरले होते. त्याने केवळ तिचे सौंदर्य पाहिले नव्हते तर तिच्यातील दुरदृष्टीय विचार आणि चाणाक्षपणा अचूक हेरला होता. आपल्या जीवनाची सहचरणी कोण असेल तर ती केवळ सुगंधाच …! असा मनाशी दृढ निश्चय केला होता. केवळ सुगंधाला सांगणे तेव्हडेच बाकी होते.

सुंगधाच्या मनातील भावनेला त्याने जाणले होते. जास्तवेळ सुंगधाला ताणत ठेवणे त्याला अयोग्य वाटले.
" होय सुगंधा तुझ्या मनातील सारी चलबिचल , स्पंदने मी मनापासून जाणतोय. तुझं माझ्यावर निस्सीम प्रेम पाहून मी भारावून गेलोय , तुझा हा प्रेमाचा आवेग,उत्साह मलाही वेड लावतोय त्यामुळे तुझ्या या प्रेमाच्या बेडीत मी केंव्हा अडकलो आहे मलाच समजले नाही."
" सुगंधा , मी तुझ्या प्रेमाचा भुकेला आहे सुगंधा …!!"
" सुगंधा , मी तुझ्या प्रेमाचा भुकेला आहे सुगंधा …!!"
सुंगधाला सुजितचे हे शब्द ऐकून अत्यानंद झाला.दोघानिही एकमेकांना गाढ अलिंगन दिले आणि एका सुगंधीत प्रेमाची कहाणी सुरु झाली.
दोघेही एकाच वर्गात असलेमुळे शालेय शिक्षण सुरु होते. दहावीमध्ये असताना जमलेले हे प्रेम पुढे कॉलेज जीवनातही बहरले. आपल्या विविध कलागुणांनी कॉलेज जीवनही त्यांनी गाजवले. अनेक ताणतणाव , संघर्ष , घरातील माणसांचा विरोध , समाजातील लोकांचे टोमणे यावर त्यांनी मात करुन आपले प्रेम टिकवले होते.
सुंगधा ज्यावेळी शेतात जात असे त्यावेळी सुजितही शेतात जात असत. सुजितचे गावात शेत होते. त्यालाही शेताची आवड होती. ज्यावेळी शेतात यांची गाठाभेट होत त्यावेळी मस्त गप्पा मारत.निरभ्र आकाश , हिरवागार निसर्ग , शेतातील पिकं , झुळझुळ वारा यामध्ये ती दोघं आपले प्रेम हरवून जात.
" किती सुंदर निसर्ग आहे " सुगंधा बोलत होती.
होना " आपल्या प्रेमासारखा " सुजित
" आपले आयुष्य असेच सुंदर करायचे हं..!" सुगंधा
असे संवाद व सुजित व सुंगधा यांच्यात दररोज होत होते. ते कधी शेताचा सहारा घेत तर कधी निरव शांततेचा …! मधुर बोलण्यात गुंग झाल्यामुळे त्यांना प्रेमाचा खर आनंद लुटता आला आहे.
होय सुगंधा " त्यासाठी तुझी साथ महत्वाची आहे " सुजित म्हणाला
" मी तर साथ देणारच आहे पण आपण दोघांनी जर एकमेकांना साथ दिली तर जीवन सुखकर होईल." सुंगधा लगेच बोलली.
दोघेही महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करुन घरातील कामाचा आनंद घेत होते. सुंगधाच्या आईवडिलांना आपण सुजितवर प्रेम करत असल्याचे सांगून टाकले होते.अनेक शंका कुशंका तिने वेळोवेळी सोडवून आपल्या जीवनाचा पुढील मार्ग खुला केला होता. त्यामुळे कोणतेही दडपण तिच्यावर नव्हते. इकडे सुजितने आपल्या घरात सुगंधाबरोबर सूत जुळल्याचे सांगीतले होते. घरात त्याला प्रचंड विरोध झाला पण सुजितच्या हट्टापाई त्यांना माघार घ्यावी लागली. सुजित त्यामुळे बिनधास्त वावरत होता. आपण ख-या प्रेमाला न्याय देण्यासाठी सगळ्यांच्याबरोबर व परिस्थितिशी झुंजून सुंगधाचं प्रेम मिळवल आहे याचे त्याला समाधान वाटत होते.
सुजितने शिक्षण पुर्ण झालेनंतर नोकरीसाठी ब-याचठिकाणी प्रयत्न केले पण त्याला यश आलेच नाही. शेवटी कंटाळून त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सुंगधा योग्य आहे हे त्याला मनोमन पटले होते. आत्ता त्याला आपण आपल्या जीवनातील पुढील वाटचालीकडे लक्ष देणे गरजेचे वाटले होते. त्याच्या मनात फक्त लग्नाचे विचार चालू होते. सुंगधाला त्याने याबाबत सांगून तयार राहण्यास सांगीतले होते.दोघांची लग्नाची तयारी झाली होती.अलवार भावनेने गुंफलेलं प्रेम लग्नबंधनात अडकणार होते.

क्रमशः