Login

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 24 अंतिम

Katha tyachy tyagachi
❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 24 अंतिम
आधीच्या भागात आपण पाहिले की,

पक्याने मीराला सगळं सांगितलं आणि मीराने समीरला सांगितलं, समीरने गावात काहीतरी कार्यक्रम करू असं म्हणून त्यांनी गावात कार्यक्रम अरेंज केला. मीरा गावात आली राधे सोबतच्या सगळ्या आठवणी जागा झाल्या. आता मीरालाही राधेला भेटायची बघायची उत्सुकता झालेली होती.

आता पुढे,

समीरने गावात कार्यक्रम घेतले, मुलांबद्दलची जागृती, काही समाजकार्य, समाज बोध कार्यक्रम, असे कार्यक्रम घेतले. त्यात मीराने सहभाग घेतला होता. सगळा कार्यक्रम झाला. मीराला राधेकडे जायचं होतं, पण बरीच रात्र झाली आणि म्हणून ती राधेकडे जाऊ शकली नाही.

मीरा आणि समीरने तिच्या आईकडे मुक्काम केला,

“काय जावई बापू कसं चाललंय सगळं.”

“ठीक आहे सगळं, मीराला गावाला यायचं होतं म्हणून हा सगळा घाट घातला अजून काही नाही सगळं व्यवस्थित चाललंय, तुमची तब्येत काय म्हणते आहे?”

“आपले दिवसच किती राहिलेत भरणाच्या दारात टेकले आहोत.”

“काय आई, मरणाच्या दारात वगैरे.. काय ग असं नसतं बोलायचं आणि तू आता शांत झोप मी पण झोपते.”
सगळे झोपले पण मीराला झोप लागत नव्हती, तिला असं वाटलं जाऊन आता त्याला भेटावं त्याच्याशी बोलावं त्याला बघावं, तिचं मन आतुर झालेलं होतं कशीतरी पहाटेची वाट बघत होती ती, पहाट झाली आणि तिला पुन्हा त्याच्याकडे जायची अधीरता झाली. मीरा सकाळी सकाळी तयार होऊन निघाली.

“कुठे चाललीस मीरा?” आईने विचारलं.

“काही नाही देवळात जाऊन येते.”

“अग अशी एकटीच कुठे जाते जावईबापूंना घेऊन जा, तिथे मंदिर आहे मंदिर काठी नदी आणि झोपड्या वगैरे पण आहेत उगाच काही पडली बिडलीस तर, जावई बापूंना घेऊन जा.”

“आई अगं काळजी करू नकोस मी जाईन बरोबर.” आई पुढे काही बोलणार पण मीराने बोलून दिलं नाही की सरळ घरातून निघाली.

समीरला माहिती होत ती कुठे जाणार आहे म्हणून तो ही काही बोलला नाही, मीरा घरातून बाहेर निघाली रस्त्यात तिला बऱ्याच बाया भेटल्या त्या तिची विचारपूस करत होत्या, कशी आहेस काय आता कस काय चाललाय वगैरे, सगळ्यांचे विचारपूस करणं सुरू होतं तिला काही काही अंतरावर बाया भेटत होत्या. आता मीराला खूप राग यायला लागला होता आता जर कोणी भेटलं ना तर मी थांबतच नाही असा विचार करून तिने सपासप पाय टाकायला सुरुवात केली.

मंदिराजवळ येऊन तिचे पाय थबकले, खाली पायऱ्याने उतरून तिला पक्याने सांगितल्याप्रमाणे राधे त्या झोपडीतच होता, आता मात्र मीराची पावलं समोर सरकत नव्हते, तिच्या मनात धडकी भरायला लागली, तिचा श्वास फुलायला लागला, तिने कसंतरी स्वतःला सावरलं आणि एकेक पावलं उचलत ती पायऱ्या उतरली, समोर झोपडी समोर जाऊन उभी राहिली. तिला समोर एक शाल पांघरलेला पांढरे केस झालेला दाढी मिशी वाढलेली होती, अंगावर मळकट शाल होती असा एक व्यक्ती बसलेला दिसला, त्याला बघून मीरा शॉक झाली. मीराच्या तोंडून शब्द फुटेना मीरा हळूहळू त्या माणसाजवळ गेली त्याच्या बाजूला वाकून बसली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला तिचा स्पर्श होताच राधे वळला त्याला माहिती होते की हा स्पर्श फक्त मीराचाच आहे, त्याने मीराला बघितलं आणि मीराला बघतच राहिला.


“आलीस..” त्याचा तो सुरकुत्या पडलेला निस्ते चेहरा बघून मीराला खूप वाईट वाटलं, त्याच्या हातात तीच पायल होती. मीराला त्याच्याकडे बघून खूप खूप रडायला आलं, मीराने त्याचा हात हातात घेतला आणि ढसा ढसा रडायला लागली,
“का रडतेस मीरा? मला भेटायला आलीस ना मग अशी रडणार आहेस का?” राधे हळू आवाजात बोलला.

मीराने त्याचा हात घट्ट पकडला, त्याच्या गालावरून हात फिरवला.

“काय अवस्था करून ठेवलीस रे तू स्वतःची.”

“माझं काय ग मी तर शेवटचा घटका मोजतोय तुझीच येण्याची वाट बघत होतो बघ.”

“का अस बोलतोस रे?”

“मी तर तेव्हाच मेलो होतो, ज्या दिवशी तू लग्न करून गेली होतीस. फक्त शरीर जिवंत होतं, तुझा राधे तर कधीचाच मेला मीरा, कधीचाच मेला.”

“राधे गप्प बस काय बोलतोस तू? काय बडबडतोस? गप्प बस, काही खाल्लं नसशील ना तू, काही खाल्लस का? मी तुझ्या आवडीचा शिरा बनवलाय.” असं म्हणून मीराने त्याला शिराचा घास भरवला.

तो त्यानी खाल्ला, सुरकुत्या पडलेला हात वर करून त्याने मीराच्या गालाला स्पर्श केला, थोडा मागे सरकून त्याने त्याचं डोकं मीराच्या मांडीवर ठेवलं.

मीराने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तोच राधेचा शेवटचा श्वास ठरला, तिथेच त्याची प्राणजोत मालवली.

मीराला कळताच ती खूप रडायला लागली.

समाप्त:

मीरा आणि समीर मध्ये कॉन्ट्रास्ट लग्न झालं होतं, पण हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलत गेलं. दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे.
राधेने शेवटपर्यंत मीराची वाट बघितली, शेवटी तिच्याच सहवासात त्याने त्याचे प्राण सोडले..
0

🎭 Series Post

View all