प्रेमसिया: CRUEL LOVESTORY ( भाग २ )

ती, जी आपली एक ओळख लपवून हॉटेलची व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तो, जो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तिचाही त्याच्यावर जीव जडतो, पण काय होईल जेव्हा तिचा सामना एका क्रूर व्यक्तीशी होईल? जाणून घेण्यासाठी वाचा, unknown words "जानकी" लिखित, प्रेमसिया - cruel lovestory.
                       शौर्य आणि सिया दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले. आज तीन दिवसांनी असणाऱ्या एका वेडिंगची ऑर्डर त्यांना मिळणार होती. पाहुण्यांची तात्पुरती राहण्याची सोय आणि खानपानाची सर्व व्यवस्था ठरवली जाणार होती. त्याची पूर्ण जबाबदारी शौर्यने सियावर सोडली होती. सियाला फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंटसाठी हेड निवडायचा होता. ज्याच्याकडे उत्तम नेतृत्वगुण असेल, योग्य ते मार्गदर्शन करू शकेल, आपल्या टीमला योग्यरित्या हाताळू शकेल, ग्राहकांच्या समस्या सोडवू शकेल, असा व्यक्ती आजच तिला नियुक्त करायचा होता.

सिया केबिनमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा डिटेल्स चेक करत होती. त्या पदासाठी जवळजवळ दहा पंधरा लोकांचे डॉक्युमेंट्स तिच्यासमोर होते. जाहिरात देतानाच मसीराने त्यात चांगल्या पगाराची नोंद केली होती. शौर्यच्या हॉटेलचं नाव तसंही टॉप हॉटेल्सच्या यादीत होतं, त्यामुळेच एवढ्या लोकांनी हॉटेलच्या नावामुळे आणि चांगल्या पगाराच्या लालसेने फॉर्म भरला होता. आता दहा वाजलेले होते आणि इंटरव्ह्यू साठी तिने अकरा वाजताची वेळ दिली होती. मधल्या एका तासात ती पुन्हा एकदा सर्व डिटेल्स चेक करणार होती. पावणेअकराला तिची असिस्टंट मसीरा तिच्या केबिन बाहेर आली.

" मे आय कम इन मॅम? " मसीराने दरवाजावर नॉक करत विचारलं, तसा आतून सियाने आवाज दिला.

" कम इन मसीरा... " सियाने तिला आत यायला सांगितलं, तशी मसीरा आत आली आणि बोलू लागली.

" मॅडम, पावणेअकरा वाजले आहेत. ठीक पंधरा मिनिटांनी आपण इंटरव्ह्यू सुरू करूयात. आर यू रेडी? " मसीराने तिच्या केबिनमध्ये येत अदबीने तिला विचारलं. त्यावर तिने होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा डॉक्युमेंट्स पाहू लागली.

" येस मसीरा, पाच मिनिट बाकी असताना पुन्हा केबिनमध्ये येशील. " सिया हातामध्ये असलेले डॉक्युमेंट्स पाहतच म्हणाली.

" शुअर मॅम! " मसीरा आपली मान किंचित झुकवून म्हणाली आणि नंतर तिथून निघून गेली.

सिया एकाच व्यक्तीची फाईल सारखी सारखी पाहत होती. तिने ती फाईल जरा बाजूला ठेवली आणि बाकीच्या लोकांच्या फाईल्स पाहू लागली. सियाने सांगितल्याप्रमाणे पाच मिनिट बाकी असताना मसीरा पुन्हा तिच्या केबिन बाहेर आली आणि दरवाजावर नॉक केलं.

" मे आय कम इन मॅम? " दरवाजावर नॉक करत तिने विचारलं. आतून सियाचा आवाज आल्यानंतर ती आतमध्ये गेली.

" मसीरा, मला एक सजेशन हवं होतं. " सिया तिच्याकडे पाहत म्हणाली.

तिच्यामध्ये आणि सियामध्ये बाँडिंग चांगलं होतं, तेव्हा सिया तिच्याशी सर्वकाही शेअर करत असायची. बऱ्याच गोष्टींमध्ये मसीरा तिला पुरेपूर मदत करत राहायची. ऑफिसमधल्या नियमांवर किंवा कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयावर ती नेहमी शौर्य आणि मसीरा या दोघांशीच चर्चा करत असायची. मसीरा नेहमी तिला शक्य होईल ती मदत करत होती. आजही सिया एका ठिकाणी अडकली होती आणि तिने त्यावर मसीराचं मत जाणून घ्यायचं ठरवलं.

" हो मॅम, बोला ना. काय सजेशन हवं आहे? " मसीराने देखील अदबीने विचारलं.

" ही फाईल बघ. मला यामध्ये काहीतरी वेगळेपण जाणवत आहे. तुलाही तसंच वाटतं का? " सिया तिच्यासमोर फाईल धरत म्हणाली. मसीरा ती फाईल हातात घेऊन पाहू लागली. सर्वात आधी तिने त्यावरचं नाव वाचलं आणि मग त्या व्यक्तीचा फोटो पाहिला.

" प्रेम रघुवीर सरदेसाई. " मसीराने मोठ्याने नाव वाचलं आणि मग त्याचा पूर्ण बायोडाटा वाचू लागली.

" हो मॅडम, मलाही वेगळेपण वाटत आहे. तुम्ही विचार करत आहात का या व्यक्तीचा? तसं असेल तर आपल्याला इंटरव्ह्यू घेण्याची गरजच नाही. " मसीरा तिच्याकडे पाहत म्हणाली, तशी ती विचार करू लागली.

" मला वाटतं आपण सर्वांच्या इंटरव्ह्यू घेऊन टाकुयात. नंतरच आपण जो विचार करत आहोत तो योग्य आहे की अयोग्य ते समजेल. शेवटी कामासाठी पात्रता महत्त्वाची आहे. " सिया विचार करून म्हणाली, त्यावर मसीराने होकारार्थी मान हलवली.

" इंटरव्ह्यूची वेळ झाली आहे मॅडम. मी बाहेर जाऊन सर्वजण आले आहेत का चेक करते. मग एकेकाला आतमध्ये पाठवते. " मसीरा म्हणाली, त्यावर सियाने मान हलवली आणि तिला जाण्याची परमिशन दिली.

मसीरा बाहेर आली आणि तिने सर्वजण आले आहेत का ते चेक केलं. सर्वजण आलेले होते, फक्त प्रेम यायचा बाकी होता. ठरल्याप्रमाणे मसीराने एकेकाला आतमध्ये पाठवायला सुरुवात केली.

जवळजवळ एक तास हा इंटरव्ह्यू चालला होता. एक एक जण आतमध्ये जाऊन धडधडत्या हृदयानेच बाहेर येत होता. आपल्याला या हॉटेलमध्ये काम करायला भेटेल ना? हा प्रश्न सर्वांनाच पडत होता. बाहेर येऊन ते सर्वजण एकमेकांशी चर्चा करत होते. शेवटचे दोन तीन जण राहिले असतील की तेवढ्यात तिथे प्रेम उपस्थित झाला. मसीरा केव्हाची त्याचीच येण्याची वाट पाहत होती. तो दिसताच तिला जरा बरं वाटलं.

उंचपुरा, नाकी डोळी देखणा, मजबूत शरीरयष्टी, थोडेसे कपाळावर झुकलेले मऊ केस, आणि सर्वात जास्त आकर्षक म्हणजे त्याचे निळे गहिरे डोळे. फिकट गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट, अशा पेहरावामध्ये तो आणखीनच देखणा दिसत होता. का कोणास ठाऊक, पण प्रेमची फाईल वाचल्यानंतर सिया आणि मसीराला तोच फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंटसाठी हेड म्हणून योग्य वाटत होता. त्याला तिथे पाहून मसीराला हायसं वाटलं. शेवटचे राहिलेले दोन तीन जण आतमध्ये जाऊन आल्यानंतर तिने प्रेमकडे पाहिलं.

" मिस्टर प्रेम रघुवीर सरदेसाई? " मसीराने त्याच्याजवळ येऊन उभी राहत विचारलं. त्याने लगेच होकारार्थी मान हलवली आणि जागेवर उठून उभा राहिला.

" येस मॅम! " तो उठून उभा राहत हसून म्हणाला. त्याचं ते हसू तिला अधिकच मनमोहक भासलं.

" तुमचा नंबर आहे. तुम्ही आत जाऊ शकता. " तो हसून बोलल्यामुळे मसीरा देखील हसून बोलली आणि त्याला आत जायला सांगितलं.

तिने सांगितल्याबरोबर तो लगेच आत निघून गेला. समोर सिया त्याचीच फाईल हातात घेऊन बसलेली होती. तिची मान अजूनही खालीच होती, त्यामुळे तो आत आलेला तिच्या लक्षात आलं नव्हतं. त्याने आल्यानंतर हसून तिला नमस्कार केला.

" नमस्कार मॅडम! " प्रेम हसून म्हणाला, तशी त्याच्या आवाजाने तिने आपली खाली असलेली मान वर केली.

तिची मान वर झाली तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. फाईलमध्ये असलेल्या फोटोपेक्षा समोरासमोर तो खूपच वेगळा दिसत होता. काही केल्या तिची नजर त्याच्या त्या निळ्या डोळ्यांतून बाहेर निघायची नाव घेत नव्हती. ती आपल्याकडे एकटक पाहत आहे म्हणून तो थोडासा अवघडल्यासारखा झाला.

" नमस्कार मॅडम! " तिला आपल्याकडे एकटक पाहताना पाहून तो पुन्हा म्हणाला. तेव्हा कुठे ती भानावर आली आणि इकडे तिकडे पाहू लागली.

" ओह... एम... एम सॉरी! बसा ना... " आपली चूक लक्षात आल्यानंतर ती म्हणाली आणि त्याला समोर असलेल्या खुर्चीवर बसायला सांगितलं.

" थँक्यू सो मच मॅम! " असा म्हणत तो खुर्चीवर बसला.

" तुमचं नाव? " इंटरव्ह्यूचा हिस्सा म्हणून तिने पुन्हा एकदा त्याला नाव विचारलं.

" प्रेम रघुवीर सरदेसाई. " त्याने हसून आपलं नाव सांगितलं.

" तुमची फाईल वाचली मी. एक वर्षाचा अनुभव आहे तुमचा, हो ना? " सियाने त्याच्याकडे पाहत त्याला विचारलं. त्याने त्यावर होकारार्थी मान हलवली.

" हो मॅम, पण तिथे माझ्या अंडर जी टीम कार्यरत होती त्या टीममधले काही लोक बेकायदेशीरपणे अन्नामध्ये मिसळ करत होते. ज्यामुळे बऱ्याचशा ग्राहकांना त्रास झाला होता, पण याकडे सरासर दुर्लक्ष केलं गेलं होतं. जेव्हा मी त्यांची ती खेळी हॉटेल मालकाच्या लक्षात आणून दिली, तेव्हा टीममधल्या त्या लोकांनी सर्व डाव माझ्यावरच उलटवला होता आणि मला फक्त एक वॉर्निंग देऊन हॉटेल मालकाने कामावरून काढून टाकलं होतं. " प्रेमने प्रामाणिकपणे तिला सर्व हकीकत सांगितली. ती नीट लक्ष देऊन ऐकत होती.

" नंतर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही हॉटेलमध्ये अप्लाय केलं नव्हतं का? " सियाने तिचा पुढचा प्रश्न विचारला.

" केलं होतं मॅम, पण ते हॉटेल कालांतराने बंद पडलं होतं. जास्त दिवस ते हॉटेल सुरू राहिलं नव्हतं आणि खर्चाच्या बाबतीत हॉटेल मालक जरा कंजूसी देखील करत होता. हलक्या प्रतीचे अन्न तिथे शिजवलं जायचं. एका हेड या नात्याने मी बराच प्रयत्न केला होता हॉटेल मालकाशी बोलून चांगल्या दर्जाचे अन्न मिळायला हवं म्हणून, पण तो माणूस काही ऐकायला तयार होत नव्हता. शेवटी ग्राहक हे आपली जबाबदारी असतात, त्यांना जे आणि जसं हवं तसं आपल्याकडून मिळायला हवं म्हणून मी खूप प्रयत्न केला होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता आणि हळूहळू लोकांची गर्दी कमी होऊन ते हॉटेल बंद पडलं होतं. " प्रेमने संपूर्ण माहिती दिली, त्यावर सिया विचार करू लागली.

" चांगली गोष्ट आहे. स्वतःच्या कामामध्ये तुम्ही प्रामाणिक होतात म्हणूनच अपयश मिळालेलं दिसत आहे. असो... " असं म्हणत सियाने त्याला पुढे आणखी काही प्रश्न विचारले, जे की डिपार्टमेंटशी रिलेटेड होते.

सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने अगदी प्रामाणिकपणे दिली. सिया त्याच्या प्रत्येक उत्तरावर इम्प्रेस होत चालली होती. बोलताना त्याचे हावभाव अगदी बारकाईने टिपत होती. हलकेफुलके प्रश्न विचारून झाल्यानंतर तिने काही अवघड प्रश्न देखील विचारले, पण त्याने अगदी सराईतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती.

" ओके मिस्टर प्रेम, तुम्ही बाहेर जाऊन थांबा. मला आजच फूड अँड बेव्हरेज डिपार्टमेंटसाठी हेड नियुक्त करायचा आहे, तर आता काहीच वेळात निर्णय सांगितला जाईल. " सिया हसून म्हणाली, तसा तो जागेवरून उठला आणि हो म्हणाला. तिने सांगितल्याप्रमाणे तो बाहेर गेला.

" निर्णय सांगून होईपर्यंत कोणीही कुठेही जाऊ नका. थोड्यावेळाने निर्णय सांगितला जाईल. " प्रेम बाहेर आल्यानंतर मसीरा सर्वांकडे पाहत म्हणाली.

" हो मॅम! " सर्वजण एका सुरात म्हणाले आणि नंतर आपापलं सिलेक्शन व्हावं म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागले.



क्रमशः



🎭 Series Post

View all