प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग १६ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                        आज सात दिवस झाले होते त्या घटनेला. या सात दिवसांमध्ये नाही प्रेम हॉटेलला गेला होता आणि नाही सिया. हॉटेलची पूर्ण जबाबदारी शौर्य आणि मसीराने घेतली होती. आज आठव्या दिवशी दोघांनी हॉटेल जॉईन करण्याचं ठरवलं होतं. दोघांनी एकमेकांना व्हॉट्सॲप मेसेज करून तसं कळवलं होतं.

तिचं आता असं झालं होतं की, ' तू येणार असशील तरच मी येईन. '

ती सर्व ठरवून करत होती. आज काहीही करून सियाला आपल्या मनातली भावना त्याच्यासमोर व्यक्त करायची होती. त्याची तयारी करण्यासाठीच तिने ज्या दिवशी तो येणार त्याच दिवशी हॉटेलला येणार असं कळवलं होतं. रोजच्या निघण्याच्या वेळेपूर्वी सियाने आवरता आवरताच प्रेमला फोन लावला. त्यानेही लगेच फोन उचलला.

" हॅलो मॅडम! " प्रेमने खुशीतच तिला अभिवादन केलं.

" हॅलो मिस्टर प्रेम, आज हॉटेल जॉईन करणार आहात ना तुम्ही? " काल मेसेज करून त्याने सांगितलं होतं तरी तिने पुन्हा एकदा खात्री करून घेण्याचं ठरवलं.

" हो मॅडम, ऑलरेडी खूप दिवस सुट्ट्या झाल्या. जास्त गॅप पडायला नको. आज मी नक्की येणार आहे. " त्याने उत्तर दिलं आणि त्यालाही ती येणार आहे की नाही याची खात्री करून घ्यावीशी वाटली.

" मॅडम, तुम्ही सुद्धा येणार आहात ना? " त्याने विचारलं, आणि ती हो म्हणून उत्तर देणार तर मध्येच थांबली.

' मी येणार नाही असं सांगून एकदा त्यांची काय रिएक्शन येते ते पाहू का? मी येणार नाही हे ऐकल्यानंतर त्यांना काय वाटेल ते मला पहायचं आहे. आज नाही येणार असं सांगते. ' सिया मनातल्या मनात म्हणाली आणि त्याला खोटं खोटंच ती येणार नाही असं सांगायचं ठरवलं.

" मला तर नको वाटत आहे. मी उद्या किंवा परवापासून जॉईन होईन. " सिया हसून म्हणाली आणि तोंडावर हात ठेवून त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली. तिकडे मात्र तो तिचं उत्तर ऐकून निराश झाला होता. त्याचा चेहरा खाडकन पडला होता.

" पण मॅडम... म्हणजे... काल तर तुम्ही येणार आहात असं सांगितलं होतं मेसेजवर. मग अचानक काय झालं? अजूनही बरं वाटत नाही का? " त्याने काळजीने विचारलं.

त्याच्या काळजीचं कारण हे नव्हतं की ती येते म्हणून सांगूनही येणार नाही, कारण हे होतं की ती येणार नाही म्हणजे तिला त्रास होत असेल.

" हो म्हणाले होते, पण नाही जमणार मला. त्रास काही होत नाहीय, पण आजच्या दिवस तरी नको वाटतं यायला. " सिया मुद्दाम कंटाळवाण्या सुरात बोलत होती.

" ओके मॅडम, काळजी घ्या. मी हॉटेलला निघतो आता. खूप दिवस गॅप पडले आणि तिथे माझी महत्त्वाची जबाबदारी आहे. शेवटी आनंदाचा मार्ग हा पोटापासूनच जातो. पोट तृप्त झालं की मनही तृप्त होतं, आणि मला सर्वांना खुश ठेवायचं आहे. " प्रेम म्हणाला, पण ती येणार नाही ऐकून एक मन जरा खट्टूही झालं होतं.

" हो चालेल. ठेवू का फोन? बाय... " सिया किंचित हसून म्हणाली, पण तिला अत्याधिक आनंद झाला.

तिला वाटलं की ती येणार नाही ऐकून तोही येणार नाही म्हणेल, पण काम त्याच्यासाठी वरच्या स्थानावर आहे हे त्याच्या बोलण्यातून कळत होतं.

" हो मॅडम. " प्रेम हसून म्हणाला आणि तिने फोन कट केला.

नंतर प्रेम हॉटेलकडे जायला निघाला. नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या आईचा आशिर्वाद घेतला आणि निघाला. इकडे सियानेही निघण्याची तयारी केली. त्याला पोहोचण्याआधी तिला तिथे पोहोचायचं होतं. प्रेमला स्वतःचं वाहन नसल्यामुळे बराच वेळ लागणार होता.


****************************



" कन्फर्म आहे ना? तू स्वतः जाऊन सेट केलंस का? " देवांश फोनवर कोणाशी तरी बोलत होता.

" हो साहेब, मी व्यवस्थित नियोजन केलं आहे. त्यावेळी लिफ्टमध्ये सिया धर्माधिकारी व्यतिरिक्त कोणीही नसणार याचीही काळजी घेतली आहे. मध्येच लिफ्टमध्ये खराबी येईल. लिफ्ट दुरुस्त होण्यासाठी नाही म्हणलं तरी अर्धा एक तास नक्कीच लागणार. या एका तासामध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी होईल. सिया धर्माधिकारी लिस्टमधून बाहेर पडणार नाही याची मी गॅरंटी देतो. आणि पडलीच तरी तो तिचा मृतदेह असेल. " फोनवरील व्यक्ती म्हणाली आणि इकडे देवांशच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरलं.

आजपासून सिया हॉटेलला जॉईन होणार याची त्याला माहिती मिळाली होती. आजपासून त्याने पुन्हा तिच्यावर हल्ला करायला सुरुवात केली होती. यापासून अनभिज्ञ असलेली सिया, आपल्याच खुशीमध्ये हॉटेलला पोहोचली होती.

" मॅडम, आमच्या थर्ड फ्लोअरवर असलेल्या रूममध्ये काहीतरी बिघाड आला आहे. पाण्याचा गिझरही चालू होत नाही आणि बाथरूममध्ये कसलातरी आवाज येत आहे. प्लीज एकदा तुम्ही येऊन चेक करता का? " एक व्यक्ती सिया गेटमधून आत येताना दिसताच तिच्याजवळ येत म्हणाला.

तिला आधी हॉटेलमध्ये जाऊन स्वतःच्या केबिनमध्ये जायचं होतं, पण मध्येच ही व्यक्ती भेटल्यामुळे तिला काय करावं सुचत नव्हतं.

" सर, मला अर्जंट माझ्या केबिनमध्ये जाऊन काही डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत. मी अर्ध्या तासाने आले तर चालेल का? जर काही घाई नसेल तर... " सियाने अदबीने त्याला विचारलं. काहीच वेळात प्रेम येणार होता आणि त्याला येण्याआधी तिला केबिनमध्ये जायचं होतं.

" मॅडम माझ्या मुलाला अंघोळ घालायची आहे. तो केव्हाचा अंघोळीसाठी रडत आहे. जर लवकर पाण्याचा प्रॉब्लेम नाही सुटला तर मग आम्ही काय करणार? त्याला दिवसभर बिना आंघोळीचं ठेवणार का आम्ही? तुम्ही इथल्या व्यवस्थापिका आहात ना? मग तुमची फर्स्ट प्रायोरिटी आम्ही असायला हवं. " तो व्यक्ती उलट बोलत होता. आता याच्यासोबत वाद नको म्हणून तीही तयार झाली.

" ठीक आहे, चला. " सिया पुढे चालत म्हणाली, पण त्याने तिला थांबवलं.

" मॅडम मी अर्जंट कामानिमित्त बाहेर जात आहे. माझी मिसेस आहे तिथे तर ती तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते दाखवून देईल. " तो व्यक्ती म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता तिथून पसार झाला.

सिया पाच सेकंद तरी त्याच्याकडे पाहत तिथेच थांबली असेल, नंतर वेळेचं भान येताच ती तिथून जायला निघाली. तो व्यक्ती गेटच्या बाहेर पडला आणि बाजूला जाऊन एक फोन केला.

" हॅलो देवांश साहेब, काम झालं आहे. आता कोणत्याही क्षणी तुम्हाला गुड न्यूज मिळेल. " त्या व्यक्तीने एखादी आनंदाची बातमी असल्याप्रमाणे सांगितलं, त्यातच देवांशही खुश झाला.


लिफ्टचा दरवाजा उघडला गेला. सिया आपल्या मोबाईलमध्ये लक्ष घालूनच लिफ्टमध्ये शिरली आणि जेव्हा नजर समोर गेली तेव्हा तिला एक आश्चर्याचा धक्का बसला. डोळे मोठे करून ती समोर पाहत होती. तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट चालू झाली.




क्रमशः



🎭 Series Post

View all