❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 14
आधीच्या भागात आपण पाहिले की,
समीर रात्रभर बाहेर होता, त्याचा फोनही लागत नव्हता. फोन स्विच ऑफ दाखवत होता. समीरच्या आईला काळजी वाटत होती. मीराला कल्पना होती पण ती सासूला काही सांगू शकत नव्हती. पहाटे पहाटे समीर घरी आला.
आता पुढे,
“हे बघ समीर असे यापुढे मला चालणार नाही तुझी बायको घरात असताना तो असा रात्रभर बाहेर काय करतोयस? तुला तिची काळजी नाही का? ती रात्रभर आपला विचार करत असेल, आपली वाट बघत बसली असेल याचही तुला भान नाही आणि मोबाईल का बंद होता तुझा? रात्रभर तिने तुला फोन केला, मोबाईल बंद दाखवत होता. ही काही पद्धत आहे का? घरी कळवायचं हेही तुला कळत नाही.” समीरची आई त्याला खूप ओरडली.
“आई प्लीज ओरडू नकोस गं.” असं म्हणून समीर उठून तिथून निघून गेला.
मागेहुन त्याच्या आईने त्याला आवाज दिला,
“समीर एक मिनिट.. ही काय पद्धत आहे आईशी बोलण्याची मी तुला उत्तर विचारत आहे, मला उत्तर हवय रात्रभर तू कुठे होतास?”
समीरला सांगायचं नव्हतं म्हणून समीर चिडलेला होता.
“हे बघ आई प्रत्येक गोष्टीच तुला उत्तर द्यायला हवं असं काही कंपल्शन नाहीये, मी माझ्या कामात अडकलेलो होतो मी तुला एवढेच सांगू शकतो.” असं म्हणून तो फ्रेश व्हायला निघून गेला.
समीरच्या आईला खूप राग आलेला होता, मीराने त्यांना शांत केलं.
“आई जाऊद्या ना ते कामात अडकले असतील आणि आता थकले असतील आपण उगाच त्यांना प्रश्न विचारले तर त्यांचा मूड खराब होईल, असू द्या आपण शांतपणे बोलू या त्यांच्याशी.” मीराच्या बोलण्यावर मीराची सासू थोडी शांत झाली आणि ती तिच्या खोलीत निघून गेली.
आता अधून मधून असं घडायला लागलं होतं, आधी समीरच्या आईच्या लक्षात येत नव्हतं पण आता त्यांच्या लक्षात यायला लागलं.
समीर घरी न सांगता निघून जायचा. तो कुठे जायचा हे फक्त समीरला आणि मीरालाच माहीत असायचं.
असेच दिवस सरत गेले, बघता बघता लग्नाला दोन महिने झाले. एक दिवस मीराची सासू त्यांच्या खोलीत आली. त्यांनी मीराला विचारलं,
“काय ग मीरा समीर बरा वागतो ना तुझ्याशी.”
“होय, काय झालं आई?”
“हे बघ मीरा समीर तुझा नवरा आहे, त्याला आपण सुख कस द्यायचं, त्याच्यावर प्रेम कसं करायचं हे तुझं तू ठरव. आपला नवरा आपल्या हातात असायला हवा. तू त्याला प्रेम दे, त्याला हवं नको ते बघ. रात्रीच्या एकांतात दोघे एकमेकांना वेळ द्या. त्यातूनच तुमच्या प्रेमाच्या वेलीवर फुल उगवेल. हो ना?”
मीराला सगळं कळत होतं पण एका हाताने टाळी वाजत नाही त्यासाठी समीरने तयार व्हायला हवं. ही गोष्ट तिला कळत होती पण ती कुणालाही सांगू शकत नव्हती. तिने फक्त मान हलवली.
हळूहळू दोघांमध्ये जवळीकता वाढत गेली कारण समीरचा उद्देशच तो होता, त्याला फक्त थोडा वेळ जाऊ द्यायचा होता.
हळूहळू दोघांची शारीरिक जवळीकता वाढत गेली आणि दोघांमध्ये शारीरिक प्रेम फुलायला लागलं. आता मीराच्या चेहऱ्यावर तेज दिसायला लागलं होतं. रात्रीच्या त्या सहवासानंतर तिच्या चेहऱ्यावर लाली यायची. आतून ती निखरत चालली होती आणि हे मीराच्या सासूच्या लक्षात आलं तर त्यांनी मीराची दृष्टच काढून घेतली.
“माझ्या सुनेला कुणाची नजर नको लागायला.” असं म्हणून त्या रोज तिची दृष्ट काढायच्या.
बघता बघता लग्नाला सहा महिने झाले, मीराचा आणि समीरचा शारीरिक प्रेम फुलत गेलं आणि काही महिन्यातच मीराला दिवस गेले. मीरा प्रेग्नेंट आहे ऐकूण मीराच्या सासूला अतोनात आनंद झाला. मीरासाठी काय करू नका काय नाही असं होत होतं.
समीरला ही तितकाच आनंद झाला कारण त्याला आता या नवीन बाळासह त्याच्या पहिल्या बायकोला घरी आणता येणार होतं, तसा त्यांनी प्लॅन्स तयार केला होता. घरी काय सांगायचं हे सगळं त्यांनी ठरवलं होतं पण मीराला मात्र आई होण्याचा आनंद होत नव्हता, का कुणास ठाऊक तिच्या चेहऱ्यावर फक्त उदासीनता दिसत होती. मिरच्या सासूने विचारलं,
“मीरा काय झालं तुझा चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये.”
“नाही असं काही नाहीये, मी आई होणार तर मला तर आनंद होणारच ना.” असं म्हणून तिने चेहऱ्यावर हास्य आणलं. पण मनातून ती विचार करत होती आई मला खरंच आनंद झाला नाहीये कारण हे बाळ आल्यानंतर मला एक घर सोडून जावं लागेल आणि मला खरंच जायचं नाहीये.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा