आरती आणि सबा दोघीही लग्नात आल्या होत्या. आरतीची नात्यातलीच आणि या दोघींच्या काॅमन मैत्रिणीचं लग्न होतं. वयाने या दोघींपेक्षा कितीतरी लहान असली तरी ती दोघींची मैत्रीण होती. तिचा खूप आग्रह म्हणून सबा या लग्नाला आली होती ते ही आरती तिला घ्यायला तिच्या घरी गेली म्हणून. नाहीतर सबा शक्यतो अशा कुठल्याच कार्यक्रमांना हजेरी लावत नसत. का तर एकत्र जेवण करावं लागू नये म्हणून. काही घडलेल्या घटनांची छाप मनावर अशी काही ठसते की मरणापर्यंत त्यांचा पिच्छा सुटत नाही.
"हे शिकून आलास का तू तिथुन? हे शिकुन आलास का? एका ताटात जेवणारे ते घाणेरडे लोक कुठले.. ही असली थेरं इथं चालणार नाही सागर. हजार वेळा बोललोय आज शेवटचं बोलतोय " सागरचे बाबा सागरला खुप फटकारत होते. सागरला भेटण्यासाठी गेलेली सबा तिथेच थबकली. आल्यापावलीच ती सागरला न भेटताच माघारी परतली.
आजही हा प्रसंग तिला जसाच्या तसा आठवायचा.
"क्या हुआ बेटी ? किसीने कुछ कहा क्या? "
"नही अम्मी, बस सागर के यहा सब अलग अलग ताट मे खाते है और पाट पर बैठते है वैसे हम क्यू नही करते? "
"नही अम्मी, बस सागर के यहा सब अलग अलग ताट मे खाते है और पाट पर बैठते है वैसे हम क्यू नही करते? "
"सबकी अलग अलग तहेजीब होती है बेटी , अलग खाओ या साथमे बात तो एक ही है ना, बस मिलझुलकर खाओ यह बडी बात है. समझी बुद्धु.. "
या आठवणीनंतर ही आठवण ठरलेली. अम्मी आठवली की तिचं हे समजावणं आठवायचं. अजून अजून पोखरली जायची सबा. तहेजीब किती गोंडस शब्द. दुधारी धार असणारं घातक शस्त्र. संस्कृती या शब्दाला असणारा मराठी शब्द. मराठी अगदी उत्तम होतं सबाचं. याच मराठीच्या बळावर काॅलेजलाईफ गाजवली होती तीने.
क्षणभराचा हा सुखावा तुझ्या वेड्या आठवणीत रे....
मजं फुटतो मोहोर तुझ्या गंधीत रमणीत रे...
सख्या रे.. साजणां रे कसा सांगू मी तुला मनमित रे..
अजूनही कोवळी आहे माझी प्रीत रे...
तुझ्या हुंकारास आसुसलेली मी रे...
जसं मृगजळामागे धावे हरीणी रे...
मजं फुटतो मोहोर तुझ्या गंधीत रमणीत रे...
सख्या रे.. साजणां रे कसा सांगू मी तुला मनमित रे..
अजूनही कोवळी आहे माझी प्रीत रे...
तुझ्या हुंकारास आसुसलेली मी रे...
जसं मृगजळामागे धावे हरीणी रे...
अशाच एका भाषणातील तिच्या या ओळी. कितीतरी तरूणांचा काळजात हिने घर केलेलं तरीही ही फक्त आणि फक्त एकाच शब्दाभोवती घुटमळलेली. सागर. सागर देशमुख. हिचा मैतर. सखा, सोबती, जिवलगा, प्रेम...प्रेम? प्रेमाची कबुली देणं प्रत्येकवेळी गरजेचं असतं का?असेल तर मग असं कोणतंच संभाषण त्यांच्यात झालंच नव्हतं पण मग त्या घटना? एकमेकांची ओढ, हक्क गाजवणं, मारामाऱ्या इतकंच काय एक घासही एकमेकांशिवाय त्यांना गिळवत नव्हते. काहीतरी होतं हे मात्र नक्की पण मग याच भावना त्याच्याही असाव्यात ना?कुठे असेल तो?काय करत असेल?त्यांचं कुटुंब मुंबई ला निघून गेलय इतकच तिला ठाउक होतं आणि केवळ याचसाठी जेव्हा मुंबईच्या जाॅबची ऑफर आली तेव्हा तीने ती पटकन स्विकारली. मुंबईची धावपळ पसंत नसतानाही. याच एका आशेवर की या गर्दीत कधीतरी का होईना त्याचा चेहरा नजरेस दिसेल. तो भेटेल. सागर. सागर देशमुख.
क्रमशः
©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा