❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 21
आधीच्या भागात आपण पाहिले की,
पक्याला मीरा आणि राधे बदल सगळं कळलं, आता त्याला मीराला भेटायची उत्सुकता होती. त्याने कमला काकी कडून मीराचा नंबर घेतला आणि तिला फोन करून तिच्याकडून तिथे राहण्याचा पत्ता लिहून घेतला. पत्ता मिळाल्याचा आनंद त्याच्या डोळ्यातून निघालेला अश्रूतून दिसत होता.
आता पुढे,
मीराने फोन ठेवला आणि ती ही पक्याबद्दल विचार करत बसली. पक्याने कागद घेतला आणि तिथून धावत धावत धावत धावत निघाला, तो थेट राधे जवळ जाऊन पोहोचला. त्याच्याजवळ गेला, त्याच्या हातात चिठ्ठी ठेवली.
“राधे हे बघ पत्ता आणलाय तुझ्या मीराचा. पत्ता बघ.. बघ माझ्याकडे..”
राधे कुणाला काही रिस्पॉन्स देत नव्हता, कुणी त्याच्याशी बोलत होतं, त्याला गोटे मारत होतं, त्याला काही काही बोलायचे पण राधे कशालाच कुठलाही रिस्पॉन्स देत नव्हता. पण आज पक्याच्या तोंडून मीराचा पत्ता हे ऐकलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला. त्याने हातातली चिठी बघितली तिथे पत्ता वाचला आणि डोळ्यातून घळा घळा अश्रू बाहेर काढले, त्याला असं रडताना बघून पक्याही स्वतःला सावरू शकला नाही,
“राधे आता मी जाईल शहरात तुझ्या मीराला घेऊन येईल, तू बघतच रहा, तुझा जीव अटकलाय ना तिच्यात, बघ तुझा जीव कसा घेऊन येतो ते.” असं म्हणून पक्या तो पत्ता घेऊन तिथून निघून गेला.
काही दिवस असेच निघून गेले, मीरा तिच्या कामात व्यस्त होती, तिला पक्याने फोन केला होता हेही ती विसरली होती. समीर त्याच्या कामात खूप व्यस्त असायचा त्याला आता मीराला तेवढा वेळ देता येत नव्हता, मीरानेही स्वतःला समाजकार्यात गुंतवून घेतलं होतं. दिवस सरत गेले, एक दिवस पक्या घरी कुणालाही न सांगता शहराकडे जायला निघाला. आईने साठवलेले काही पैसे त्यांनी खिशात भरले, थैलामध्ये एक जोडी कापड ठेवलं. पाण्याची बॉटल ठेवली, एक बिस्कीटचा पुडा ठेवला आणि तो निघाला, बस मध्ये बसला आणि त्याचा प्रवास सुरू झाला. प्रवासादरम्यान पक्याला खूप अडचणी आल्या कारण तो गावातून पहिल्यांदाच असा बाहेर एकटा निघाला होता. कुणालाही ओळखत नव्हता. शहरात कसं वागायचं कसं राहायचं त्याला माहिती नव्हतं.
बऱ्याच तासानंतर पक्या शहरात पोहोचला. बसमधून उतरल्यानंतर बस स्थानकातून बाहेर निघाला, त्याला भयंकर भूक लागलेली होती म्हणून तो एका चहाच्या टपरीवर जाऊन बसला, त्याला एक चहा मागितला आणि बिस्कीटचा पुडा मागितला, चहा बिस्कीट खाल्ल्यानंतर त्या चहा वाल्याला त्याने विचारलं.
“दादा तुम्हाला हा पत्ता माहिती आहे का?”
चहा वाल्याने पत्ता वाचला पण त्याला काही तो माहिती नव्हता.
“नाही रे मला काही माहिती नाही, तुला इथे जायचे का.”
“हो..”
“तुला कुणाला तरी विचारावं लागेल कदाचित इथून दूरही असेल पण तू एकटाच आलास का? कुठे राहतोस?”
“मी गावाकडून आलोय.”
“एकटाच आलायस?”
“हो..”
“अरे पण आता तर संध्याकाळ झाली आता थोड्यावेळाने अंधार पडेल तू राहणार कुठे आहेस?” पक्याने काहीच न बोलता माहिती नाही म्हणून मानवली.
“हे बघ तू काळजी करू नकोस माझा ठेला बंद झाला ना की मी ते बाजूला शेडमध्ये झोपतो, तुला हवं असेल तर तू माझ्यासोबत झोपू शकतोस माझं नाव छोटू आहे. आपण दोघे फ्रेंड.”छोटू ने त्याच्याकडे सेकंड करण्यासाठी हात समोर केला. पक्याने पण सेकंड करून स्माईल दिली
“मी पक्या.”
“तुला काही खायचं आहे का?”
“नाही नको माझ्याकडे जास्त पैसे नाहीयेत, मी थोडेसेच पैसे घेऊन आलोय.”
“काही हरकत नाही आपण दोघे रात्री वडा पाव खाऊया, माझ्याकडे आहे थोडेसे पैसे आजची रात्र होतील. पक्या रात्रभर छोटू जवळ राहिला दुसऱ्या दिवशी पुन्हा तो पत्ता शोधत निघाला. बरीच कडे चौकशी केल्यानंतर ही त्याला तो पत्ता मिळत नव्हता. उन्हातून फिरून फिरून पक्या थकलेला होता.
एका ठिकाणी बसून तो पाणी प्यायला, त्याला आता चालवतही नव्हतं म्हणून तो थोडा वेळ बसला.
...............................
इकडे गावात पक्या नाही म्हणून त्याची आई रडकुंडीला आलेली होती, माझा मुलगा कुठे आहे माझा मुलगा कुठे आहे म्हणून गावभर शोधत फिरत बसली होती. कुणालाही पक्याचा बद्दल काहीच माहिती नव्हती तेव्हा त्या फोन बूथ वाल्याने सांगितलं की तुमचा मुलगा इथे फोन लावायला आला होता, कुणाचातरी नंबर घेऊन आला होता आणि पत्ता लिहिला त्याने तेव्हा तिला शंका आली आणि म्हणून ती कमलाकडे गेली कमलाने सांगितलं की पक्या मीराचा नंबर घेऊन गेला होता त्याला मीराचा पत्ता हवा होता हे सगळं ऐकून पक्याच्या आईने डोक्यावर हातच ठेवला.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा