Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 23

Katha eka mirechi


❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 23
आधीच्या भागात आपण पाहिले की,

पक्याने मीराचा पत्ता शोधला आणि तो तिला भेटायला गेला, तिच्या ऑफिसमध्ये गेला, तिला सगळं राधेबद्दल सांगितलं आणि तिला विनंती केली की तिने एकदा तरी राधेला भेटावं, तो शेवटचा श्वास मोजतोय त्याला शेवटचा तरी भेटायला यावं. एवढी विनंती करून तो तिथून निघून गेला. मीरा मात्र तशी स्तब्ध उभी राहिली. घरी गेल्यानंतर समीरने विचारलं तरी ती काही बोलली नव्हती.

आता पुढे,

“मीरा काय झालं?”

“काही नाही.”

“तुझा चेहरा का असा दिसतोय. बोल ना तू मनात काहीच साठवून ठेवत नाहीस मला माहिती आहे आता काही घडलं असेल तर सांग मला उगाच आतल्या आत त्रास करून घेऊ नकोस.”

“राधे..”

“राधे? त्याचं काय झालं?”


“आज एक मुलगा आला होता मला भेटायला, गावातला होता पक्या नावाचा.”

“मग मग काय झालं?”

“त्याने सांगितले की राधे शेवटचे श्वास मोजतोय त्याचा श्वास माझ्यात अडकलाय तो माझी वाट बघतोय एकदा मला बघितलं की तो मरायला मोकळा असं बोलतोय.”

“तो खरं बोलतोय?”

“हो, त्याने जे काही सांगितले त्यातला शब्दा न शब्द खराच होता कारण त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या बोलण्यावर आणि त्याच्या डोळ्यात मला ते दिसत होतं, कुठलाही खोटारडेपणा नव्हता त्याच्यात, त्याने सांगितलं मी लग्न इकडे आले तेव्हापासून राधेने घर सोडलं, काही न खाता काही न पिता वर्षानुवर्षे त्या झोपडीत राहतो, कुणी काही आणलं की त्याला देतं आणि तो तेच खातो.”


“तुला काय वाटते मीरा?”

“समीर तुमची परमिशन असेल तर..”

“कळलं मला पण आपण असंच नाही जायचं म्हणजे आपण तिथे एखादा कार्यक्रम ठेवू छोट्या छोट्या मुलांसाठी आपल्या अनाथ आश्रम च्या मुलांना घेऊन जाऊ अशी काहीतरी योजना करून जाऊया आपण, चालेल..”
.....................

इकडे पक्या घरी परत आला आणि पक्याच्या आईने त्याला खूप बदडलं खूप मारलं,

“आई थांब ना माझ ऐकून तरी घे.”

“मला न सांगताच कुठे गेला होतास रे, तुझे वडीलही घरी राहत नाही तुला एकट्याला मला सांभाळावं लागतं असा कुठे जातोस रे मला न सांगता.”

“आई आई थांबून जा मी सांगतो तुला, मी कुठे गेलो होतो. मी मीराताई कडे गेलो होतो.”

“मीरा कमला काकीची मीरा.”

“हो, तो राधे नदी जवळच्या झोपडीत राहतो त्याची मीरा.”

“हे देवा तुला नसता चांभार चौकशा कोणी करायला सांगितल्या होत्या, तू त्यांच्या मधात का पडतोस?”

“नाही आई त्याला शेवटचं मीराताईला बघायचंय म्हणून मी शहरात गेलो होतो. मीरा ताईला सांगायला एकदा तरी त्याला भेटावं.


“मग काय झालं?”

“बघूया आई मरणात आलेला माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करायची असते ना ग.”

“करायची असते रे माझ्या बाळा करायची असते.” असं म्हणून पक्याच्या आईने त्याला जवळ घेतलं.


काही दिवस असेच गेले, समीर आणि मीराने एक दिवस ठरवला आणि त्या दिवसाची सगळी तयारी करून ठेवली. मुलांना तिथे घेऊन जाण्यापासून ते काय काय कार्यक्रम करायचे कसं करायचं सगळं सगळं ठरवलं आणि त्या दिवसाला ते तिथे जायला निघाले. शहरातून जशी गाडी गावाकडे येत होती तशा तशा मीराच्या आठवणी जागा होत्या. तिला सगळीकडे राधे दिसायला लागला होता. तिला प्रत्येक ठिकाणी राधे प्रत्येक जागेवर राधे दिसत होता. तिच्या एकेक आठवणी जाग्या झाल्या. गावात पोहोचल्यानंतर मीरा घरी गेली, कमलाला खूप आनंद झाला मीराला बघून, कमलाच्या घरी मीरा आलेली आहे बघून पक्या धावत धावत नदीकाठी झोपडीत गेला.
त्याला हलवलं, राधे,बघ बघ तुला भेटायला कोण आल आहे, बघ उठ आता थोड्यावेळाने ती तुला भेटायला येईल असा पडू नकोस त्याने इशाराने विचारलं कोण येणार आहे व त्याने सांगितलं मीरा तुझी मीरा येणार आहे, तुझी मीरा. त्याने विचारल पुन्हा खरंच.. असं विचारलं.

“हो मी खोटं सांगत नाहीये, खरंच येणार आहे तुझी मीरा.” राधेने डोळे मिटले आणि डोळ्यातून घळा घळा अश्रू आले, पक्या धावत धावत कमलाकडे गेला.
“मीराताई तू आलीस.” मीराने फक्त होकारार्थी मानवली. मीरा तिच्या आईच्या कडे बसलेली होती, समीरने तोवर कार्यक्रमाची तयारी केली. इतक्या वर्षानंतर मीरा गावात आली बघून आजूबाजूच्या सगळ्या तिला भेटायला आल्या, त्यातच तिचा बराच वेळ गेला, तिलाही आता राधेला बघायची उत्सुकता झालेली होती. कधी राधेला भेटते आणि त्याला बघते असं झालं होतं. बराच वेळ मीरा त्याच्याच विचारात गुंतलेली होती. आजूबाजूच्या बाया काय बोलतात त्याकडेही तिचं लक्ष नव्हतं.


क्रमश:

0

🎭 Series Post

View all