विनीतला वाटे बहुतेक घरचे तयार नसतील तिच्या म्हणून तो ही कधी विचारुन तिला डिस्टर्ब करत नसे.
एक दिवस आईचा फोन आला,
"हा बोल आई कशी आहेस?"
एक दिवस आईचा फोन आला,
"हा बोल आई कशी आहेस?"
"मी बरी आहे. तू कसा आहेस आणि आमची होणारी सुन कशी आहे?"
"हो आई आम्ही दोघेपण चांगले आहोत."
"मी काय म्हणते विनीत तू येत्या पौर्णिमेला इकडे येतोस का?"
"का ग काही खास आहे का?"
"हो खास च आहे आपल्या निहूला जाऊन वर्ष होतय तीच प्रथम वर्षश्राद्ध आहे पौर्णिमेला!!"
" तू कोणत्याच विधीला नव्हतास म्हणून आता तू आलास तर बर होईल, राणे भाऊजीना पण बर वाटेल, आणि येताना दोघेपण या तुमच्या लग्नाच पण फिक्स करून टाकू."
" तू कोणत्याच विधीला नव्हतास म्हणून आता तू आलास तर बर होईल, राणे भाऊजीना पण बर वाटेल, आणि येताना दोघेपण या तुमच्या लग्नाच पण फिक्स करून टाकू."
"बर बर आई नक्की येतो तू नको काळजी करु!"
बोलून झाल फोन ठेवला तस केलेंडर कडे पाहिल तर फक्त चार दिवसावर पौर्णिमा होती. पिहूला सांगायला हव म्हणून पिहूच्या रूम मधे गेला. पिहू झोपली होती अंग गरम होत.
"पिहू काय ग काय झाल झोपलीस का?"
"पिहू काय ग काय झाल झोपलीस का?"
"अरे काही नाही थोडी कनकनी आलीय, बाकी काही नाही."
"चल डॉक्टर कडे जाऊ."
"नको आता थोड्या वेळात बर वाटेल."
"थांब मी मेडिकल मधून गोळ्या घेऊन येतो", म्हणून विनीत बाहेर पडला. मेडिकल मधून गोळ्या घेतल्या,घरी आला पिहूला गोळी दिली.
"बर एक न पिहू तुला काही संगायच आहे."
"सांग की मग त्यात काय.!"
"आईचा फोन आलेला निहूबद्दल!! तुला आपली ओळख झाली तेव्हा सांगितल होत न तीच प्रथम वर्षश्राद्ध आहे चार दिवसाने मला जाव लागेल आणि तुला पण आईनी घेऊन यायला सांगीतल आहे.
येशील न?"
येशील न?"
"मला नाही बर वाटत तू जाऊन ये न तोपर्यंत बर वाटलच तर येईल मी पण!!"
"ठीक आहे. आराम कर आता म्हणून विनीत बाहेर आला. तीन दिवस झाले पण पिहू फ्रेश नव्हतिच, विनीतला काय कराव समजेना आजारी पिहूला सोडून जायची इच्छा नव्हती आणि न जाऊन चालणार नव्हते.
त्याची द्विधा मनस्थिती पाहुन पिहू म्हणाली एक दिवसाचा प्रश्न आहे जेऊन ये तू."
त्याची द्विधा मनस्थिती पाहुन पिहू म्हणाली एक दिवसाचा प्रश्न आहे जेऊन ये तू."
आता विनीतला थोड हायस वाटल. पौर्णिमेच्या एक दिवस अगोदरच विनीतला निघायच होत कारण पौर्णिमेला निघुन विधी वेळेपर्यंत पोहचण शक्य नव्हत.
दोन दिवसाची कपडे बॅग मध्ये टाकून निघायची तयारी झाली.
पिहूला भेटन्यासाठी तिच्या रूम वर गेला ती जणू त्याचीच वाट बघत होती.
दोन दिवसाची कपडे बॅग मध्ये टाकून निघायची तयारी झाली.
पिहूला भेटन्यासाठी तिच्या रूम वर गेला ती जणू त्याचीच वाट बघत होती.
"आलास का मी वाटच बघत होते", अस म्हणून त्याला मीठी मारली आणि रडायला लागली जणू पुन्हा परत भेटनारच नाही.
"अग पिहू!! काय झाल दोनच दिवसा साठी चाललो आहे, तू म्हणत अशील तर नाही जात." तस तिने डोळे पुसले आणि म्हणाली, "नाही नाही तू जा मी ठीक आहे."
"बर चल निघतो पोहचलो की कॉल करेन तुला, काळजी घे."
"हो तू ही नीट जा, काळजी घे." पिहू निरोप देताना विनीत कडे अशी पहात होती की पुन्हा कधीच भेटणार नाही आणि ते विनीतला स्पष्ट जाणवत होत.
येतो म्हणून विनीत निघाला, स्टेशन वरुन गाडी पकडली. पिहूचा चेहरा काही केल्या नजरे समोरून जात नव्हता.
येतो म्हणून विनीत निघाला, स्टेशन वरुन गाडी पकडली. पिहूचा चेहरा काही केल्या नजरे समोरून जात नव्हता.
पहाटे पाच वाजता गावी पोहचला, गाडीतुन उतरल्या बरोबर पिहूला कॉल केला पण पण "नंबर चुकीचा आहे तपासून पहा" असच उत्तर येऊ लागल. अस कस शक्य आहे? बघु नंतर म्हणून बॅग घेऊन राणे काकांच्या घरी निघाला.
घरी सगळे दुःखद वातावरण होते. आईबाबा कालच गेले होते, राणे काका काकु विनीतला बघून रडू लागले त्याना समजावून सांगून शांत केले.
आंघोळ करून विधिची तयारी चालू झाली.
ब्राम्हण आले पुजेच, नैवेद्य सगळ व्यवस्थित केल होत, ब्राम्हणने विधीला सुरवात केली. पिंडदान करून तस्वीर पुजेला फोटो मागितला, काकु फोटो घेऊन आल्या, विनीत पुढे बसला होता त्याच्या हातात दिला.
विनीतने फोटो वरील पेपर काढला ब्राम्हण कडे देण्यासाठी फोटो सरळ केला. आणि काय एका क्षणात विनीतला चक्क घाम फुटला, फोटो मधील तरुणी दूसरी तिसरी कुणी नसुन पिहू होती. 'हे कस शक्य आहे', अस तोंडातुन निघाले तस बाजूला बसलेले बाबा म्हणाले , "शक्य नव्हत तेच झाल काय करणार नाशिबापुढे कुणाचे काही चालत नाही."
ब्राम्हण आले पुजेच, नैवेद्य सगळ व्यवस्थित केल होत, ब्राम्हणने विधीला सुरवात केली. पिंडदान करून तस्वीर पुजेला फोटो मागितला, काकु फोटो घेऊन आल्या, विनीत पुढे बसला होता त्याच्या हातात दिला.
विनीतने फोटो वरील पेपर काढला ब्राम्हण कडे देण्यासाठी फोटो सरळ केला. आणि काय एका क्षणात विनीतला चक्क घाम फुटला, फोटो मधील तरुणी दूसरी तिसरी कुणी नसुन पिहू होती. 'हे कस शक्य आहे', अस तोंडातुन निघाले तस बाजूला बसलेले बाबा म्हणाले , "शक्य नव्हत तेच झाल काय करणार नाशिबापुढे कुणाचे काही चालत नाही."
तेवढ्यातुन उठून विनीत बाजूला जाऊन पिहूला कॉल करू लागला पण काहीच उपयोग नव्हता नंबर लागतच नव्हता. काहीच सूचत नव्हत, मग थोड शांत डोक्याने विचार केला की सेम दिसणाऱ्या पण व्यक्ती असतात म्हणे तसेच काही असेल, निहू आणि पिहू सारख्याच दिसत असतील.
मनाची उगीच समजूत घालून परत विधीला येऊन बसला , पण मनात वेगळच चालू होत. दोन तासात विधी पूर्ण झाल्या तस लगेच बैग घेऊन सगळ्याना सांगितल की, ऑफिस मधून ताबडतोब बोलावल आहे, मला लगेच निघाव लागेल आणि कुणाच्याही परवानगीची वाट न बघता तडक निघाला, मिळेल त्या गाडीने मुंबई ला लवकरात लवकर पोहचुन काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे होते.
मिळेल त्या गाडीने एकदाचा मुंबईत पोहचला टॅक्सी करून घरी आला. सरळ चवथ्या मजल्यावर गेला दाराला कुलुप होत, परत पिहूचा फोन ट्राय केला पण तेच.
आज तेच दार वेगळ वाटत होत, अस वाटत होत खुप वर्ष तिथ कोनी राहत नसल्यासारख. काय प्रकार आहे काही समजत नव्हत. मग आठवल खालच्या काकुना माहित असेल पिहू कुठे ते,म्हणून कधी नव्हे ते काकुचा दरवाजा वाजवला, काकू बाहेर आल्या. "का रे विनीत काही हवय का? "
"नाही काकु, वरती पिहू राहते ति कुठे गेली माहित आहे का?"
"कोण पिहू? आणि तुझ्या रूमच्या वरच्या मजल्यावरचे सगळे फ्लैट बंद आहेत ते एकाच मालकाचे आहेत तिनही रूम, तो म्हणे गावीच असतो."
"मग पिहू?"
"अरे कोण पिहू? आपल्या बिल्डिंग मधे पिहू नावाची कुणी राहात नाही."
विनीतला काय बोलाव काहीच सूचत नव्हत, जिच्यासोबत गेली एक वर्ष राहात होता ती इथ राहातच नाही? कस शक्य आहे. स्वतःच्या रूमचा दरवाजा उघडला एक न अनेक विचार डोक्यात चालू होते. घामाघुम झाला होता, डोक काम करायच बंद झाल होत. तसाच बेडवर बसून राहिला, तेवढ्यात कपाटावर ठेवलेल्या डायरी कड लक्ष गेल. कसली डायरी मी तर नाही ठेवली बघू तरी कसली डायरी ते म्हणून विनीतने डायरी काढली, उघडून बघणार तेवढ्यात लाइट गेली. गरम होत होत म्हणून बाल्कनीचे दार उघडल, तेवढ्यात एवढ जोराच वार आल की अस वाटल वादळ घरात शिरतय की काय.
डायरी काढून बघायला सुरवात केली अन विनीतला चक्कर यायला लागली
डायरी काढून बघायला सुरवात केली अन विनीतला चक्कर यायला लागली
" प्रिय विनीत मी निहू म्हणजेच तुझी 'पिहू' तू मला ओळखले नाहीस, कसा ओळखशील, आपण भेटूनच खुप वर्ष झालेली, तुझ्या आठवणीत पण नव्हते मी कशी दिसते ते, तुला आठवत आपल्या सोसायटीत नाटक झाल होत आपल मुलांच तेव्हा मी आठवीत होते, त्याच वर्षी तुम्ही नागपुरला आलात, त्या नाटकात तू नवरा आणि मी तुझी बायको झाले होते.
त्या दिवसांपासून मी कधीच दुसऱ्या कुणाचा विचार देखील केला नाही, कॉलेज मधे पण मुली बोलायच्या अस कुठे प्रेम असत का? पण मी म्हणायचे माझ प्रेम कधीतरी तुझ्यापर्यंत पोहचेल, मग कॉलेज संपल्यावर बाबानी स्थळ पाहायला सुरवात केली तेव्हा पण माझ धाडस नाही झाल, विचार केला तू तर मला विसरला पण असशील मग कुणाला सांगून काय उपयोग, मुलगा चांगल्या हुद्द्यावर आहे आपण असे गरीब, कस जमेल, त्यांनी मलाच समजवल,.
आमच्याच नात्यातील स्थळ शोधून माझ लग्न जमवल पण... मला मान्य नव्हत, मी तुझ्या व्यतिरिक्त कुणाचाही विचार केला नव्हता, मग काय त्याच्या नावची हळद लागली पण कुंकु नाही लावायच म्हणून हळदी दिवशी मीच माझ्या खोलीला आग लावून घेतली आणि समाधनाने डोळे मिटले, पण तुला भेटण्याची इच्छा अधुरीच होती म्हणून पिहू बनून तुझ्या आयुष्यात आले मला माफ कर, मी तुझ्याशी खोट बोले पन माझ प्रेम खर होत, मला तुझ प्रेम हव होत मला तुझा सहवास हवा होता, म्हणून सगळ केल..
तुला आठवत मी आंघोळ करून बाहेर आले होते माझ्या माथ्यावर काहीच नव्हत ते बघून तू तुझ्या हाताने मला कुंकु लावलस आणि मी पूर्णतवाने तुझी झाले.
मला एक क्षण पुरेसा होता तुझ्या प्रेमाचा तू तर मला पूर्ण एक वर्ष दिल मी खुप भाग्यवान होते म्हणून तू मला भेटलास, आणी हो मी आता निघते कारण वर्षश्रद्धाचा विधी सुद्धा बरयापैकी तुझ्याच हाताने पार पडला आणि मला शेवटची मुक्ती मिळाली."
#तुझीच फक्त तुझी#
निहू
निहू
विनीतच्या डोळ्यातून अश्रु धारा वाहत होत्या, मनाशीच बोलत होता तु तुझ साध्य केलस आणि मला मात्र अधांतरी सोडून गेलीस.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा