Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 20

Katha eka mirechi

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 20


आधीच्या भागात आपण पाहिलं की

मीराच्या सासूला समीरच्या पहिल्या बायको बद्दल सगळं कळलं. तिने समीरला जाब विचारला, समीरने सगळे सांगितलं. आणि हे ही सांगितलं की आता त्याच्या आयुष्यात फक्त मीरा आहे. मीरालाही ऐकून बरं वाटलं. सगळ्यांच्या मनातले गैरसमज दूर झाले. मीराने समीरला मिठी मारली.

आता पुढे,

“अग अशी उपकाराची भाषा का बोलतेस, मी खरंच माझ्या जीवनात तुला स्थान दिलंय. आता खरंच तूच माझ्यासाठी सर्व काही आहेस. आता फक्त आपण दोघे आणि आपलं बाळ इतकच आहे माझ्यासाठी.

हळूहळू दोघांचा नातं घट्ट व्हायला लागलं, त्यांच्यात प्रेम आणखी फुलायला लागलं. मीरा मनोमन त्याच्यावर प्रेम करायला लागली. आणि समीरही मीरावर प्रेम करायला लागला. आता सगळं मार्गी लागणार या विचाराने मीरा ही खूप आनंदात होती. हळूहळू दिवस सरकत गेले आणि मीराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचा जन्म झाला आणि त्यांच्या घरात भरभराट झाली. समीरने त्याच्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिला. शामाच शिक्षण पूर्ण झालं आणि चांगलं स्थळ आलं आणि शामाचही लग्न झालं. तीही चांगल्या घरात पडली, तिच्याही घरचे लोक चांगली होती.

समीरचं प्रमोशन झालं, त्यांची दुसरीकडे बदली झाली आणि ते दुसऱ्या शहरात राहायला गेले. दिवस सरकत होते, मीराने आता नुसतं घरी न राहून बाहेर काहीतरी काम करावं म्हणून तिने समाजकार्य सुरू केले. एका अनाथ आश्रम मध्ये ती काम करायला लागली. काम करता करता तिला अनुभव यायला लागला आणि तिने स्वतःची एक संस्था उघडली आणि ती संस्था ती चालवायला लागली.

हळूहळू दिवस, महिने, वर्ष सरत गेले मुलगीही बाहेरगावी शिकायला गेली, समीरच्या आई स्वर्गवासी झाल्या. आता घरात फक्त दोघेच असायचे. समीर त्याच्या कामात गुंतलेला असायचा आणि मीरा तिच्या समाजकार्यात गुंतलेली होती.

...............................

पक्याला राधे आणि मीराची सर्व कहाणी कळली, पक्याला कसंही करून मीराला शहरातून राधेजवळ आणायचं होतं. पक्याची तळमळ वाढली कारण राधेची अवस्था खूप खराब होती, फक्त एकटं बघायचा, एकाच ठिकाणी तासंताच बसायचा राधे, त्याच्याकडे पक्याला बघवत नव्हतं. राधेला मीराच्या येण्याची आस होती, त्याचा श्वास तिच्यात अटकला होता, त्याला शेवटच्या क्षणी तरी मीराला बघायचं होतं. आणि पक्याला त्याची इच्छा पूर्ण करायची होती, पक्याची धडपड सुरू झाली. कसही करून त्याला मीराचा पत्ता मिळवायचा होता. तो मीराच्या आईच्या घरी गेला.

कमला वय झाल्यामुळे बाहेर कामाला जात नसे, ती घरीच होती पक्या त्यांच्या घरी गेला.

“कमला काकी..कमला काकी..” पक्याने बाहेरून आवाज दिला.

“कोण आहे रे.”

“काकी पक्या आहे.”

“ये रे बाळा, कसा आहेस? आज काकी कडे काय काम काढलं.”

“काकी मला ना मीराताईचा पत्ता हवा होता.”

“मीराचा पत्ता तो तुला कशाला हवा रे?”

“मी ना माझ्या शाळेच्या कामाने शहरात जाणार आहे तर मीराताई कडे जाईल ना, मीराताईला भेटून येईल.”


“काय रे इतकी वर्ष मीराताईची आठवण नाही आली आणि आता तुला आठवण आली. मीरा ताईला भेटून काय करणार आहेस.”

“कमला काकी द्याना हो तिचा पत्ता. मी खरच. भेटेन मीराताईला हे बघ त्यातलं मला काही कळत नाही. मी तुला मीराताईचा नंबर देते तू तिला फोन कर आणि तिचा पत्ता काय तो लिहून घे कागदावर, ठीक आहे.?”

“चालेल.”

“ते तिथे ना एक नोटबुक ठेवलाय तो आण माझ्याजवळ मी तिचा नंबर सांगते तुला, त्याने हातावर नंबर लिहून घेतला. येतो काकी.”

असं म्हणून तो तिथून निघाला. तो टेलिफोन बूथ वर गेला बूथ वरून त्याने मीराचा नंबर डायल केला. फोन मीराने उचलला होता.
“हॅलो..”

“हॅलो कोण बोलतंय.” तिचा आवाज ऐकून पक्या एकदम स्तब्ध झाला.
“कोण बोलतंय बोला ना.”

“मीराताई बोलतीये का?”

“हो मी मीरा बोलतीये पण तू कोण बोलतोयस.”

“मी पक्या तुझ्याच गावचा पक्या बोलतोय.”

“बोल बाळा काय काम आहे.”

“मीराताई मला तुझ्या घराचा पत्ता हवा होता म्हणजे मी शहरात येणार आहे ना तर तुला भेटून जाईल. चालेल ना तुला.”

बोलता बोलता पक्याचा कंठ दाटून आलेला होता…

“अरे हे काय विचारायचं आहे का तुझ्याकडे कागद पण असेल तर लिहून घे देते मी.”

“एक मिनिट ताई एक मिनिट काढला.” मीराने ऍड्रेस सांगितला आणि पक्याने तो लिहून घेतला.
“ठेवतो ताई आलो की भेटेन तुला.”
असं म्हणून त्याने फोन ठेवला. त्या पत्त्याकडे बघितलं आणि डोळे बंद केले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले.


क्रमश:

0

🎭 Series Post

View all