प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग ११ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                         वेळ: - रात्री १ वाजता


                    देश विदेशातील माफिया लोक एका ठिकाणी जमले होते. आज त्यांच्यामध्ये करोडोंची डील फायनल होणार होती. त्या डीलसाठी सर्वजण आपापल्या हातातली सुरू असलेली कामे टाकून आले होते. प्रत्येकाच्या मनात सध्या ती डील फक्त आपल्यालाच मिळावी अशी इच्छा होती, पण ज्याच्यासोबत डील होणार होती तो काही साधासुधा माफिया नव्हता. सुप्रीम डॉनचा एकुलता एक मुलगा ' सूर्यांश सत्येंद्र अग्निहोत्री ' होता. आत्तापर्यंत डील वगैरे काही असल्यास सत्येंद्र फायनल करत होते, पण आज पहिल्यांदाच सूर्यांश हजर होणार होता.

' डॅड, तुमची तब्येत बरी नाही. मीही तुमच्याजवळ नाही. अशात तुम्ही बाहेर निघायचं नाही. ज्या काही डील वगैरे असतील त्या मी फायनल करेन. तुम्ही फक्त आराम करा. ' अशी त्याने त्याच्या वडिलांना सक्त ताकीद दिली होती.

आपल्या मुलाच्या काळजीभऱ्या धमकीमुळे त्यांनी होकार दिला होता आणि सूर्यांश डील फायनल करण्यासाठी तिथे येणार होता. त्याचा त्याच्या वडिलांवर फार जीव होता. त्यांना त्रास झालेला तो पाहू शकत नव्हता. ते अजूनही तंदुरुस्त होते, पण सूर्यांशला त्यांची नेहमी काळजी लागून होती. त्यांचं क्षेत्रच असं होतं की तिथे काय घडेल ते सांगता येत नव्हतं.


दोन तीन वेळा त्यांच्यावर हल्ला सुद्धा केला गेला होता. त्यावेळी सूर्यांश या क्षेत्रामध्ये उतरलेला नव्हता. जेव्हा सत्येंद्र यांना वाटलं की तो त्यांचा वारसा पुढे चालवू शकतो, तेव्हा त्यांनी त्याला तसं बोलून दाखवलं होतं. त्यानेही लगेच होकार दिला होता. त्याचा होकार आल्यानंतर सत्येंद्र यांनी त्याला ट्रेनिंग देऊन तयार केलं होतं.

जेव्हापासून सूर्यांश या क्षेत्रामध्ये उतरला होता तेव्हापासून सर्वांच्या मनात भीती निर्माण झालेली होती. सत्येंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होता. अर्थातच ते जेवढे क्रूर होते तेवढाच तो सुद्धा होता, पण सत्येंद्र यांचा क्रूरपणा काही वेळा त्याच्या क्रूरपणा समोर कमी पडत होता. त्यामुळेच काल त्या माणसासमोर सूर्यांशच्या हातून मरण्याचा पर्याय ठेवला होता, तेव्हा तो घाबरला होता.


अजूनपर्यंत तरी तो कोणासमोर आला नव्हता. एखादा कोणी सत्येंद्र यांच्या बंगल्यावर त्यांना भेटायला जायचा तेव्हाच सूर्यांशचा फोटो दिसायचा. त्या व्यतिरिक्त तो कोणासमोरही आला नव्हता. ही पहिलीच वेळ होती त्याची डील फायनल करण्याची. त्याशिवाय तो बाकीच्या कामांमध्ये जास्त व्यस्त राहत होता.



***************************
                      


                    अचानक त्या मीटिंग हॉलचा दरवाजा उघडला गेला. एकामागून एक असे पाच अंगरक्षक आत शिरले. त्यानंतर रुबाबदार, उंच पुरा, मजबूत शरीरयष्टी असलेला, डोळ्यांवर काळा चष्मा लावलेला, तोंडाला मास्क लावलेला, एक हात खिशात घालून, आपली दमदार पावले टाकत आपल्या रुबाबाची छाप सोडत तो म्हणजेच, ' सूर्यांश सत्येंद्र अग्निहोत्री ' आत आला. त्याच्यामागेच अजून पाच अंगरक्षक आत आले. जसा तो आत आला तसे सर्वजण त्याच्या त्या रुबाबाकडे पाहतच राहिले. कोणाचीही नजर त्याच्यावरून हटता हटेना. ज्या लेडीज सेक्रेटरी होत्या त्या तर तिथेच बेशुद्ध होऊन पडायच्या बाकी राहिल्या होत्या. भलेही त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याची शरीरयष्टी आणि त्याचा रुबाब या दोन गोष्टीच कोणावरही मोहिनी टाकण्यासाठी पुरेशा होत्या.

सूर्यांश आत आला. आपल्या खुर्चीवर बसून डोळ्यांचा चष्मा काढून बाजूला ठेवला. मास्क मात्र तो काढणार नव्हता. सध्या तरी त्याला त्याचा चेहरा कोणालाही दाखवायचा नव्हता.

( देश विदेशातील लोक असल्याने त्यांचा इंग्लिशमधील संवाद मराठीमध्ये )


" हॅलो एव्हरीवन! आज आपण इथे का जमलो आहोत हे तर तुम्हाला माहितच आहे. याआधी मी इतरांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतो, पण आज माझ्या स्वतःच्या बिझनेसचा प्रस्ताव मी इथे मांडणार आहे. माझ्याकडे असलेल्या एका प्रॉडक्ट आयडियासाठी आपण ही मीटिंग घेत आहोत. काहीवेळाने इथे प्रेझेंटेशन होईल. त्यामध्ये ते प्रॉडक्ट काय आहे? कशासाठी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. " सूर्यांश उपस्थित सर्वांकडे आळीपाळीने पाहत बोलत होता. नंतर तो उभा राहिला आणि त्याने प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली.

" आज मी ज्या प्रॉडक्टबद्दल सांगणार आहे, ते प्रॉडक्ट... हे आहे. " त्याने एका बोटातून अंगठी काढून सर्वांना दाखवत टेबलवर मधोमध ठेवली.

" म्हणजे? ही तर फक्त एक अंगठी आहे. " उपस्थितांपैकी एकाने आश्चर्य व्यक्त करत विचारलं.

ती एक अंगठी होती, मग त्याला प्रॉडक्ट कसं म्हणता येईल? हे त्या व्यक्तीला समजलं नव्हतं.

" हो, ही फक्त एक अंगठी आहे. दिसायला खूपच सामान्य दिसत आहे, पण काम फार मोठं करू शकते. " असं म्हणत सूर्यांशने त्या अंगठीला दोन बोटांत धरून दाबलं.

त्या सरशी अंगठीचं डायमंड एका बाजूला सरकलं आणि त्यातून एक छोटासा किडा बाहेर आला. किडा बाहेर आला आणि अंगठीच्या बाजूला थांबला. सर्वजण आश्चर्याने डोळे मोठे करून पाहत होते.

" हा जो किडा यातून बाहेर निघाला, ते खरं तर एक छोटंसं यंत्र आहे. याला आम्ही अंतर्यामी यंत्र (intermediate Machine) असं नाव दिलं आहे. हे यंत्र सर्व काही पाहूही शकतं आणि समोरच्या व्यक्तीचं माइंडही वाचू शकतं, म्हणूनच याला अंतर्यामी यंत्र असं नाव देण्यात आलं आहे. " त्याचं बोलणं ऐकून सर्वजण हैराण झाले होते. एवढा मोठा आविष्कार घडवला होता त्याने, तेही एवढ्या लहान वयात. सर्वांना त्याचं फार कौतुक वाटत होतं.

" याचा आपल्या बिझनेससाठी खूप फायदा होऊ शकतो. हे यंत्र आपण घरात बसूनही जिथे आणि ज्या व्यक्तीवर संशय असेल त्या व्यक्तीच्या मागावर पाठवू शकतो. या यंत्रामुळे आपल्याला संशयित व्यक्तीची प्रत्येक हालचाल समजू शकते. याला आपण कंट्रोल करू शकतो किंवा ऑटोमॅटिक मोडवर ऑन करू शकतो, जितके दिवस वाटेल त्या व्यक्तीच्या आसपास ठेवू शकतो आणि दूर असूनही कमांड देऊ शकतो. "

" हे यंत्र ऑटोमॅटिक मोडवर उत्तमरित्या वर्क करतं. समोरच्याचा माइंड वाचून हे यंत्र आपल्याला सावध करू शकतं, उदा. लपून छपून कोणी आपल्यासोबत राहूनच आपल्याला फसवत असेल, आपल्या बिझनेससंबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या सर्व धोक्याची सूचना हे यंत्र आपल्याला लगेच देणार. "

" ऑटोमॅटिक मोडवर ऑन केल्यानंतर आपल्याला त्याला सांगण्याची गरजही पडत नाही. आपल्याला ज्या गोष्टीपासून, वस्तूंपासून किंवा व्यक्तींपासून धोका असेल, हे यंत्र आपोआप आपला अलर्ट बेल वाजवून सांगणार. फक्त यात आपल्याला आपली स्वतःची संपूर्ण ओळख, आपली कार्य क्षेत्र माहिती, बिझनेस संबंधित संपूर्ण माहिती भरावी लागते आणि मग त्याला आपण ऑन करू शकतो. " सूर्यांश एकीकडे बोलत होता, तर एकीकडे त्याच्या लॅपटॉपवर बोटे चालवत होता. बाकी सर्वजण त्याचा एक ना एक शब्द काळजीपूर्वक ऐकत होते.

त्याचा हा आविष्कार सर्वांना मनापासून आवडला होता. तेवढ्यात सर्वांचं लक्ष टेबलवर असलेल्या त्या छोट्या यंत्राकडे गेलं. ते यंत्र हळूहळू हालचाल करत होतं. यंत्र चालत आहे असं वाटत होतं, कारण ते उपस्थित सर्वांच्या दिशेने येत होतं. अचानक त्याची चालण्याची स्पीड वाढली आणि तो त्यांच्यापैकीच एका व्यक्तीसमोर जाऊन थांबला. इकडे सूर्यांशच्या लॅपटॉपवर लाल सिग्नल मिळाला. बाकीच्यांना काही कळत नव्हतं, पण सूर्यांशच्या डोळ्यांत आग उतरलेली दिसत होती.

" मिस्टर जॅक्सन, बिझनेस प्लॅनची माहिती कुठपर्यंत लक्षात ठेवलीत तुम्ही? मी तुम्हाला माहिती चोरी करण्यासाठी काही हेल्प करू शकतो का? " सूर्यांश त्या व्यक्तीकडे रागाने पाहत विचारत होता, तसा जॅक्सनच्या कपाळावर घाम जमा झाला.

सूर्यांशने त्या यंत्राला लॅपटॉपवरून ऑटोमॅटिक मोडवर ऑन केलं होतं. आणि त्या यंत्राने समोर उपस्थित सर्वांची बौद्धिक पातळी वाचायला सुरुवात केली होती. जॅक्सन हा सूर्यांशचं बोलणं व्यवस्थित ऐकून घेऊन मनोमन त्या यंत्राची चोरी करण्याची योजना आखत होता, तेच त्या यंत्राने कॅप्चर केलं होतं आणि इकडे सूर्यांशला अलर्ट सिग्नल दिला होता. सूर्यांशच्या बोलण्यावर जॅक्सनच्या कपाळावर घाम तर जमा झाला होता, पण तोही त्याच्या शहराचा माफियाच होता. शिवाय बाकीचे सर्व त्याच्याकडेच पाहत होते आणि त्याला आपला अपमान करून घ्यायचा नव्हता, म्हणून तो पुढे बोलू लागला.

" अशा कुठल्याही छोट्या मोठ्या दीड दमडीच्या वस्तूला आमच्यासमोर आणून ठेवणार आणि आम्हाला फसवणार असं वाटलं का तुम्हाला? हे यंत्र काहीही सांगत आहे. " जॅक्सन घाबरल्याचे भाव चेहऱ्यावर न आणता बोलत होता. त्याच्या बोलण्यावर मात्र सूर्यांश किंचित हसला. त्याचं ते हसू मास्कच्या आड दिसत नव्हतं.

" मला खोटं बोलणारी व्यक्ती आवडत नाही. " सूर्यांश क्रूर हसत म्हणाला आणि त्याच्या अंगरक्षकांनी जॅक्सनला घेरलं.

मीटिंग हॉलमध्ये फक्त सूर्यांशच्या अंगरक्षकांना येण्याची परवानगी होती. बाकीच्यांचे बाहेरच थांबलेले होते, त्यामुळे जॅक्सनचा बचाव करण्यासाठी तिथे कोणीच नव्हतं. बाकीच्या माफियांना तो मेला तरी काहीच घेणं देणं नव्हतं. सर्वजण क्रूरच होते.

" मी... मी... ते... चुकून तसा विचार केला होता. आय... आय... " जॅक्सन पुढे काही बोलूच शकला नाही.

क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. सूर्यांशने कोणाला काहीही कळू न देता आपल्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या त्याच्या चेहऱ्यावर उतरवल्या होत्या.

हो... चेहऱ्यावरच, कारण त्याला जॅक्सनचा चेहराही पाहण्याची इच्छा नव्हती. निदान अंत्यसंस्कार होईपर्यंत तरी नाही, आणि हे शुभ कार्य त्याने स्वतःच्या हाताने केलं होतं.



क्रमशः


🎭 Series Post

View all