प्रेयसी दान-भाग ३
"हो निनादची अन् माझी फक्त घट्ट मैत्री नाही तर... मनोमन प्रेम आहे आमचं परस्परांवर...!" दिव्या निनाद बद्दल मिलींदला पहिल्या भेटीत जे काही बोलली होती मिलींदच्या मनात एकतर वारंवार तेच ते घोळत होतं आणि दिव्याच्या काळजी पोटी तो त्यांच्यातील संवाद आठवत देखील होता आणि ते आठवतानाच तो पुन्हा एकदा भूतकाळात गेला.
"अगं मग कुठे माशी शिंकली? एवढा हुशार हरहुन्नरी मुलगा... तो देखील एका उच्चभ्रू कुटुंबातील! काय हवं असतं अजून एका प्रेयसीला...?" मिलींदने दिव्याला विचारले.
"हो निनादची अन् माझी फक्त घट्ट मैत्री नाही तर... मनोमन प्रेम आहे आमचं परस्परांवर...!" दिव्या निनाद बद्दल मिलींदला पहिल्या भेटीत जे काही बोलली होती मिलींदच्या मनात एकतर वारंवार तेच ते घोळत होतं आणि दिव्याच्या काळजी पोटी तो त्यांच्यातील संवाद आठवत देखील होता आणि ते आठवतानाच तो पुन्हा एकदा भूतकाळात गेला.
"अगं मग कुठे माशी शिंकली? एवढा हुशार हरहुन्नरी मुलगा... तो देखील एका उच्चभ्रू कुटुंबातील! काय हवं असतं अजून एका प्रेयसीला...?" मिलींदने दिव्याला विचारले.
"आपल्या प्रियकराचं आयुष्य! आयुष्यात आयुष्या एवढं मौल्यवान काहीच नसतं." बोलताना दिव्याच्या पापण्या ओलावल्या होत्या.
"म्हणजे? निनादला काही..." मिलींदने आश्चर्यकारक स्वरात विचारलं.
"निनाद... अगदी बालपणीच त्याची आई गेली. बाबा मोठे व्यावसायिक. त्यामुळे पैसा-अडका, धन-दौलत यातलं काहीही कमी नसलं तरीही वेळेचा त्यांच्याकडे अभावच! स्वतःच्या मुलाकडे बघायला... त्याच्याशी बोलायला त्यांना कधी वेळच नाही मिळायचा... तसा तो त्यांच्याकडे आजही नसतोच. त्यांनी निनादच्या संगोपनासाठी आणि कुटुंबाला पूर्णत्व देता यावं यासाठी दुसरं लग्न केलं...!"
"काय...? त्याच्या सोबत फोटोज् मधे ज्या टॅग असतात त्या...!" मिलींदने दिव्या बोलत असताना तिला मधेच प्रश्न केला.
"हो... सावत्र आई... वाटत नाही कारण दोघांचा परस्परांवर फार जीव आहे." दिव्या बोलत होती.
"मग काय अडचण आहे तुमच्या लग्नात?" मिलींदने उत्सुकतेपोटी विचारलं.
"दोन्ही कुटुंबांमधून कडा विरोध आहे आमच्या लग्नाला... आमचं कुटुंब सुखवस्तू असलं तरीही त्यांच्या स्टेटसला शोभेल एवढं ऐश्वर्य आमच्याकडे नक्कीच नाही... आणि..." दिव्याच्या डोळ्यातून घळाघळा आसावं गळू लागली.
"काय झालं दिव्या बोल ना...!" मिलींदने तिला टिश्यू पेपर देतं गप्प करण्याचा प्रयत्न केला.
"निनाद स्वतः काहीही करत नाही. जे काही आहे ते एकतर त्याच्या बाबांचं नाहीतर वडिलोपार्जित! अशा मुलाशी मी लग्न करू नये असं माझ्या घरच्यांचं ठाम मत आहे." हळव्या स्वरात दिव्याने उत्तरली.
"अगं पण तो सांभाळेल ना वडिलांचा व्यवसाय... करेलच काहीतरी.." मिलींद दिव्याला समजावत होता.
"नाही करणार तो... त्याने काही करू शकणे केवळ अशक्य आहे. आणि त्याने कमावणे न कमावणे हा एवढा साधा कच्चा धागा नक्कीच नाही तोडू शकणार आमच्या प्रेमाला..." दिव्या बोलत होती.
"मग... काय आहे नेमकी अडचण?" मिलींदने प्रश्न केला.
"निनादला कॅन्सर झालाय... ज्याबद्दल त्याला देखील कल्पना नाही. त्याचा व्यवस्थित औषधोपचार होणं आवश्यक आहे. माझ्याशी लग्न करायचयं.. माझ्या बाबांचं मन जिंकायचयं म्हणून पठ्ठा काम करण्याची धडपड करतो आहे आणि त्याच वेळेला माझ्यात असा काही गुरफटतो आहे की... त्याला माझ्यासाठी कष्ट घेताना काही झालं तर?" दिव्या मनातलं सगळं मांडत होती.
"बरा होईल तो... धनाढ्य आहेत ते.. होईल सगळं ठीक." मिलींद पुन्हा दिव्याची समजूत काढत होता.
"होईलच सगळं ठीक पण त्यासाठी मला दूर जावं लागेल निनाद पासून... सावत्र असली तरी त्याची आई त्याला फार जपते... त्यांनी म्हणे कोणत्या जोतिष्याला आमची पत्रिका दाखविलेली... त्याने सांगितले की मी निनादच्या सोबत असणे त्याच्यासाठी घातक आहे." दिव्या आपली द्विधा व्यक्त करत होती.
"दिव्या... तू हे खरं मानलंस देखील... वेडी आहेस का! असं काही नसतं!" मिलींद दिव्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
"मी मानत नसले तरीही मला तो बरा झालेला हवाय... त्याने त्याच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावलेलं हवंय. माझ्याशिवाय देखील मला त्याला आनंदी जगताना पहायचंय. निनादची आई त्याची सर्व प्रकारे काळजी घ्यायला तयार आहे.. त्यांची एकच अट आहे मी त्याच्या पासून कायमचं दूर जावं... खूप खूप दूर जावं!" दिव्या पुन्हा भावूक झाली होती.
"त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला होता तेव्हा देखील त्याच्यावर नको नको ते आरोप झाले... तो दारू पितो.. माझ्यापायी व्यसनाच्या आहारी गेला आहे... असे आरोप त्याच्या बाबांनी केले." दिव्या खुल्या पुस्तकाप्रमाणे एकेक पान उघडतं होती.
"श्रीमंतांच्या मुलांना असतातही शौक.. नवल ते काय त्यात." मिलींद अगदी सहजपणे बोलला.
"पण मी त्याला अगदी बालपणापासून ओळखते... त्याला जीव ओवाळून टाकणारी माणसं लागतात आसपास... त्याला व्यसन आहे ते संगीताचं... शौक आहे तो काव्य वाचनाचा!" दिव्याचा स्वर उत्तर देताना काहीसा उंचावलेला होता.
"मिलींद... आमच्या दिव्याचा राजकुमार! फार नशीबवान आहेस बाबा तू... दिव्याच्या रूपाने तुझ्या आयुष्यात एक खूप सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आहे." निनाद आणि मिलींदची ती भेट मिलींदला आज अस्वस्थ करत होती.
"अरे दोस्ता लग्न जरी माझ्याशी होणार असलं तरी आमच्या नात्यातला दुवा मात्र कायमच तू असणार आहेस." मिलींद फार मोठ्या आत्मीयतने बोलत होता.
"अरे दोस्ता लग्न जरी माझ्याशी होणार असलं तरी आमच्या नात्यातला दुवा मात्र कायमच तू असणार आहेस." मिलींद फार मोठ्या आत्मीयतने बोलत होता.
"आम्ही काय कर्म दरिद्री ठरलो... लग्न करायला आणि लग्नानंतर बायको पोसायला स्वतःची कमाई लागते... मात्र तेवढं देखील जमलं नाही आणि खेळलो अंथरुणाला...!" निनाद आणि मिलींद यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संवादाने दिव्या देखील काहीशी स्थिर झाली होती.
"वाह वाह... निनाद.. काय जादू आहे तुझ्या स्वरात! आता कळलं दिव्याला का तुझे स्वर वेड लावतात ते...! तुझा हेवा वाटतो मला." निनादने बहारदार गाणे ऐकविले आणि सोबतीला गिटार छेडली त्यामुळे मैफिल अजूनच रंगलेली होती.
"कसली तारीफ करतोय मिलींद... खरी ताकद तर कवीच्या शब्दात असते. मला कवितांचं वेड आहे. कालच एका कवयित्रीची एक कविता वाचली आणि त्या कवितेत मीच मला भेटलो जणू काही... असं वाटतं मीच आहे त्या अवस्थेत... कवितेचं शीर्षक आहे \"मी छळाया लागलो\"
श्वास येऊ लागला
अन् श्वास जाऊ लागला...
श्वास एकाकीपणा
माझाच पाहू लागला...!
हा सुखदसा भास किती!
तू सखी मज सोबतीला!
अन् अशा देहांत समयी
मी जगाया लागलो!
श्वास येऊ लागला
अन् श्वास जाऊ लागला...
श्वास एकाकीपणा
माझाच पाहू लागला...!
हा सुखदसा भास किती!
तू सखी मज सोबतीला!
अन् अशा देहांत समयी
मी जगाया लागलो!
मरतांनाही जगता आलं तर माणूस शेवटच्या क्षणी तरी स्वतःला भेटू शकेल नाही...!"
क्रमशः
©तृप्ती काळे
नागपूर टीम
©तृप्ती काळे
नागपूर टीम