❤️प्रीत मनी जपली❤️... भाग 12
आधीच्या भागात आपण पाहिले की,
समीरने मीराला नवीन मोबाईल घेऊन दिला, मीराच्या सासूने त्या दोघांसाठी उटीची तिकीट बुक करून दिली, समीर बोलला की तुला गावाला सोडून देतो आणि मी तिच्यासोबत जातो. मीराची इच्छा असतानाही ती काहीच बोलली नाही. तिचे डोळे पाणावले आणि ती स्तब्ध उभी होती.
आता पुढे,
“बोल ना मीरा तुला चालेल का? तसही बरेच दिवस झाले आमची भेट झालेली नाही, मी तिला घेऊन उटीला जातो, आम्ही थोडा एकमेकांसोबत वेळ घालवू आणि तुला तुझ्या गावी पोहोचवून देतो.”
मीराच्या डोळ्यात पाणी होतं, मन भरून आलेलो होतो गळ्यातून शब्दही निघत नव्हते, तिने फक्त होकारार्थी मान हलवली आणि खोलीतून बाहेर निघून गेली.
ती बाहेर गार्डन मध्ये जाऊन बसली आणि एका बाजूला उभी राहून खूप रडली. तिकडे समीरने त्याच्या पहिल्या बायकोला फोन केला, तिला सगळं सांगितलं पण तिच्या ऑफिसच्या सुट्ट्या नसल्यामुळे तिने नकार दिला. त्यामुळे मग समीरने त्याचा प्लॅन चेंज केला. त्यांनी मीराला सगळं सांगितलं आता आपण दोघे जाऊ हे बोलला, मीराला खूप आनंद झाला. मीराने फटाफट बॅग पॅक केले आणि दुसऱ्या दिवशी दोघेही उटीसाठी निघाले.
प्रवासामध्येही मीरा समीरच्या थोडया दूरच बसलेली होती, समीर आणि मीराने अजून एकमेकांना स्पर्श केलेला नव्हता. प्रवासामध्ये ते एकमेकाला टच व्हायचे एकमेकाकडे बघायचे आणि पुन्हा दूर दूर सरकायचे. उटीला पोहोचल्यानंतर समीरच्या आईने जे हॉटेल बुक करून ठेवलेले होतं तिथे दोघेही गेले, रूम खूप छान होती, हॉटेल खूप छान होतं परिसरही खूप छान होता. दोघांनी फ्रेश होऊन हॉटेलमध्ये जेवण केलं आणि फिरायला बाहेर निघाले. दोघेही बराच वेळ काहीच बोलले नाही.
“मीरा तुला माझा राग येत असेल ना ग?”
“नाही तुम्हाला का असं वाटत?”
“मी तुझ्याशी लग्न केलं तर बायको म्हणून स्थान देऊ शकलो नाही, तुला राग येत असेल ना?”
“नाही असं काहीच नाहीये सगळं नीट होईल तुम्ही काळजी करू नका.” एवढेच बोलून मीरा समोर निघाली.
‘ही अशी का बोलली.’ समीर याचाच विचार करत राहिला.
गावाकडे राधेने खाण-पिण सोडून दिलं होतं, तो फक्त एका ठिकाणी बसून राहायचा. हातात पायल असायची कुणाशीही काही बोलायचा नाही. एक दिवस तो चालता चालता नदीजवळ गेला, तिथे झोपडी होती तिथे जाऊन बसला. राधेची आई त्याला आणायला गेली तरी तो घरी आला नाही. कुणी काही दिलं तर खायचा, नदीचं पाणी प्यायचा आणि तिथेच राहायचा.
एकदा शामा त्याला भेटायला गेली, तिने खूप समजावलं पण तो तयारच नव्हता त्याला फक्त वाट होती ती मीराची येण्याची. पण सत्य परिस्थिती ही होती की मीरा येणार नव्हती. ती येईल की नाही याची शाश्वती नव्हती समीर आणि मीरा मध्ये जे काही घडलं होतं, जे काही बोलणं झालं होतं ते त्या दोघांनाच माहिती होतं. राधे वेडी अशा लावून बसलेला होता, माझी मीरा माझ्याजवळ नक्की परत येईल या आशेवर तो जगत होता.
समीर आणि मीरा एका लव पॉइंट फिरायला गेले, तिथे सगळे कपल्स बसलेले होते. कुणी एकमेकांच्या हातात हात घालून बसले होते, कुणी एकमेकाला किस करत होते, एकमेकांवर प्रेम करत होते. सगळीकडे बघून मीराला ऑकवर्ड झालं.
“अहो आपण दुसरीकडे जाऊया का?”
समीर तिला दुसरीकडे घेऊन गेला, ते एका बगीच्यात जाऊन बसले,
“मीरा काय खाणार आहेस तू?”
“नाही नको दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर समीरने राधेचा विषय काढला.
“मीरा तुला एक विचारू का?”
“हो बोला ना.”
“राधेला कळलं असेल की आपलं लग्न झालं तेव्हा त्याने तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही का ग केला?”
“नाही.”
“त्याला तुझी आठवण येत असेल ना?”
“माहित नाही.”
“तुला त्याची आठवण येत असेल ना?”
“माहित नाही.” मीराचे त्याच्या आठवणीने डोळे पाणावले होते. मीराला रागही येत होता आणि रडूही येत होतं.
समीरचे प्रश्न सुरू होते आणि मीरा राधेचा विचारात गुंतली.
“मीरा तू काही बोलत का नाहीयेस.. मीरा..” समीरने तिला हलवलं तेव्हा ती तिच्या विचारातून बाहेर आली.
“काय झालं कसला विचार करतेस? काय विचारतो मी तुला? काही बोलत का नाहीस?”
“मला राधेविषयी बोलायचं नाहीये आणि प्लीज तुम्ही त्याच्याबद्दल मला काही विचारू नका हात जोडते मी.” रडवेली झालेली मीरा असं म्हणून तिथून उठून गेली. समीर मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतचं राहिला.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा