❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 22
आधीच्या भागात आपण पाहिले की,
पक्याने कमला कडून मीराचा मोबाईल नंबर घेतला, तिला फोन केला तिचा पत्ता घेतला आणि घरी न सांगता तो शहरात गेला. बरीच शोधाशोध केल्यानंतरही त्याला पत्ता मिळालेला नव्हता. इकडे पक्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. तिला कळलं आणि ती कमलाकडे गेली, कमलाने तिला सगळं सांगितलं आणि ती डोक्यावर हात धरून बसली.
आता पुढे,
बरेच प्रयत्न केल्यानंतर पक्याला मीराचा नंबर मिळाला, तो मीराकडे गेला. मीरा तिच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये होती, बाहेर एक बाई उभी होती. याने तिला विचारलं.
“नमस्ते मला मीराताईला भेटायचंय.”
“मीरा मॅडमला भेटायचंय?”
“हो.”
“पण तू कोण रे?”
“मी त्यांच्या गावाकडचा मुलगा आहे, मला भेटायचं होतं त्यांना.”
“तू इथेच थांब थोडा वेळ मी मॅडमला विचारून येतो.” ती बाई आत गेली,
“मॅडम तुम्हाला भेटायला कोणीतरी मुलगा आलाय, सांगतोय की तो तुमच्या गावचा आहे.”
“पाठव त्याला आत.” ती बाई बाहेर आली पक्याला आत घेऊन गेली.
“मीराताई आत येऊ का?”
“ये पक्या ये, बस इथे.” मीराने हसतमुखाने त्याचं स्वागत केलं.
त्याला प्यायला पाणी दिलं.
“संगीता याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये.” संगीता बाहेर जाताच पक्या पटकन त्याच्या सीटवरून उठला.
“मीराताई मीराताई माझ्यासोबत गावाला चल, मी हात जोडतो, पाया पडतो तुझ्या. पण माझ्यासोबत गावाला चल.” बोलता बोलता पक्या चक्क रडायला लागला.
“अरे हो हो शांत रहा, काय बोलतोयस तू? तू आधी शांत हो. बस इथे बस. काय झालं कुठे नेतोस मला?
“गावाला..”
“अस अचानक? काय झालं?”
“कुणीतरी तुझी वाट बघतय, तू लग्न करून आलीस ना इकडे त्या दिवसापासून तो एक एक दिवस मरतोय ग, जिवंत आहे पण फक्त दिसण्यापुरता आतून तर कधीच मेला. मीराताई तू विसरलीस ना त्याला पण तो नाही विसरला ग तुला. माझी मीरा येईल म्हणून डोळे लावून वाट बघत असतो गं.”
“पक्या तू काय बोलतोस मला काहीच कळत नाहीये. तू शांत बस आणि शांतपणाने सांग मला काय झालं.”
“मीराताई राधे..”
राधेचं नाव त्याच्या तोंडून ऐकताच मीरा स्तब्ध होऊन खुर्चीवर बसली.
“त्याचं काय?”
“मीराताई तो वाट बघतोय ग तुझी, त्याचा श्वास तुझ्या अटकलाय, मरणाची वाट बघतोय एकदा तू त्याला डोळ्यासमोर दिसलीस ना की तो मरायला मोकळा होईल.”
“पक्या तू काय बोलतोस?”
“खरं तेच बोलतोय मीराताई, मला त्याची अवस्था बघवत नाही म्हणून मी इतका सगळा खटाटोप करतोय मी घरी कुणालाही न सांगता तुला भेटायला आलोय, मला इथे कुठलही काम नव्हतं. दोन दिवसापासून तुझा पत्ता शोधतोय काही न खाता न पिता, फुटपाथ वर झोपलो मी दोन दिवस फक्त तुला भेटण्यासाठी मीराताई, चलशील ना ग गावाला एकदा चल ग, भेट तुझ्या राधेला मीरा शिवाय अपूर्ण असलेला राधे अपूर्णच राहिला. एकदा शेवटचं भेटून त्याच्या प्रेमाला पूर्णत्व दे ग, पूर्ण कर ग त्याची शेवटची इच्छा.” इतक बोलून तो मीराच्या पाया पडला.
मीराने त्याला उठवलं, तोवर संगीता आत आली, मीराने तिचे अश्रू लपवले आणि संगीताला बाहेर पाठवलं,
“पक्या बाळा काहीतरी खाऊन घे.”
“नाही नको मला, मला काही नको मी जातोय पण हा जाण्याच्या आधी एक सांगतोय त्याच्या हातात जी एक पायल आहे ना त्याचा दुसरा जोड तू नक्की घेऊन ये.” एवढं बोलून पक्या तिथून निघून गेला.
मीरा मात्र भरलेल्या डोळ्यांनी तिथेच बसून राहिली.
संगीता आत आली,
मॅडम काय झालं? कोण होता तो मुलगा?”
“नाही काही नाही, हे सगळं घेऊन जा तू.”
“हो मॅडम..”
“संगीता जाताना दार टेकवून घे.”
“हो मॅडम..” संगीता तिथून निघून गेली. मीरा मात्र खुर्चीवर बसून ढसाढसा रडायला लागली.
आधीचे दिवस डोळ्यासमोर येऊ लागले, त्या दोघांची भेट, त्या दोघांचं हसणं खिदळणं एकमेकांसोबत वेळ घालवणं एकमेकांच्या मागे मागे करणं सगळं सगळं मीराच्या डोळ्यासमोर यायला लागलं. ते दिसू नये म्हणून मीराने डोळे घट्ट केले, पण राधेचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता.
मीराने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला पण ती नाही सावरू शकली. किती तरी वर्षानंतर आज राधे तिच्या डोळ्यासमोर दिसत होता असं वाटलं प्रत्यक्षात तो तिच्या समोर उभा आहे. तिला हाक मारतोय
‘मीरा मीरा एकदा शेवटच तरी ये ग मीरा.’
मीराने कसंतरी स्वतःला सावरलं आणि ती घरी जायला निघाली. घरी गेल्यानंतरही तिचा चेहरा उदासच होता, तिच्या चेहऱ्याकडे बघून समीरने तिला विचारलं पण ती काही बोलली नव्हती. फक्त स्तब्ध बसून होती.
क्रमश:

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा