Login

प्रेमगंध : भाग ३ (अंतिम )

अलवार प्रेमाची बहारदार कथा
प्रेमगंध
भाग : ३ (अंतिम )

सुजित व सुंगधा यांचा लग्नाचा विचार पक्का होता. चांगला मुहुर्त बघून दोघांचे लग्न साधेपणाने एका मंदिरात लावले जाते. कन्यादान करताना शिरपा धाय मोकलून रडत होता.बापाचं काळीज मोठ्या हिम्मतीने आपली मुलगी दुस-यांच्या स्वाधीन करीत होते.मालतीने सुंगधाला मारलेली घट्ट मिठी आईपणाची जाणीव करुन देत होती.

" जा पोरी दिल्या घरी सुखी रहा , आईबाबांचं नाव कर " मालतीने सुगंधाला आशीर्वाद दिला.

सुगंधा व सुजितची छान जोडीचे संसारात आगमन झाले. सुजितच्या घरच्यांनी सुगंधाचे यथोचित स्वागत केले. सुजितचे आईवडिल व भाऊ यांना नमस्कार करुन कौटुंबिक जीवनाला सुरवात केली होती.

सगळ्या क्षेत्रात तरबेज असलेली सुगंधाने थोड्याच दिवसात घरातील सर्वांची मने जिंकली.घरातील स्वच्छता , स्वयंपाक ही कामे ती अगदी आवडीने करत होती. शेतातील उत्पनाची तिने सविस्तर माहिती घेतली.याबद्दल तिने सुजितला विचारले " तुमचे कष्ट भरपूर असताना उत्पन्न कमी कसे ? " याबाबत सुजितने शेतातील काम करण्याची पद्धत व दरवर्षी तिच पिके असल्यामुळे फारसे उत्पन्न मिळत नसल्याचे सांगितले. यावर सुंगधा विचारात पडली आपण शिक्षण शिकून काय तरी उपयोग झाला पाहिजे आणि यासाठी लवकरच उपाय शोधला पाहिजे यासाठी ती कामाला लागली.

घरात नव्यानेच आगमन झालेल्या सुगंधाने गोड संवादाने सर्वाना आपलेसं केल होतं.
" शेतात प्रगती करायची असेल तर कष्टाला आधुनिकतेची जोड गरजेची आहे." हे सुजितसह घरातील मंडळीना सुंगधाने बोलून दाखवले. सुंगधा आपल्या घराकडे शेतात सतत काम करत होती , त्यामुळे तिला शेतात कष्ट करणे नवखे नव्हते. सुजितची जमीन ही काळी कसदार होती फक्त योग्य तंत्रदानाचा वापर करणे गरजेचे होते यासाठी ती घरातील मंडळींना आपण सर्वजण आधुनिक शेती केल्याशिवाय पर्याय नाही. योग्य मार्गदर्शन व प्रत्यक्ष कृती केली तर शेतीत भरघोस उत्पादन घेता येते असे ती घरातील सर्वांना सांगते.

" सुजित आपण मार्गदर्शनासाठी एखाद्या चांगल्या शेती कंपनीसी संपर्क केला पाहिजे." सुंगधा सांगत होती.

" मी महाधन या कंपनीशी संपर्क केला असून आम्हाला तिकडे मार्गदर्शनासाठी जावे लागेल." सुंगधाने तातडीने पाऊले उचलायला सुरु केली होती. जसं प्रेम विश्वासाने जिंकलं होतं तस तिनं निभावलही होतं. प्रचंड आत्मविश्वास तिच्याच होता.तोच विश्वास आज नाविन्याचा मार्ग शोधत होता.

सुगंधा व सुजित मुंबई येथे महाधनच्या शेतीविषयक चर्चासत्रात भाग घेतात. शेतीची पुर्ण माहिती तिथं दिली जाते.आधुनिक शेतीची सविस्तर माहिती व प्रशिक्षण घेऊन त्या पद्धतीची शेती करण्याच्या ईराद्याने दोघेही माघारी परतात.

सुंगधाला आत्ता नवीन शेती करण्याचा ध्यास लागला होता. सुजितला शेती करण्याची फार गोडी लागली होती.दोघांच्यात योग्य ताळमेळ असल्यामुळे कामाचा उत्साह वाढला होता.दोघांनी बसून शेताचा आराखाडा तयार केला.कोणत्या शेतात कोणते पिक घ्यायचे ठरवले.त्यासाठी खते , बियाणे यांचा योग्य समतोल साधला.

सुंगधा व सुजित आत्ता कंबर कसून कामाला लागले होते. शेतीत त्यांना नवी क्रांती करायची होती.दोघांचा प्रेमविवाह झाला म्हणून समाजाने त्यांना हिणवले होते त्या गोष्टीची वारंवार जाणीव होत होती. जमीनीची योग्य मशागत करुन ऊसाची लागण त्यांनी केली.चारफुटी सरी सोडली.संशोधित केलेले ऊसाचे संकरीत बेणे वापरले. दर्जेदार खते वापरली.टॉनिकच्या फवारण्या घेतल्या. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. सुंगधा व सुजितने चांगली देखभाल केली. कष्टाने फुललेला मळा पाहून त्यांना फार समाधान वाटले.ऊसाची भरघोस वाढ होऊन भरपूर उत्पादन मिळाले होते. सुंगधाची ही किमया पाहून सुजित फार खुश झाला होता.

सुंगधाच तुझे कष्ट , नियोजन व दूरदृष्टीय विचार पाहून मी भारच भारावून गेलोय , जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही हे तु सिद्ध करुन दाखवलेस " सुजित सुंगधाचे असे कौतुक नेहमीच करत होता. ऊसाच्या पिकानंतर सुगंधाने भाजीपाला पिकाकडे आपला मोर्चा वळवला. यासाठी तिने आठ ते दहा मजूर लोकांना आपल्या शैतीवर दररोज रोजंदारीवर घेतले.मिरची , वांगी , कोबी , फ्लाॕवर , दोडका अशा अनेक त-हेचा भाजीपाला पिकवला.रोगराईला प्रतिबंधक म्हणून वेळेवर किटकनाशके फवारणी केली.सेंद्रीय खताचा वापर केला. तजेलदार भाजीपाला सर्वांना आवडू लागला.गावोगावी स्वतः सुंगधा व सुजित भाजीपाला विकू लागले. अल्पावधीतच भरपूर नफा मिळू लागला.

शेतीचे योग्य नियोजन केलेमुळे सुजितला व सुंगधाला शेतीतील आधुनिक तंत्राची गती सापडली होती. सुजितच्या घरातील मंडळी सुंगधाचे हे कतृत्व बघून अवाकच झाली होती.ती आल्यापासून घराचा व शेताचा नूरच पालटला होता.सुजितची निवड किती रास्त आहे हे घरातील सर्वांना समजले होते.

एकदिवस थकलेले हे दोन जीव मस्त झोपाळ्यावर झोके घेत होते.प्रेमाचा नवा रंग चढल्यासारखे दोघे छान गप्पा करत होते.

" जीवनात इतकं सुंदर दिवस येतील असे वाटले नव्हते सुंगधा ..!" सुजित बोलत होता.

" त्यासाठी तुझे निस्वार्थ प्रेम मिळाले यातच जीवनाचे सार्थक झाले." सुंगधा म्हणाली.

ते दिवस आठवले की प्रेम आयुष्यात किती महत्वाचे आहे समजते.प्रेमाचा हा प्रवास आमच्या आयुष्यात गुलकंदासारखारखा रेंगाळत राहिल असा ठाम विश्वास त्यांच्यात दिसत होता.

सुंगधा व सुजितचे हे प्रेम असेच वृद्धिंगत होत राहते.दोघांचा नित्य सकारात्मक संवाद त्यांच्या प्रेमाला झळाळी देत होता. त्यांचा संसार सुखाचा चालला होता.त्यांच्या संसारवेलीवर एक सुंदर कळी खुलली होती ती त्यांना जगण्याची प्रेरणा देत होती.पुढे दोघांनी शेतीत असेच धवल यश मिळवले.नवा प्रशस्त बंगला बांधला त्यामध्ये सारे कुटुंंब गुण्यागोविंदाने सुखाने नांदू लागले. एका निरागस प्रेमाचा हा अलौकिक प्रवास तितक्याच ख-या प्रेमाने बहरला होता.

लगेच " प्रगतशील शेतकरी " हा शासनाचा पुरस्कार सुंगधा व सुजितला जाहीर झाला.दोघांनाही आनंद झाला.सुंगधाच्या कष्ट , जिद्द व प्रेमाचा हा विजय होता.

प्रेम ही अलवार भावना आहे. या भावनेला शुद्ध मनाने गोंजारले असता अलौकिक आनंद मिळतो. सुगंधाने शालेय जीवनापासून प्रेमाला जपले व शेवटपर्यंत टिकवले.संयम व वैचारिक प्रगल्भता प्रेमात असणे गरजेचे आहे.अनेकजण प्रेमाची अवहेलनाच करताना दिसतात.प्रेमाचा हा धागा सर्वांनी मनापासून जपून नेहमी आनंदी रहावे.

समाप्त.