आधीच्या भागात आपण पाहिले की,
मीराचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. समीरची पहिली बायको त्याला भेटायला घरी आली. समीर तिच्याशी बाहेर जाऊन बोलला. दाराच्या मागे उभे राहून समीरच्या आईने सगळं ऐकलं.
आता पुढे,
समीरच्या आईने सगळं ऐकलं, तिला तर धक्काच बसला.
‘हे सगळं काय आहे? समीरने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. समीर असा कसा काय बघू शकतो. असा कसा करू शकतो?’ तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. ती लगेच बाहेर गेली. त्याच्या पहिल्या बायकोला जाताना बघून तिला आवाज दिला.
“ए पोरी थांब?”
ती थांबली.
समीरची आई जवळ जाऊन बोलली.
“काय ग समीरला का भेटायला आली होतीस?”
“काही नाही ऑफिसचं काम होतं.”
“खोटं बोलतेस माझ्याशी, मी समीरची आई आहे.”
“माहित आहे मला.”
“तरी खोटं बोलतेस तू.”
“मी खोटं बोलत नाहीये माझं ऑफिसचा काम होतं, त्यासाठी आलेले होते. काम झालं आणि आता मी चालली आहे.”
“तुला काय वाटलं मला काही माहिती नाहीये, तुमच्या दोघांचं काय नातं आहे मला सगळं कळलं.”
“कळलं ना, मग काय करणार आहात तुम्ही आता? हे बघा मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही.” असं म्हणून ती तिथून निघून गेली. समीरची आई मात्र विचार करत राहिली.
समीरची आई समीरच्या खोलीत गेली, समीर खुर्चीवर बसून विचार करत होता.
“समीर..”
“हो आई बोल.”
“कोण होती ती?”
“कोणी नाही ग, ऑफिसमध्ये काम करणारी होती तिला काम होतं म्हणून आलेली होती.”
“कधीपासून खोटं बोलायला लागलास रे? इतकी मोठी कोणती चूक केलीस की तुला आईची खोटे बोलावे लागत आहे.”
“आई असं काही नाहीये, ती माझी कलीग आहे, ऑफिसचं काम होतं बस एवढंच.”
“अजून किती खोटं बोलणार आहेस एकदा दोनदा कितीदा बोल ना.”
“आई माझा खरच मूड नाहीये ग, प्लिज आपण नंतर बोलुयात. नाही नंतर नाही ही गोष्ट नंतर बोलल्यानंतर बोलूया अशी टाळण्याची गोष्ट नाहीये. मला आत्ता काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे. कोण होती ती बाई सांग मला.”
“आई कुणीही नव्हती.”
“पहिली बायको होती ना तुझी.”
समीरच्या आईने असं म्हणताच समीरने मान वर करून शॉक होऊन आईकडे बघितलं आणि खुर्चीवरून उभा झाला.
“का? काय झालं इतका शॉक का झालास? तुला काय वाटलं मला काही माहिती नाहीये मला सगळं कळलं ती तुझी कोण आहे आणि तुमच्या दोघांमध्ये काय नात आहे.”
“आई नातं होतं आता नाहीये.”
“इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. लाज वाटली नाही तुला. समीर विश्वासघात केलास तू माझा, माझ्या मातृत्वाचा.. विश्वासघात केलायस, आई आणि मुलाच्या नात्याला दगा दिलास.”
“आई तू काय बोलतेस? हे बघ आमचं नातं होतं पण आता नाहीये. आता माझ्या आयुष्यात फक्त मीरा आहे आणि मीराच राहणार आहे. ती माझ्या आयुष्यात नाहीये माझं वर्तमान मीरा आहे आणि भविष्यही मीरा राहणार आहे. ती फक्त माझा भूतकाळ होती आणि आई हे लक्षात ठेव मीरा माझ्यासाठी सर्व काही आहे.”
मीरा हे सगळं बाहेरून ऐकत होती. समीर मीरा बद्दल जे काही बोलला ते ऐकून मीरा अगदी भारावून गेली, तिचेही डोळे आनंदाश्रुने भरून आले.
ती त्यांच्याजवळ गेली, तिला बघून दोघेही शॉक झाले.
“मीरा बेटा इकडे काय करतेस, किचनमध्ये होतीस ना.”
“नाही सहजच आले.”
“हो का, बस बस मी तुला काही खायला आणते.”
“आई नको मला काही.”
“आई..” मीराने सासूचा हात हातात घेतला
“आई तुम्ही काळजी करू नका सगळं नीट होईल जी चांगली लोक असतात ना त्यांच्यासोबत सगळं चांगलंच होतं, तुम्ही उगाच यांच्या बद्दल काही गैरसमज करून घेऊ नका, हे खूप चांगले आहेत, माझी खूप काळजी घेतात. तुम्ही खरंच काळजी करू नका.”
“म्हणजे तुला सगळं माहिती होतं.”
“हो आई आमचं लग्न व्हायच्या आधी यांनी मला सगळं सांगितलं होतं.”
“आणि तरीही तू तयार झालीस लग्नाला.” तिने फक्त होकारार्थी मान लावली.
“खरंच गुणी आहे ग तू माझी लेक, खरंच गुणी आहे.” असं म्हणून समीरच्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. दोघांची दृष्ट काढली.
“आराम कर बाळा, देव तुझ सगळ छान करेल.” असं म्हणून त्यांच्या खोलीतून निघून गेली.
मीराने समीरला मिठी मारली,
“थँक्यू थँक्यू सो मच, तुम्ही तुमच्या हृदयामध्ये मला जागा दिली, तुमची उपकार मी कधीच विसरणार नाही. याची जाणीव मी सदैव ठेवेल, थँक्यू सो मच.”
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा