आधीच्या भागात आपण पाहिले की,
समीरला त्याच्या पहिल्या बायकोबद्दल सगळं कळलं, ती खूप चुकीची वागली आणि याचा समीरला खूप त्रास झाला.
तो हताश होऊन घरी आला, मीराला सगळं सांगितलं, मीराने त्याला आधार दिला.
आता पुढे,
मीराने समीरला पाणी दिलं.
“अहो शांत व्हा आणि पाणी प्या.”
समीर पाणी प्यायला.
“अहो जास्त विचार नका करू, जे आपलं असतं ना ते आपल्याला मिळतं, जे आपल्याला मिळत नाही ना समजायचं की ते आपलं नव्हतंच. तुम्ही खरंच त्यांच्या विचारातून बाहेर या.
समीरला यातून निघायला थोडा वेळ लागला, त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, मीराने ही त्यात त्याला साथ दिली. हळूहळू सगळं सुरळीत होत चाललं होतं. बघता बघता मीराला सहा महिने पूर्ण झाले.
मीराला सातवा महिना लागलेला होता, मीराचं डोहाळे जेवण करण्याचं ठरलं, समीरने खूप आनंदाने आणि उत्साहाने डोहाळे जेवणाची संपूर्ण तयारी केलेली होती. मीराची ही सगळी तयारी झालेली होती, सासूबाईंनी तिच्यासाठी हिरव्या रंगाची लाल काठ असलेली पैठणी आणलेली होती. त्या हिरव्या कलरच्या पैठणी मध्ये मीरा अगदी खुलून दिसत होती. मीराच्या घरच्यांना पण आमंत्रित केलेल होतं. कार्यक्रम मोठ्या प्रमाणातच करण्यात आलेला होता. मीराचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. सगळे पाहुणे आपापल्या घरी परतले.
मीराला रात्री अचानक पोटात दुखायला लागलं, समीर खूप घाबरला. समीरने लगेच मीराला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी चेक-अप केलं. गर्भातलं पाणी थोडं कमी झालेलं होतं, पण बाकी काही त्रास नव्हता. डॉक्टरांनी मीराला आराम करायला सांगितला. जास्तीत जास्त आराम करायला सांगितला होता.
मीराच्या सासूबाई पण तिला जास्त काम सांगत नसतं. सगळं सुरळीत चाललेलं होतं.
एक दिवस अचानक समीरची पहिली बायको समीरच्या घरी आली. दारात येऊन तिने बेल वाजवली, दार समीरच्या आईने उघडलेल होतं.
“नमस्कार समीर आहेत घरी?”
“हो आपण कोण?”
“प्लिज तुम्ही त्यांना बोलवा ना.”
“हो बोलवते, पण आपण कोण आहात आणि काय काम आहे.” समीरच्या आईने पुन्हा विचारलं.
“तुम्ही त्यांना बोलावलं तर बरं होईल ते माझी चांगली ओळख करून देऊ शकतील. कदाचित त्यांच्या समोर उभे राहून तुम्हाला ऐकण्याचे बळ मिळेल प्लिज तुम्ही त्यांना बोलवा.” ती कोडयात बोलली असल्यामुळे समीरच्या आईने लक्ष न देता समीरला आवाज दिला. समीर आतून बाहेर आला.
“काय ग आई?”
“तुला भेटायला कोणीतरी बाई आली आहे, बघ कोण आहे.”
समीर दारात जाताच, समोर त्याला ती उभी दिसली, समीर शॉक झाला. त्याला काय बोलावं कळेना ती समोरून बोलली.
“आई मला कोण आहात आणि काय काम आहे असे विचारत आहेत, तुम्ही ओळख करून देता की मी माझी ओळख करून देऊ.”
“अगं थांब ना तू, ये ना बाहेर. आपण बाहेर बोलूया.
“आई ही माझी कलीग आहे, आई आम्ही येतो, आमचं थोडं काम आहे. आम्ही बोलून येतो.” असं म्हणून तो तिला बाहेर घेऊन गेला.”
“काय काम आहे? कशाला आली होती इथे?”
“कशाला म्हणजे तू माझा फोन उचलत नाहीयेस, मला भेटायला येत नाहीयेस मग काय करावे मी.”
“हे तू बोलतेस.”
“मग मी काय करावं?”
“तुला जे करायचं होतं ते तर तू केलंस ना आता मला काय विचारायला आलीस? जेव्हा मी तुला भेटायला येत नव्हतो तुझ्या फोन उचलत नव्हतो त्यालाही काही कारण होती मला मीराची काळजी घ्यायची होती, तिला वेळ द्यायचा होता कारण ती आपल्या दोघांसाठी बाळ जन्माला घालणार होती. एवढे कारण तू समजू शकली नाहीस आणि सरळ ऐरागैराला तुझ्या बेडवर आणून झोपवलस.. शी लाज वाटते मला तुझी. अशा मुलीवर प्रेम केलं मी मला माझीच कीव यायला लागली आहे.”
“समीर..”
“ओरडू नकोस, ओरडू नकोस तू हे जे काही केलेस ना त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही आणि आता राहिला प्रश्न मीराचा तर ती माझ्या बाळाला जन्म देणार आहे, आणि मी तिला तिचा हक्क देणार आहे. तू इथून जाऊ शकतेस.”
“समीर तू हे बरोबर करत नाहीयेस.”
“तू मला शिकवू नकोस मी काय बरोबर आणि काय चुकीचं करतोय ते.”
“समीर मी तुला कोर्टात खेचेलं.”
“तुला जे करायचे ते कर मला काहीच फरक पडत नाही. तुला जे करायचं होतं ते तू केलंस आता मला जे करायचे ते मी करेल आणि तू काय मला कोर्टात नेणार आहेस मी तुझ्यावर केस ठोकतो.” असं म्हणून समीर आत गेला.
दाराच्या मागे राहून समीरच्या आईने सगळं ऐकलं.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा