।। प्रेमरोग (भाग 4 समीर खान) ।।
विश्वास तर होताच. हा पुर्ण प्रसंग सबाला जसाच्या तसा स्मरणात होता.
बेचैनियो का बँटवारा कुछ इस तरह हुआ..
ना कुछ कह सकी मै, ना तुमने कुछ कहा..
ना कुछ कह सकी मै, ना तुमने कुछ कहा..
त्या प्रसंगानंतर अगदी मनावर मनामनाचे ओझे वागवत तीने सागरशी दुरावा सुरू केला. उगवलेल्या दिवसात कितीदातरी संपर्क आला तरी पहिल्यासारखी ओढ मुद्दामच तीने त्यात येऊ दिली नाही. सागरलाही नकळत हे जाणवत होते. त्याचीही तीच अवस्था होती. मात्र एक न दिसणारी लक्ष्मण रेषा दोघांत कधीच ओढली गेली होती. जी दोघांतली दरी आणखीन वाढवणारच होती. कितीही सावरलं तरी लहानवयातील अल्लडपणा होताच. किती दिवस स्वतःला सावरणार होती ती?
सणासुदीचे दिवस होते. कधी नव्हे ते ईद व दिवाळी एकत्रच येणार होते. मोहल्ल्यातील मुलांचा खरेदीचा ऊत्साह ओसंडून वाहत होता पण सागर, सबा ह्या दोघांनाही आपण एकमेकांशिवाय बाजारात जावू ही कल्पनाच करवत नव्हती. सुट्ट्या लागल्या होत्या. मागच्या वर्षीच्या खरेदीच्या, दिवाळी सुट्टीत केलेल्या धमालची राहून राहून आठवण येत होती. सबाला हुंदका दाटून आला.
अखेर हा कोंडमारा सहन न होउन तीने मामूकडे जाण्याचा निश्चय घरी बोलून दाखवला. शाळांना दिवाळीच्या सुट्टया होत्याच. आतापर्यंत कधीही मामूंकडे न गेलेली सबा स्वतःहून जाण्याचं म्हणतेय म्हटल्यावर तिचा मामू येउन आनंदाने तिला सोबत घेऊन गेला. ही एक घटना तिच्या जिवनात किती मोठा भुकंप आणणार याविषयी ती अनभिज्ञ होती.
अखेर हा कोंडमारा सहन न होउन तीने मामूकडे जाण्याचा निश्चय घरी बोलून दाखवला. शाळांना दिवाळीच्या सुट्टया होत्याच. आतापर्यंत कधीही मामूंकडे न गेलेली सबा स्वतःहून जाण्याचं म्हणतेय म्हटल्यावर तिचा मामू येउन आनंदाने तिला सोबत घेऊन गेला. ही एक घटना तिच्या जिवनात किती मोठा भुकंप आणणार याविषयी ती अनभिज्ञ होती.
सबा मामाबरोबर निघून गेली. सागरला न भेटताच. यावेळची दिवाळी रोषणाई असूनही फिकीच वाटत होती. ऊदास बसलेल्या सागरकडे आईला पहावत नव्हते. दुसर्या दिवशी ईद होती. प्रथमच सबा नसल्याने अम्मीला चुकल्यासारखे वाटत होते. सबा नाही कमीतकमी सागरला तरी गोडधोड खावू घालावं म्हणून अम्मी त्याला बोलवण्यास त्यांच्या घरी निघाली. समोरचं दृश्य बघून अम्मी अचंबित झाली. सागरच्या घरातले सर्व सामान ट्रक मध्ये भरले जात होते.
"वहीनी.... " इतकीच अस्पष्ट हाक अम्मीच्या तोंडून निघाली.
"भाभी... " दोघी गळाभेट घेऊन रडू लागल्या. जास्त काही न बोलता दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. अहमदनगर सोडून मुंबईला चालले इतकेच मोघम ऊत्तर मिळाले . पुढे काही विचारण्यास जागाच उरली नव्हती. वहीनींचे डोळे सर्व हकीकत सांगत होते. सागरने अम्मीला मिठी मारली. जड अंतःकरणाने अम्मीने त्यांना निरोप दिला. कितीतरीवेळ अम्मी गेलेल्या ट्रक च्या रोखाने तिथेच ऊभी राहीली. कितीतरी विचार डोक्यात काहूर माजवत होते. सबाला आल्यावर काय बोलणार? हा विचारही डोक्याचा भुगा पाडत होते. तिची काय प्रतिक्रिया असेल?कसं सावरणार तिला या घटनेतून? देशमुख कुटुंबियांचं बिऱ्हाड ज्या ट्रकमध्ये गेलं होतं त्या रस्त्यावर जाताना मातीचा कितीतरी मोठा धुरळा उडाला होता. त्यापेक्षाही मोठा धुरळा अम्मीच्या मनात उठला होता. पाणावलेल्या डोळ्यांनी त्या गेलेल्या ट्रकच्या रोखाने पहात ती कितीतरीवेळ तिथेच उभी राहीली. परतीच्या वाटेवर सागरच्या घराला असणारं भलंमोठं कुलूप पाहून तिला स्वतःच्या पोरीची काळजी आणखीनच दाटून आली.
क्रमशः
©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा