Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 15

Katha eka mirechi


❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 15


आधीच्या भागात आपण पाहिले की

समीर आणि मीरा मध्ये शारीरिक जवळीता वाढत गेली, त्यांचे शारीरिक प्रेम फुलत गेले आणि त्यातूनच मीराला दिवस गेले. समीर आणि समीरची आई खूप आनंदात होते पण मीराला आनंद झालेला नव्हता, कारण बाळ झाल्यानंतर तिला ते घर सोडायच होतं जे मीराला नको होतं.
आता पुढे,

हळूहळू दिवस समोर सरकत होते, समीर मीराला दवाखान्यात चेकअप साठी घेऊन गेला, डॉक्टरने मीराला पूर्णपणे बेडरेस्ट सांगितलेली होती. मीरा नाजूक असल्यामुळे तिला जास्त काळजी घ्यायची होती. समिरही आता ऑफिस मधून लवकर यायचा, तिची काळजी घ्यायचा हे बघून मीराच्या सासूला खूप बरं वाटायचं.

पण यातही समीरचा काही स्वार्थ पण आहे हे तिला अजूनही ठाऊक नव्हतं. मीराला खुश व्हावं की दुःखी व्हावे हेच कळत नव्हतं. आई होण्याचा आनंद तर होताच पण बाळ झाल्यानंतर ते घर आणि समीरला सोडून जाण्याचा दुःखही वाटत होतं. सगळं ठरल्याप्रमाणेच होत होतं. समीरची आई मीराची पूर्ण काळजी घ्यायची. तिला हवं नको ते बघायची.

एकदा रात्री दोघेही बोलत बसले असताना समीरच्या पहिल्या बायकोचा फोन आला. समीर साईडला बोलायला गेला. समीर खूप चिडून चिडून बोलत होता. मीराला जाणवलं की दोघांमध्ये काहीतरी होतंय. समीरने फोन ठेवला त्यानंतर तो मीरा जवळ येऊन बसला.

“काय झालं तुम्ही इतके का चिडला होतात? कोणाचा फोन होता?”

“नाही काही नाही.”

“अहो सांगा ना का चिडला होतात?”

“काही नाही ग, ती मला भेटायला बोलावतीये. एक दिवस राहायला बोलवतेय आणि मला जायचं नाहीये.”

“का? का जात नाही आहात तुम्ही? तुम्हाला जायला हवं त्यांनाही थोडा वेळ द्यायला हवा ना?”

“नाही आत्ता तुला माझी जास्त गरज आहे सो मला तुझ्याजवळ राहावं लागेल.”

“अहो पण एवढं काही नाही आहे तुम्ही जाऊ शकता आणि आई आहेत ना घरी त्या माझी काळजी घेतील, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका तुम्हाला त्यांनाही वेळ देणे गरजेचे आहे, हो ना? त्या एकटाच असतात त्यांना कोणीतरी आपल्याजवळ असावं असं वाटत असेल ना? तुम्ही खरंच जा, मी बरी आहे.” असं सांगितल्यावर समीर जायला तयार झाला.

“मी फक्त भेटून येतो.” असं सांगून समीर निघून गेला, दोन तासांनी तो घरी आला. घरी आल्यानंतरही समीरची चिडचिड सुरूच होती. मीराने पुन्हा विचारलं,

“अहो काय झालं? का इतकी चिडचिड करताय? मगाशी अशी चिडचिड करत होतात.”

“काही नाही.”

“अहो सांगा ना खरंच मन हलकं होईल तुमचं.”

“नाही ग तुला सांगून मला तुझं टेन्शन वाढवायचं नाहीये. तुला आता फक्त आराम करायचा आहे, तू दुसरा कुठलाही विचार करू नकोस, मनात कुठलेही विचार आणू नकोस. आपल्याला आपल बाळ महत्त्वाचा आहे हो ना?”

“आपलं नाही तुमचं.” असं म्हणून मीराने खाली मान घातली.

“अग असं काय बोलतेस ते आपल्या दोघांचं बाळ आहे ना?”

“हो पण ते आता फक्त नऊ महिने त्यानंतर ते तुमच्या दोघांचं होणार.” असं म्हणून ती नर्व्हस झाली आणि कुस बदलून झोपली.

खरं तर तिचे डोळे पाणावले होते, डोळ्यातून अश्रू धाराही निघाल्या पण तिला ते समीरला दाखवायचं नव्हतं तिने हळूच तिचे डोळे पुसले आणि डोळे मिटून झोपण्याचं नाटक केलं.

आज मीराला झोप लागत नव्हती ती इकडून तिकडून फक्त कुस पलटत होती, समीरचेही तेच हाल होते, समीरलाही झोप लागत नव्हती. समीर उठला, त्याने लाईट ऑन केल.

“काय झालं तुम्हाला झोप येत नाही आहे का?”

“नाही ग झोप येत नाहीये.”

त्याने रेडिओवर कमी आवाजात गाणे लावले.

“जब कोई बात बिगड जाये,
जब कोई मुश्किल पड जाये,
तुम देना साथ मेरा
ओ हमनवाब....
ना कोई था,
ना कोई है.
जिंदगी मे तुम्हारे सिवा,
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवाब..”

गाणं ऐकून समीरला अपराधी झाल्यासारखं वाटत होतं. आपण चुकतोय का? आपण मीरा सोबत चुकीचं करतोय का? आपण मीराचं आयुष्य पणाला लावलाय का? तिच्यासोबत चुकीचं करतोय का? हे प्रश्न त्याला मनात निर्माण व्हायला लागले. मीरा किती चांगल्या मनाची आहे, तिने माझ्यासाठी स्वतःच्या प्रेमाची आहुती दिली, स्वतःच्या प्रेमाला सोडलं आणि मी काय करतोय तिच्यासाठी? मी तिच्यासोबत खरंच चुकीचं करतोय का? मीराला सोडल्यानंतर तिच्या आयुष्याचं काय होईल? कुठे जाईल ती? हे सगळं काय घडतंय? बरोबर घडतंय की चुकीचं घडतंय? हे एक ना अनेक प्रश्न समीरच्या डोक्यात गिरक्या घालत होते.

क्रमश:

0

🎭 Series Post

View all