Login

प्रीत ही जन्मातंरीची (भाग 3)

प्रीत ही जन्मातंरीची : प्रेमकथा
"काय ग काही हव आहे का?"

"नाही काही नाही सहजच आले होते, बर तू तुझ्या काकांच्या मुलीला पाहिलस का कधी?"

"हो पण बरीच वर्ष झाली तेव्हा ती लहान म्हणजे असेल आठवीत मी फर्स्ट ईयर ला लास्ट टाइम तेव्हाच भेटलो त्यानंतर बाबा आई जायचे गावी पण मला नाही जमल कधी जायला, कॉलेज झाल की जॉब लागला , आता जावच लागणार, काका काकुंसाठी.
पण तू का विचारतेस ?"

"काही नाही सहजच."अस म्हणून पिहू निघुन गेली.

विनीतला प्रश्न पडला मी एवढा अपघात सांगितला तर पिहू त्यावर काहीच बोलली नाही, मग आता निहूला मी पाहिल का है विचारायला का बर आली असेल?
जाउदे असेल तिच्या मनात काही. पण पिहू छानच आहे, आजकालच्या मूली लवकर कुणाशी जुळवून घेत नाहीत, पण ही खूपच मनमिळावू आहे, सुंदर पण आहे. काय फालतू विचार करतोय मी पण....
चांगली मैत्री जमली दोघात अन मी काय विचार करतोय.

आता रोज सकाळी पिहू नास्ता, टिफिन विनीतला दयायची आणि ऑफिस वरुण येताना विनीत घरातील गरजेच्या वस्तु घेऊन यायचा. विनीत ऑफिसला जाताना पिहू बाल्कनीत उभी असायची आणि विनीत खाली गेला की तिला वर पाहुन हात हालवून बाय म्हणायचा. खालच्या काकु त्यांच्या बाल्कनीत तुळशीला पाणी घालत असत, विनीतने वर बघून बाय केल की त्या अचंबित होऊन वर बघायच्या.

अशातच महीना गेला, काका काकु नागपुरला थोडे दिवस राहून परत गावी गेले रोज आई बाबांशी बोलण व्हायच. प्रोजेक्ट कंप्लीट झाल तस नागपुर ऑफिसला बॉसला मेल करून सर्व माहिती दिली, दुसऱ्या दिवशी सकाळीच बॉसचा फोन आला.

" बॉस!! अभिनंदन विनीत तुझ्या काल पाठवलेल्या प्रोजेक्टच डील फाइनल झाल."

"थैंक यू सर."

"अरे अजून एक गुडन्यूज आहे तुझ्यासाठी"

"अजून काय सर?"

"अरे तुझ प्रमोशन झाल आणि आता ज्या मुंबईच्या ऑफिस मधेच तुझ ट्रांसफर पण झाल आहे.
तर तुला आता पुढेही तिकडेच राहून काम करायच आहे."

"दॅट्स ग्रेट न्यूज! ओके सर, थैंक्यू सर, थैंक्यू व्हेरी मच!!"

गूडन्यूज़ घरी फोन करून सांगितली, आई बाबा पण खुश झाले. आता ज्या घरात राहत होता तिकडेच राहण्याचा निर्णय त्याने घेतला. आता कायम स्वरूपी राहायचे म्हणजे फुकट नको, म्हणून त्याने राजेशला भेटून सांगितले, राजेशने पण अभिनदंन केले आणि जे तुला भाड दयायच असेल ते ठरवून दे अस म्हणाला.
पिहूला सांगावी का बातमी, असा विचार करत घरी निघाला.
दारात पोहचणार तेव्हढ़यात पिहू खाली आली,
"चल तुझ्यासाठी खीर बनवली आहे मी!"

"कोणत्या खुशीत खीर?"

"अरे बातमी गोड असेल तर खायला पण गोड हवंच?"

"तुला कस माहित गोड बातमी आहे म्हणून?"

"अरे ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे, बर चल खीर थंड होईल."

कधी कधी पिहू जे वागायची ते विनीत साठी अनपेक्षित असायच.असच दोघांच चालू होत आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले दोघानाही समजल नाही.पिहू दिसायला खूपच सुंदर होती.
सहा सात महीने उलटून गेले, घरी कस सांगाव आताच नको बघू नंतर असच विनीत विचार करत होता. एक दिवस बाबांचा फोन आला.

" तुझ्या लग्नासाठी आम्ही मुलगी पाहतोय, आपल्या नातलगातली आहे एक, तू पण बघून घे म्हणजे आम्हाला बोलनी साठी बर."
विनीतला काय बोलाव कळेना, पिहू बददल सांगव का बाबांना,समजून घेतील का ते?

"अरे बोलशील का काही?"
समोरून बाबांचा आवाज आला तस धाडस करून विनीत म्हणाला,"बाबा माझ एका मुलीवर प्रेम आहे, खुप सुंदर सुशील आहे, तुम्ही पण तिला पाहून पसंत कराल. सॉरी बाबा मी निर्णय तुम्हाला न सांगता घेतला."

"अरे आम्हाला पण असच काही वाटत होत तुझ्याबद्दल, म्हणूनच लग्नाचा विषय काढला."

"म्हणजे ओ बाबा?"

"म्हणजे हल्ली तुझ फोन करणं खुप कमी झालय, तुझ्या आईला शंका आली कुठल्या मुलीच्या तर प्रेमात नाही पडला म्हणून आम्ही सहजच लग्नाचा विषय काढला आणी तुझ्या आईची शंका खरी ठरली.
बर कधी भेटवतोस? आमच्या होणाऱ्या सुनबाईला!!"

"काय बाबा तुम्हीपण!!" विचार करून सांगतो अस म्हणून लाजुन विनीतने फोन ठेवला.

तसाच उठून पिहू कडे गेला.
"पिहू पिहू... गोड बातमी सांगायची तुला."

"काय आहे गोड बातमी!!"

"बाबानी तुला भेटायला घेऊन यायला सांगितल आहे, आपल्या बद्दल मी त्याना सर्व सांगितले ते आपल्या लग्नाला तयार आहेत."

पिहू खुश होण्याऐवजी नाराज दिसत होती,
"का ग तुला न्यूज़ ऐकून आनंद नाही का झाला?"

"तस नाही पण मी कधी लग्नाचा विचार केला नाही.'

"मग आता कर, तुझ माझ्यावर प्रेम आहे ना!"

"अरे हे काय विचारण झाल का?"

"प्रत्येक जन्मात प्रेम करते तुझ्यावर मी.."

"बर बाई तू विचार करायला जेवढा वेळ हवाय तेवढा घे, मी बोलेन घरच्यांशी."

"हं ठीक आहे."

आता दोघे अगदी मनमोकळपणे राहत होते. अगदी एकमेकांसाठीच आहेत दोघे असच. दोघांच्या ओळखीला आणि प्रेमाला एक वर्ष होत आली. पिहू कडून लग्नाचा काहीच विषय नसायचा.


क्रमश :

🎭 Series Post

View all